प्रश्नसंच ९१ - [भूगोल]

[प्र.१] गिर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
१] अहमदाबाद
२] जुनागढ
३] इदुक्की
४] गांधीनगर

उत्तर
२] जुनागढ
------------------
[प्र.२] अयोग्य जोडी ओळखा.
१] गाळाची मृदा - मैदानी भाग
२] वाळवंटी मृदा - राजस्थान
३] काळी मृदा - दख्खनचे पठार
४] जांभी मृदा - पर्वतीय भागात पायथ्याशी

उत्तर
४] जांभी मृदा - पर्वतीय भागात पायथ्याशी
------------------
[प्र.३] महाराष्ट्रात सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] अहमदनगर
२] जळगाव
३] बुलढाणा
४] औरंगाबाद

उत्तर
१] अहमदनगर
------------------
[प्र.४] बन्नघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे?
१] वाघ
२] हत्ती
३] सिंह
४] उंट

उत्तर
२] हत्ती
------------------
[प्र.५] खालीलपैकी कोणत्या वायुभारीत पट्ट्याला "डोलड्रम" नावाने ओळखले जाते?
१] विषुवृत्तीय कमी वायुभारीत पट्टा
२] उपोष्ण पट्टा
३] उपधृवीय कमी वायुभाराचा पट्टा
४] ध्रुवीय जास्त वायुभाराचा पट्टा

उत्तर
१] विषुवृत्तीय कमी वायुभारीत पट्टा
------------------
[प्र.६] हवेच्या वहनासंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] "विषुवृत्तीय प्रदेशात" हवा उर्ध्वगामी दिशेने वाहते.
ब] "उपोष्ण प्रदेशात" हवा अधोगामी दिशेने वाहते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
[प्र.७] योग्य विधाने ओळखा.
अ] ध्रुवीय प्रदेशात हवेचा कमी दाबाचा पट्टा असतो.
ब] ध्रुवीय प्रदेशात सूर्यकिरण सरळ दिशेत लंबरूप पडतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
४] यापैकी नाही
------------------
[प्र.८] योग्य विधाने ओळखा.
अ] उत्तर गोलार्धात वायुभारात भिन्नता अधिक असते.
ब] दक्षिण गोलार्धात वायुभारात भिन्नता कमी असते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
[प्र.९] फतेहबाद अणुउर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] उत्तर प्रदेश
२] आंध्रप्रदेश
३] हिमाचल प्रदेश
४] हरियाणा

उत्तर
४] हरियाणा
------------------
[प्र.१०] खालील राज्यांचा बॉक्साईटच्या उत्पादनानुसार उतरता क्रम लावा.
अ] महाराष्ट्र
ब] गुजरात
क] झारखंड
ड] ओडिशा

१] ड-ब-क-अ
२] अ-ब-क-ड
३] ड-क-ब-अ
४] क-ब-ड-अ

उत्तर
१] ड-ब-क-अ
------------------