प्रश्नसंच ११४ - [अर्थशास्त्र-सहाय्यक पूर्वपरीक्षा २०१४]

[प्र.१] जुलै १९९१ मध्ये रुपयाचे किती टक्के अवमूल्यन करण्यात आले होते?
१] १४ टक्के
२] ३६.५ टक्के
३] १२ टक्के
४] २२.२ टक्के

उत्तर
४] २२.२ टक्के
----------------
[प्र.२] भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा मुद्रापुरवठा मापनाच्या प्रचालांची नव्याने व्याख्या करण्यासाठी अलीकडच्या काळात नियुक्त केलेल्या कार्य गटाने भारतातील मुद्रापुरावठ्याच्या संकल्पनेतून खालील घटक रद्द केला आहे.
१] M1
२] M2
३] M3
४] M4

उत्तर
४] M4
----------------
[प्र.३] सुखमॉय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थबोधन होण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे?  
१] महसुली तूट
२] राजकोषीय तूट
३] प्राथमिक तूट
४] वरीलपैकी एकही नाही

उत्तर
२] राजकोषीय तूट
----------------
[प्र.४] भारत सरकारद्वारा प्रा.पी.सी.महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले?
१] १९५१
२] १९४९
३] १९४८
४] १९५६

उत्तर
२] १९४९
----------------
[प्र.५] किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
१] १९४७
२] १९४८
३] १९४९
४] १९५०

उत्तर
२] १९४८
----------------
[प्र.६] देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण -
अ] रोजगारात वाढ होत आहे.
ब] बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे
क] विदेशी गुंतवणुका वाढत आहेत
ड] वरीलपैकी कोणतेही नाही

योग्य पर्याय निवडा.
१] (अ) आणि (क) फक्त
२] (ब) फक्त
३] (ब) आणि (क) फक्त
४] (ड) फक्त

उत्तर
२] (ब) फक्त
----------------
[प्र.७] भांडवली खात्यावरील परीवर्तनियतेबाबतची समिती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली?
१] डॉ. सी.रंगराजन
२] एम.नर सिंहम
३] वाय.व्ही.रेड्डी
४] एस.एस.तारापोर

उत्तर
४] एस.एस.तारापोर
----------------
[प्र.८] पिक रचनेतील बदल याचा अर्थ -
अ] विविध पिकांच्या रचनेतील बदल
ब] आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड
क] तंत्रज्ञानातील बदल
ड] विविध पिकांखालील शेतजमिनीच्या टक्केवारीत घडून आलेले बदल

योग्य पर्याय निवडा.
१] फक्त (अ) बरोबर
२] (अ) आणि (क) बरोबर
३] (ब) आणि (ड) बरोबर
४] फक्त (ड) बरोबर

उत्तर
४] फक्त (ड) बरोबर
----------------
[प्र.९] खालीलपैकी कोणता सार्वजनिक वित्ताचा बाह्य स्त्रोत आहे?
१] अधिमान भाग
२] साधारण भाग
३] नफ्याची गुंतवणूक
४] ऋण पत्रे

उत्तर
४] ऋण पत्रे
----------------
[प्र.१०] केंद्र सरकारला कोणत्या क्षेत्रात वावरताना अधिक काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वागावे लागेल?
१] सेवा क्षेत्र
२] शेती क्षेत्र
३] बँकिंग क्षेत्र
४] उद्योग क्षेत्र

उत्तर
३] बँकिंग क्षेत्र
----------------
[प्र.११] योग्य पर्याय निवडा.
अ] स्वसहाय्यता गट हा गरीब लोकांचा असायला हवा.
ब] गटात २५ ते ३० सदस्य असतात.
क] केवळ सामाजिक दृष्ट्या मागास कुटुंबातील सदस्य असतात.

योग्य पर्याय निवडा.
१] (अ) बरोबर, (ब) आणि (क) चूक
२] (अ), (ब), (क) सर्व बरोबर
३] (अ) आणि (क) बरोबर, (ब) चूक
४] (अ), (ब), (क) सर्व चूक

उत्तर
१] (अ) बरोबर, (ब) आणि (क) चूक
----------------
[प्र.१२] जोड्या लावा
अ] तेलाच्या किंमतीत वाढ                                  i] शेतीशी निगडीत अधिक
ब] १९५०-१९५१ पूर्वी भारताची निर्यात                  ii] आर्थिक व्यवहारांचा आढावा
क] व्यवहारतोल                                                 iii] १९९०-१९९१
ड] व्यापारतोलातील मोठी तुट                             iv] १९७३ नंतर

