चालू घडामोडी - ८ नोव्हेंबर २०१४

  • 'मी सिंधुताई सपकाळ', 'पाउलवाट', 'सुखांत' या चित्रपटातून लक्षवेधी भूमिका करणाऱ्या ज्योती चांदेकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने जीवनगौरव पुरस्काराने गौरविले.
  • तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला. 
  • संसद ग्राम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी या लोकसभा मतदार संघातील जयापूर हे गाव दत्तक घेतले. 
  • अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी आपल्या २००९-२०१३ या चार वर्षाच्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील आठवणी "हार्ड चॉइसेस" या त्यांच्या नव्या पुस्तकात सांगितल्या आहेत.