प्रश्नसंच ७१ - [राज्यघटना]

[प्र.१] केंद्रीय आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण देते?
१] राष्ट्रीय विकास परिषद
२] आंतरराज्य परिषद
३] नियोजन आयोग
४] वित्त आयोग

उत्तर
४] वित्त आयोग
------------------
[प्र.२] एक व्यक्ती २६ जानेवारी १९५० रोजी मध्यप्रदेशात जन्मली तर ती कुठली नागरिक असेल?
१] मध्यप्रदेश
२] भारत
३] भारत आणि मध्यप्रदेश
४] वरीलपैकी नाही

उत्तर
२] भारत
------------------
[प्र.३] जनहित याचिका या संकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला?
१] इंग्लंड
२] अमेरिका
३] स्वीडन
४] भारत

उत्तर
२] अमेरिका
------------------
[प्र.४] राज्यघटनेतील कोणत्या कलमाने सरकारी नोकरीत समान संधीची तरतूद करण्यात आली आहे?
१] कलम १४
२] कलम १५
३] कलम १६
४] कलम १७

उत्तर
३] कलम १६
------------------
[प्र.५] कोणत्या घटनादुरुस्तीने युपीएससीच्या अध्यक्षांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्यात आले?
१] ४१व्या
२] ४२व्या
३] ४३व्या
४] ४४व्या

उत्तर
१] ४१व्या
------------------
[प्र.६] भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारच्या अल्पसंख्यांकांना मान्यता देते?
अ] धार्मिक अल्पसंख्यांक
ब] वांशिक अल्पसंख्यांक
क] भाषिक अल्पसंख्यांक

१] फक्त अ
२] फक्त अ आणि ब
३] फक्त अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
३] फक्त अ आणि क
------------------
[प्र.७] योग्य विधाने ओळखा.
अ] संचित निधीवरील अधिभारीत खर्चात राष्ट्रपतींच्या वेतनाचा समावेश होतो.
ब] अधिभारीत खर्चावर लोकसभेत मतदान घेण्यात येते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
------------------
[प्र.८] खालीलपैकी कोणी लोकसभेचा सभापती पदावर काम केले नाही?
१] नीलम संजीव रेड्डी
२] पी.ए.संगमा
३] सोमनाथ चटर्जी
४] बाबू जगजीवन राम

उत्तर
४] बाबू जगजीवन राम
------------------
[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] वृत्तपत्र स्वातंत्र्यासंदर्भात घटनेत स्वतंत्र तरतूद नाही.
ब] वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मुलभूत हक्क आहे.
क] अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा निरंकुश आहे.

१] फक्त ब
२] फक्त अ आणि ब
३] फक्त ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
२] फक्त अ आणि ब
------------------
[प्र.१०] अयोग्य विधान ओळखा.
अ] २२व्या घटनादुरुस्तीने मेघालयला सहराज्याचा दर्जा देण्यात आला.
ब] १९६९ साली मद्रास राज्याचे नाव तामिळनाडू असे करण्यात आले.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
४] एकही नाही [दोन्ही विधाने योग्य आहेत]
---------------------------------------------