१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-iv / ब-i /क-ii / ड-iiii
३] अ-i / ब-iv / क-ii / ड-iii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv

उत्तर
२] अ-iv / ब-i /क-ii / ड-iiii
----------------
[प्र.१३] जोड्या लावा
अ] बँकिंग नियमन कायदा                                          i] १९६९   
ब] बँकांचे राष्ट्रीयीकरण                                                ii] १९५५
क] भारतातील स्टेट बँकेची स्थापना                            iii] १९६०
ड] स्टेट बँक समूहाची निर्मिती                                     iv] १९४९

१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-i / ब-iv / क-ii / ड-iii
३] अ-iv / ब-i /क-ii / ड-iii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv

उत्तर
३] अ-iv / ब-i /क-ii / ड-iii
----------------
[प्र.१४] अ] बँकिंग क्षेत्रातील सुधारणा १९९२ मध्ये सुरु केल्या गेल्या.
ब] सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफाक्षमता व कार्यक्षमता उंचावणे.
क] बँकांची सुरक्षितता आणि सक्षमता सुधारणे

योग्य पर्याय निवडा.
१] (अ) बरोबर असून (ब) आणि (क) हे (अ) चे उद्दिष्टे आहेत.
२] (ब) आणि (क) फक्त बरोबर आहेत.
३] (अ) बरोबर असून फक्त (ब) हे (अ) चे उद्दिष्ट आहे.
४] (अ) बरोबर परंतु (ब) आणि (क) हे (अ) चे उद्दिष्टे नाहीत.

उत्तर
१] (अ) बरोबर असून (ब) आणि (क) हे (अ) चे उद्दिष्टे आहेत.
----------------
[प्र.१५] एका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले?
१] १९७६
२] १९९१
३] २०००
४] २००१

उत्तर
३] २०००
-----------------

प्रश्नसंच ११३ - [विज्ञान-सहाय्यक पूर्वपरीक्षा २०१४]

[प्र.१] ओहमचा नियम खालीलपैकी कोणाला लागू पडत नाही?
१] वाहक
२] अर्धवाहक
३] स्थिर तापमान नसणारा वाहक
४] यापैकी नाही

उत्तर
२] अर्धवाहक
------------------
[प्र.२] हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, त्याला _ _ _ _ _ म्हणतात?
१] द्रवीभवन बिंदू
२] उत्कलन बिंदू
३] दवाचा बिंदू
४] पूर्ण आर्द्रता

उत्तर
३] दवाचा बिंदू
------------------
[प्र.३] भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?
१] मिथिल अमाईन
२] मिथिल क्लोराईड
३] मिथिल आयसोसायनेट
४] मिथिल फ्लुराईड

उत्तर
३] मिथिल आयसोसायनेट
------------------
[प्र.४] चंद्रशेखर मर्यादा _ _ _ _ _ आहे?
१] चंद्राच्या वस्तुमानाच्या १.४ पट
२] सूर्याच्या वस्तुमानाच्या १.५ पट
३] सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४ पट
४] मंगळाच्या वस्तुमानाच्या १.५ पट

उत्तर
३] सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४ पट
------------------
[प्र.५] कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
१] मगर
२] हत्ती
३] सिंह
४] जिराफ

उत्तर
४] जिराफ
------------------
[प्र.६] खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही?
१] मच्छर
२] माशी
३] स्पायडर (कोळी)
४] ढेकुण

उत्तर
३] स्पायडर (कोळी)
------------------
[प्र.७] सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
१] कोयता किंवा विळीप्रमाणे (दात्राकार)
२] द्विबहीर्वक्र
३] द्विअन्तर्वक्र
४] वरील कोणताही नाही

उत्तर
३] द्विअन्तर्वक्र
------------------
[प्र.८] पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो?
१] आरबो व्हायरस/विषाणू
२] राब्डो व्हायरस/विषाणू
३] रिकेटसीआ
४] ह्युमन इम्युनो डेफीसिएन्सी व्हायरस/विषाणू

उत्तर
१] आरबो व्हायरस/विषाणू
------------------
[प्र.९] टॅक्सोनॉमी हा शब्द कोणी दिला?
१] हॅकेल                
२] लीनियस
३] अॅरीस्टोटल
४] डीकेन्डोल

उत्तर
४] डीकेन्डोल
------------------
[प्र.१०] वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायऑक्साईड (CO2) शोषतात?
१] अल्ट्रा व्हायलेट
२] इन्फ्रारेड
३] व्हिजिबल
४] मायक्रोवेव्ह

