चालू घडामोडी - ३० ऑक्टोबर २०१४

  • राज्य सहकारी बँकेला झालेल्या अब्जावधी रुपयांच्या तोट्याची जबाबदारी निश्चित करण्याप्रकरणी अजित पवार, विजयसिंग मोहिते पाटील यांच्यासह ६०-७० बड्या नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.  
  • प्रधानमंत्री जन धन योजनेबाबत माहिती देण्यासाठी www.pmjdy.gov.in हि वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.
  • जर्मन (शिलीन्गेल) फिल्म फेस्टिव्हल-२०१४ मध्ये अमोल गुप्ते दिग्दर्शित 'हवाहवाई' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
  • 'नासा'च्या मानवरहित यानाचा उड्डाणानंतर सहा सेकंदामध्ये व्हर्जिनिया येथे स्फोट झाला.
  • अमेरिकेच्या मानवाधिकार समितीच्या अध्यक्षपदी वनिता गुप्ता यांची निवड करण्यात आली.
सामान्य ज्ञान
  • भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार : अरविंद सुब्रमण्यम
  • गोध्रा हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेला आयोग  : नानावटी आयोग