प्रश्नसंच १०० - [इतिहास-PSI Pre 2014]

[प्र.१] अयोग्य विधान ओळखा.
१] स्थापना  १८८५मध्ये झाली.
२] राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते.
३] राष्ट्रसभेचे जनक अॅलन ह्यूम होते.
४] इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती.

उत्तर
२] राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते.
------------------
[प्र.२] समाजसुधारक व त्यांची जन्म्स्थळे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] एम.जी.रानडे                                             १] जमखिंडी
ब] जी.जी.आगरकर                                         २] टेंभू
क] व्ही.आर.शिंदे                                             ३] पुणे
ड] जी.एच.देशमुख                                           ४] निफाड

पर्याय
१] अ-२/ब-१/क-३/ड-४
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
४] अ-२/ब-४/क-३/ड-१

उत्तर
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
------------------
[प्र.३] 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?
१] अशोक कोठारी
२] डॉ.एस.एन.सेन
३] अशोक मेहता
४] वि.डी.सावरकर

उत्तर
३] अशोक मेहता
------------------
[प्र.४] पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा.
१] 'शारदासन' आणि 'मुक्तिसदन'ची स्थापना
२] 'स्त्रीकोश' या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले.
३] निराश्रित विधवा स्त्रियांसाठी 'कृपासदन' व 'प्रीतीसादन'
४] त्यांच्या कार्याबद्दल "कैसर ए हिंद" हि पदवी बहाल  

उत्तर
२] 'स्त्रीकोश' या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले.
------------------
[प्र.५] १९३५च्या भारत सरकारच्या कायद्याची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती?
अ] प्रांतीय स्वायत्तता
ब] संघराज्याचे न्यायालय
क] केंद्रात द्विदल राज्यपद्धती
ड] दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ

१] अ आणि ड फक्त
२] अ, क, ड फक्त
३] वरील सर्व
४] ब आणि क फक्त

उत्तर
३] वरील सर्व
------------------
[प्र.६] मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला?
१] १९२६ मध्ये, जेव्हा स्वराज्य पक्षाने प्रांतातील आपले बहुमत गमावले
२] १९२९ मध्ये, कॉंग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली त्यानंतर
३] १९३२ मध्ये, सरकारने कॉंग्रेसला बेकायदा घोषित केले तेव्हा
४] १९३९ मध्ये, द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले , त्याचा निषेध म्हणून प्रांतातील कोंग्रेसच्या मंत्र्याची राजीनामे दिले तेव्हा

उत्तर
४] १९३९ मध्ये, द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले , त्याचा निषेध म्हणून प्रांतातील कोंग्रेसच्या मंत्र्याची राजीनामे दिले तेव्हा
------------------
[प्र.७] पुढीलपैकी कोणती/कोणत्या व्यक्ती १८५७च्या उठावाशी संबंधित नाही?
अ] पेठचा राजा भगवंतराव
ब] अजीजन नर्तिका
क] गुलमार दुबे
ड] काश्मीरचा राजा गुलाबसिंह

१] अ आणि ब फक्त
२] ब आणि ड फक्त
३] अ, ब, क
४] ड फक्त

उत्तर
४] ड फक्त
------------------
[प्र.८] पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वि.दा.सावरकरांनी समाज सुधारणेसाठी केल्या?
अ] विविध जातीतील स्त्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले.
ब] स्पृश्य-अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले.
क] आंतर-जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
ड] धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबविली.

१] अ, क
२] ब फक्त
३] ब, क आणि ड
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.९] १८९० मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटीश समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?
१] दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, ब्राडलॉ, हॉवर्ड
२] ह्यूम, टिळक, ब्राडलॉ, नॉरटोन
३] यूल, ह्यूम, अॅडम्स, नॉरटोन, हॉवर्ड
४] यूल, ह्यूम, अॅडम्स, ब्राडलॉ

उत्तर
३] यूल, ह्यूम, अॅडम्स, नॉरटोन, हॉवर्ड
------------------
[प्र.१०] पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरु केली?
१] नंदाताई गवळी
२] जाईबाई चौधरी
३] वेणूताई भटकर
४] तुळसाबाई बनसोडे

उत्तर
२] जाईबाई चौधरी
------------------
[प्र.११] १९व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टीकोनातून मांडणी कोणी केली?
अ] दादाभाई नौरोजी
ब] एम.जी.रानडे
क] रोमेशचन्द्र दत्त
ड] आर.सी.मुजुमदार

१] अ फक्त
२] अ आणि ब फक्त
३] अ, ब आणि क
४] अ आणि ड फक्त

उत्तर
३] अ, ब आणि क
------------------
[प्र.१२] पुढील घटना कालानुक्रमे लावा.
अ] नेहरू रेपोर्ट
ब] सायमन कमिशन
क] मुडीमन कमिशन
ड] प्रांतीय द्विदलशासन पद्धती

१] अ-ब-क-ड
२] ड-क-ब-अ
३] ड-ब-क-अ
४] ब-क-अ-ड

उत्तर
२] ड-क-ब-अ
------------------
[प्र.१३] ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
१] १७९३चा सनदी कायदा
२] १८१३चा सनदी कायदा
३] १७७३चा नियमनाचा कायदा
४] १८५८चा भारताच्या सुशासनाचा कायदा

उत्तर
२] १८१३चा सनदी कायदा
------------------
[प्र.१४] पुढील घटना कालानुक्रमे लावा.
अ] समाजवादी पक्षाची स्थापना
ब] कॉंग्रेसचे पाटणा अधिवेशन
क] श्वेतपत्रिका
ड] तिसरी गोलमेज परिषद

१] क-ब-अ-ड
२] ड-क-ब-अ
३] अ-ड-क-ब
४] ब-अ-ड-क

उत्तर
२] ड-क-ब-अ
-------------------------------