चालू घडामोडी - ६ नोव्हेंबर २०१४

  • अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते 'विष्णुदास भावे पुरस्कार’ डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला. 
  • भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने वर्षातील सर्वोत्तम बारा क्रिकेटपटूंचा कसोटी आणि वनडे संघ जाहीर केला आहे. कसोटी संघाचे नेतृत्व श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूजकडे आणि वनडे संघाचे नेतृत्व सलग पाचव्यांदा भारताच्या महेंद्रसिंग धोनीकडे देण्यात आले आहे. महेंद्रसिंग धोनीची आठव्यांदा वनडे संघात (सलग सातव्यांदा) निवड झाली. 
  • शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये १९७८ ते १९८० या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या सुंदरराव सोळंके यांचे  नुकतेच निधन झाले आहे. 
  • ICC  पीपल्स चॉइस पुरस्कार २०१४ - भुवनेश्वर कुमार 
  • फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ व्या स्थानावर आहेत. जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती रशिचाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन प्रथम स्थानावर आहेत.  
  • आसाराम बापू समर्थक दिल्ली विधानसभेची निवडणूक ओजस्वी पार्टी या पक्षाकडून लढवित आहेत.या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण साई आहेत. 
  • दूरसंचार विभागाची मान्यता मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे ‘एअरटेल’ने लूप मोबाइलशी केलेला ७०० कोटींचा करार रद्द केला आहे. 
  • सचिन तेंडूलकरचे आत्मचरित्र "प्लेईंग इट माय वे" या पुस्तकाचे प्रकाशन रमाकांत आचरेकर यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचे सचिनचे सहलेखक स्पोर्टस जर्नलिस्ट बोरिया मुजुमदार आहेत. 
  • १३ नोव्हेबर पासून जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धा दक्षिण कोरियातील जेजू येथे सुरु होणार आहे. भारतीय महिला संघातील अविवाहित खेळाडूंची गर्भधारणा चाचणी (प्रेग्नन्सी टेस्ट) केल्यामुळे हि स्पर्धा चर्चेत आहे. 
  • विधानसभेतील जेष्ठ सदस्य गणपतराव देशमुख (शेकाप) यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे जेष्ठ आमदार जीवा पांडू गावित नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील.