चालू घडामोडी - १३ व १४ नोव्हेंबर २०१४

·         भाजपचे हरिभाऊ बागडे यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

·         विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड.

·         संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.

·         युरोपीय अवकाश संस्थेच्या रोसेटा अवकाशयान मोहिमेत त्याचे फिली नावाचे यान “लँडर ६७ पी- चुरयुमोव गेरासीमेन्को” या धूमकेतूवर उतरले.

·         दहा वर्षांचा प्रवास करून हे यान तेथे उतरणार असून ऑगस्ट २०१४ पासून ते या धूमकेतूभोवती प्रदक्षिणा घालीत आहे. रोसेटा जरी युरोपीय समुदायाचे असले तरी ब्रिटनचे वैज्ञानिकही आहेत.

·         गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱया उमेदवारांना आपल्या घरात शौचालय असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. अन्यथा त्यांना निवडणुक लढवता येणार नाही. गुजरात विधानसभेत स्थानिक प्रशासन संशोधन अधिनियम २०१४ पारित करण्यात आला आहे.

·         १४ नोव्हेंबर – जागतिक मधुमेह दिन

·         केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या विस्तारात गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना योग मंत्रिपद देण्यात आले आहे.

·         ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांचा समन्वय साधून शेतकऱ्याला रास्त भाव मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारने डॉ. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊसदर नियंत्रण समिती स्थापन केली आहे.

·         पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये धुडघूस घालणा-या कामतापूर लिबरेशन ऑर्गनायजेशन (केएलओ) या दहशतवादी संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

·   छत्तीसगडमध्ये बिलासपूरमधील तख्तापूर येथील रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर ८ महिलांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० इतर महिलांची प्रकृती गंभीर आहे.

·         विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून फुटून बाहेर पडलेल्या राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी नव्या झेंड्याखाली एकत्रित येत बळिराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे.

·         मुंबईकर रोहित शर्मा ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावा रचणाऱ्या विरेंद्र सेहवागच्या २१९ धावांचा विक्रम मोडीत काढत २६४ धावांची ऐतिहासिक खेळी केली.

·         विरोधी संघ: श्रीलंका   मैदान: ईडन गार्डन

·         रोहितचे हे दुसरे द्विशतक आहे. याआधी मुंबईकर रोहीतने २०९ धावांची खेळी ऑस्ट्रेलिया विरुध्द साकारली होती.

·         एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर केवळ ४ वेळा द्विशतकी खेळी खेळली गेली आणि ह्या चारही खेळी भारतीय खेळाडूंच्या आहेत.

·       रोहित शर्मा - २६४ श्रीलंके विरुध्द आणि २०९ ऑस्ट्रेलिया विरुध्द

·       विरेंद्र सेहवाग - २१९ वेस्टइंडीज विरुध्द

·       सचिन तेंडुलकर - २०० नाबाद - दक्षिण आफ्रिकेविरुध्द

·         आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये

·       पहिली शतकी खेळी खेळणारा खेळाडू-डेनिस अमिस (इंग्लंड)

·       पहिली द्विशतकी खेळी खेळणारा खेळाडू-सचिन तेंडुलकर

·       २५० धावांची खेळी खेळणारा पहिला खेळाडू -रोहित शर्मा

·         भारत आणि चीन यांच्यातल्या "हॅण्ड इन हॅण्ड" संयुक्त सराव १६ तारखेपासून पुण्यातल्या औंध  येथे सुरु झाला. भारतीय लष्कर आणि चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातला हा चौथा एकत्रित  सराव असेल.

·         दहशतवादाचा मुकाबला  करण्यासाठीची तंत्र एकमेकांनी जाणून घ्यावीत तसेच उभय देशाच्या लष्करात निकोप संबंध राहावेत हा यामागचा हेतू आहे.

·         आधार कार्डच्या धर्तीवर निवृत्ती वेतन धारकांसाठी "जीवन प्रमाण" हे डिजिटल प्रमाणपत्र सुरू करण्यात आले आहे.

·         निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतन प्राप्त करून घेण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. आता या प्रमाणपत्रामुळे या प्रक्रियेपासून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

·         १२वे विद्रोही साहित्य संमेलन बीड येथे होणार असून अध्यक्षपदी प्रा.डॉ.रूपा बोधी-कुलकर्णी यांची निवड झाली आहे.१३ व १४ डिसेंबरला हे संमेलन नियोजित आहे.

·     & दक्षिण कोरिया या देशांतील पर्यटकांसाठीही व्हीओए अर्थात व्हिसा ऑन अरायव्हल सेवा सुरु करण्यात आली आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा