चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१४

 • पंकज अडवाणी याने टाईम format पद्धतीतील बिलियर्डस स्पर्धेत जगज्जेतेपद पटकावले. 
  • गेल्या आठवड्यात त्याने १५० गुणांच्या बिलियर्डस स्पर्धेचे जगज्जेतेपद पटकावले होते. 
  • हे त्याचे १२वे जगज्जेतेपद आहे.
  • एकाच वर्षात दोन्ही जगज्जेतेपद जिंकण्याचा पराक्रम त्याने तिसऱ्यांदा केला. 
 • दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४मध्ये हत्या झाल्यानंतर देशभरात उसळलेल्या शीखविरोधी दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ३३२५ व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
 • मुंबईे-दिल्ली हायवेवरील इलेक्ट्रोनिक टोल कलेक्शन (ETC) यंत्रणेचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्ली येथे उद्घाटन झाले. 
  • मुंबई-दिल्ली मार्गावरील ५५ टोलनाक्यांवर ETC यंत्रणा बसविण्यात आली आहे. 
  • ETC च्या अंमलबजावणीसाठी "भारतीय हायवे व्यवस्थापन" हि नवी कंपनीहि स्थापन करण्यात आली आहे.