सदाशिव अमरापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 • जेष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६४व्या वर्षी निधन झाले. 
 • त्यांनी "आमरस" या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. 
 • तर "अर्धसत्य" या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
 • महत्वाची नाटके: छिन्न, काही स्वप्न विकाय्चीत, हवा अंधारा कवडसा, ज्याचा त्याचा विठोबा, हॅंड्स अप इ.  
 • हिंदी चित्रपट: अर्धसत्य, ऐलान-ए-जंग, इश्क, नाकाबंदी, सडक, गुप्त इ. 
 • मराठी चित्रपट: झेडपी, वास्तुपुरुष, जन्मठेप, कदाचित, होऊ दे जरासा उशीर इ. 
 • अखेरचा हिंदी चित्रपट : बॉम्बे टॉकीज
 • अखेरचा मराठी चित्रपट : धनगरवाडा 
 • पुरस्कार:
  • "अर्धसत्य"मधील रामा शेट्टीच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ठ सहाय्यक कलाकार (१९८४)
  • "सडक" चित्रपटातील महाराणीच्या तृतीयपंथीच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ठ खलनायक (१९९१)