प्रश्नसंच १२४ - [भूगोल]

[प्र.१] भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे पिक कोणते?
१] ज्वारी  
२] गहू
३] तांदूळ
४] कापूस

उत्तर
३] तांदूळ
----------------
[प्र.२] महाराष्ट्रात सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते?
१] पश्चिम घाट
२] सातपुडा पर्वतरांग
३] मेळघाट प्रदेश
४] गडचिरोली टेकड्या

उत्तर
१] पश्चिम घाट
----------------
[प्र.३] भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे फळ पिक कोणते?
१] आंबा  
२] केळी
३] संत्रे
४] कलिंगड

उत्तर
१] आंबा
----------------
[प्र.४] क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते?
१] उत्तर प्रदेश
२] बिहार
३] महाराष्ट्र  
४] मध्यप्रदेश

उत्तर
३] महाराष्ट्र
----------------
[प्र.५] कवी कुलगुरू विद्यापीठ कोठे आहे?
१] हरिद्वार
२] अलाहाबाद
३] रामटेक
४] रामेश्वर

उत्तर
३] रामटेक
----------------
[प्र.६] डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे?
१] नाशिक
२] महु  
३] नागपूर    
४] मुंबई  

उत्तर
३] नागपूर
----------------
[प्र.७] ‘मुरीया’, ‘बैगा’ या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात?
१] छत्तीसगढ  
२] हरियाणा  
३] आसाम
४] पंजाब

उत्तर
१] छत्तीसगढ
----------------
[प्र.८] केबल नसलेली घरे आणि जिथे केबल सेवा पोहोचलेली नाही अशामधली दरी भरून काढण्यासाठी DTH सेवा कोणी सुरु केली?
१] व्हिडीओकॉन
२] एअरटेल
३] प्रसारभारती
४] टाटा स्काय

उत्तर
३] प्रसारभारती
----------------
[प्र.९] ‘टर्मिनेटर’ या तंत्रज्ञानाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या पिकासाठी केला जातो?
१] ज्वारी  
२] गहू
३] तांदूळ
४] कापूस

उत्तर
४] कापूस
----------------
[प्र.१०] भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा ठरलेला बगलिहार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
१] झेलम
२] चिनाब
३] सिंधू  
४] सतलज

उत्तर
२] चिनाब
----------------