चालू घडामोडी - ११-१२ नोव्हेंबर २०१४

kpk

Ø  अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मध्यम पल्ल्याच्या 'अग्नी-२' या क्षेपणास्त्राची ९ नोव्हेंबर २०१४ रोजी  यशस्वी चाचणी करण्यात आली.

Ø  ओडीशाच्या किनारपट्टीजवळ व्हिलर बेटावरील 'इंटिग्रेटेड टेस्ट रेंज'वर  ही चाचणी घेतली गेली.

Ø  जमिनीवरून जमिनीवर मारा करणा-या या क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे २००० किमी. एवढा आहे.

Ø  DRDO ने विकसित केलेल्या अग्नी-२ या क्षेपणास्त्राची उंची २० मीटर असून त्याचे वजन १७ टन आहे.

Ø  क्षेपणास्त्र व त्यांचा पल्ला : अग्नी-१ (७००किमी) / अग्नी-२ (२०००किमी) / अग्नी-३ (३०००किमी) / अग्नी-४ (४०००किमी) / अग्नी-५ (५०००किमी)

Ø  जर्मनीचे दोन भाग पाडणारी बर्लिन येथील भिंत पाडल्याला रविवारी ९ नोव्हेंबर २०१४ रोजी २५ वर्षे पूर्ण झाली.

Ø  यानिमित्त गुगलने विशेष डूडल तयार केले.

Ø  डूडलच्या स्वरुपात एक मिनिटांपेक्षा अधिक अवधीची चित्रफित तयार करून ते जगभर प्रकाशित करण्यात आले.

Ø  मॉर्गन स्टिफ यांनी या चित्रफितीचे संपादन केले आहे.

Ø  आयपीओप्रकरणी फसवणूक केल्याबाबत दोषी आढळलेल्या डीएलएफवर भांडवली बाजार नियामक सेबीने तीन वर्षाची बंदी घातली होती.

Ø  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गंगेच्या अस्सी घाटावर साफसफाई करत काशीवासीयांना स्वच्छतेचा संदेश दिला.

Ø  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, क्रिकेटपटू महंमद कैफ, सुरेश रैना, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी, गायक कैलाश खेर, चित्रकूट अपंग विद्यापीठाचे कुलगुरू स्वामी राम भद्राचार्य, लेखक मनू शर्मा, पद्मश्री देवीप्रसाद द्विवेदी, दूरदर्शनचे कलाकार राजू श्रीवास्तव या नऊ जणांची स्वच्छता मोहिमेसाठी मोदींनी निवड केली.

Ø  केंद्रीय मंत्रिमंडळातील महिला मंत्र्यांची संख्या आता ८ झाली आहे. त्यापैकी ६ कॅबिनेट मंत्री आहेत.

Ø  सुषमा स्वराज, नजमा हेपतुल्ला, उमा भारती, मनेका गांधी, स्मृती इराणी, हरसीम्रत कौर-बादल

Ø  २ राज्यमंत्री आहेत -निर्मला सीतारामन, निरंजन ज्योती

Ø  विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील सर्वात तरुण (स्मृती इराणी) आणि सर्वात वृध्द (नजमा हेपतुल्ला) मंत्रीही महिलाच आहेत.

Ø  फॉर्च्यून मासिकाने इंडियाने देशातील शक्तिशाली ५० व्यावसायिक महिलांची यादी तयार केली आहे.  त्यात भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य अग्रस्थानी तर खासगी बँक आयसीआयसीआयच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर दुस-या आणि अॅक्सिस बँकेच्या एमडी तथा सीईओ शिखा शर्मा तिस-या स्थानावर आहेत.

Ø  टॉप १० मधील इतर

4.    निशी वासुदेवा, सीएमडी, एचसीएल

5.    जिया मोदी, सहसंस्थापक, एजेडबी पार्टनर्स

6.    मल्लिका श्रीनिवासन, सीईओ टीएएफई

7.    अरुणा जयंती, सीईओ, कॅपजेमिनी, इंडिया

8.    पृथा रेड्डी, एमडी, अपोलो हॉस्पिटल

9.    किरण मुजुमदार, सीएमडी, बायोकॉन

10. शोभना भारतीया, प्रमुख, एचटी, मीडिया

Ø  फॉर्च्यून जागतिक स्तरावरील तयार केलेल्या प्रभावी महिलांच्या यादीत फक्त इंद्रा नुयी या एकमेव भारतीय महिलेचा समावेश आहे.

Ø  जागतिक स्तरावरील यादीत जगातील टॉप ५

1.    गिनी रोमेटी, प्रमुख व सीईओ, आयबीएम

2.    मेरी बारा, सीईओ, जनरल मोटर्स

3.    इंद्रा नुयी, चेअरपर्सन व सीईओ, पेप्सिको

4.    मेरिलिन ह्यूसन, चेअरपर्सन व सीईओ लॉकहीड मार्टिन

5.    अॅलन कुलमन, चेअरपर्सन व सीईओ ड्यूपोंट

Ø  ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, ऐझवाल येथील डॉ. संगथनकिमा आणि नेपाळमधील सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कोईराला यांच्यासह दहा जणांना 'हार्मनी फाऊंडेशन'तर्फे सामाजिक न्यायासाठीचा प्रतिष्ठेचा मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

Ø  आमटे दाम्पत्य लोकबिरादारी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासासाठी कार्यरत आहे.

Ø  अनुराधा कोईराला यांनी आतापर्यंत मानवी तस्करीच्या जाळ्यातून १२ हजारांहून अधिक महिलांची सुटका केली आहे

Ø  डॉ. संगथनकिमा यांनी ईशान्य भारतामध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केले आहेत.

Ø  छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्‍ये स्वच्‍छ भारत अभियान चे तयार करण्यात आलेले  एक भव्‍य दिव्‍य पोस्‍टर  थेट 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये नोडवले गेले.

Ø  २५० फुट उंचीचे पोस्‍टर तयार करण्‍यासाठी १२० कामगारांनी ३० दिवस सतत काम केल्‍यानंतर हे पोस्‍टर पूर्ण झाले.

Ø  जगातील सर्वात मोठ्या पोस्‍टरवर भारताच्‍या सर्व पंतप्रधानांचे फोटो देण्‍यात आली आहेत.

Ø  या आगोदर अमेरिकेत बॉसचित्रपटाचे सर्वात मोठे पोस्‍टर तयार करण्‍यात आले होते. ३४ हजार वर्गफुट क्षेत्रफळाचे हे पोस्‍टर होते.