चालू घडामोडी - ४ नोव्हेंबर २०१४

  • भारत जपान संबंधांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मनमोहन सिंग यांना "द ग्रँड कॉर्डोन ऑफ द पौलोवनिया फ्लॉवर्स" या जपानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. 
  • फ्रान्समध्ये "सीवायडी-टिडिव्ही" (CYD-TDV) या डेंग्यूच्या पहिल्या लसीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती वर्षाअखेरीस भारतात उपलब्ध होइल. ही लस सॅनोफी पाश्चर कंपनीने तयार केली आहे.
  • पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धकसोटी मालिका २-० अशी जिंकून ICC रॅंकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. 
    • ICC रॅंकिंग :
      1. दक्षिण आफ्रिका (१२४ गुण)
      2. ऑस्ट्रलिया (११७ गुण)
      3. पाकिस्तान (१०५ गुण)
      4. इंग्लंड (१०४ गुण)
      5. श्रीलंका (१०१ गुण)
      6. भारत (९६ गुण)
  • आर्थिक विकासदर निर्देशांकासाठी २०११-२०१२ हे नवीन आधारभूत वर्ष मानले जाणार आहे. यापूर्वी २००४-२००५ हे आधारभूत वर्ष होते. 
  • किरकोळ व्यापारातील निर्देशांक (CPI), घाऊक बाजारातील निर्देशांक (WPI), औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (IIP) यासाठी २०१४-२०१५ हे आधारभूत वर्ष मे २०१६ पासून लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी २००४-२००५ हे आधारभूत वर्ष होते.
  • माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. 
    • काँग्रेसमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपामुळे हि कारवाई करण्यात आली. 
    • तामिळनाडूमध्ये तमिळ मनिला काँग्रेसची स्थापना करण्याचे वासन यांचे प्रयत्न चालू आहेत. 
    • पिता जी. के. मुपनार  यांनी स्थापन केलेल्या तमिळ मनिला काँग्रेसचे १४ वर्षांनंतर पुनरुज्जीवन करण्यासाठी वासन सज्ज झाले आहेत.