उत्तर
२] इन्फ्रारेड
------------------
[प्र.११] खालील वाक्यांपैकी चुकीचे विधान ओळखा.
१] डायइथिल इथर हे सामान्य बधिरीकरणासाठी वापरतात.
२] इथिल अल्कोहोल हे सर्व प्रकारच्या दारू पदार्थांमध्ये असते.
३] मिथिल अल्कोहोल हे साखर आंबविण्याच्या प्रक्रियेपासून तयार करतात.
४] इथिलीन ग्लायकॉल हे साधारणपणे ऑटोमोबाईल इंजिनमध्ये अॅटीफ्रिज म्हणून वापरतात.  

उत्तर
३] मिथिल अल्कोहोल हे साखर आंबविण्याच्या प्रक्रियेपासून तयार करतात.
------------------
[प्र.१२] अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१] रक्त गोठेलेले असते
२] रक्त थंड असते
३] शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत राहते
४] शरीराचे तापमान स्थिर असते

उत्तर
३] शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत राहते
------------------
[प्र.१३] वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते?
१] १५
२] ३२
३] १६
४] १२

उत्तर
३] १६
------------------
[प्र.१४] मेदापासून किती उर्जा (उष्मांक) मिळते?
१] ४ किलो कॅलरी/ग्रॅम
२] ९ किलो कॅलरी/ग्रॅम
३] ७ किलो कॅलरी/ग्रॅम
४] १२ किलो कॅलरी/ग्रॅम

उत्तर
२] ९ किलो कॅलरी/ग्रॅम
------------------
[प्र.१५] A.C. विद्युतधारेचे रुपांतर D.C. विद्युतधारेमध्ये रुपांतर करण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते?
१] ट्रान्सफॉर्मर
२] ऑसीलेटर
३] रेक्टीफायर
४] कॅपेसिटर

उत्तर
३] रेक्टीफायर
-------------------------------

प्रश्नसंच ११२ - [इतिहास-सहाय्यक पूर्वपरीक्षा २०१४]

[प्र.१] महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते?
१] ज्योतिबा फुले
२] वि.रा.शिंदे
३] डॉ. आंबेडकर
४] छत्रपति शाहू महाराज

उत्तर
१] ज्योतिबा फुले
----------------
[प्र.२] काँग्रेसमधील कोणत्या गटावर 'संधिसाधू', ब्रिटीश धार्जिणे', 'राजकीय भिकारी' अशी टीका केली जात असे?
१] महाराष्ट्रीयन
२] बंगाली
३] जहाल
४] मवाळ

उत्तर
४] मवाळ
----------------
 [प्र.३] पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता?
१] शेतीवरील परिणाम
२] किंमतींचे  स्थिरीकरण
३] उत्पादनाच्या किंमतीच्या चढउतारात वाढ
४] शहराच्या संख्येत वाढ

उत्तर
२] किंमतींचे स्थिरीकरण
----------------
[प्र.४] ब्रिटीशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हता?
१] अखिल भारतीय संघटनेच्या निर्मितीटची पार्श्वभूमी तयार झाली.
२] तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य होते.
३] भारतीय खेड्यातही सामाजिक शिष्टाचार, वेष, मनोरंजन आदीबाबत पाश्चात्यांचे अनुकरण आढळते.
४] अनेक इंग्रजी शब्दांनी स्थानिक भाषांमध्ये जागा घेतली.

उत्तर
२] तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य होते.
----------------
[प्र.५] हाताने विणलेल्या खादीचा वेष परिधान करून 'राजदरबारात (१८७७)' कोण उपस्थित होते?
१] गणेश वासुदेव जोशी
२] म.गो.रानडे
३] रवींद्रनाथ टागोर
४] बाळेन्द्रनाथ टागोर

उत्तर
१] गणेश वासुदेव जोशी
----------------
[प्र.६] ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरु केला कारण.....
अ] त्यांना ताग उद्योगाबद्दल आकर्षण होते
ब] भारतीय उद्योगधंद्यांचा विकास करणे.
क] भारीतीयांना रोजगार मिळवून देणे.
ड] वाढती मागणी होती व अधिक नफा मिळविणे.

१] अ फक्त
२] अ आणि ब फक्त
३] अ, ब आणि क फक्त
४] अ आणि ड फक्त

उत्तर
४] अ आणि ड फक्त
----------------
[प्र.७] १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला?
१] ओट्रम
२] हॅवलॉक
३] हेनरी लॉरेन्स
४] कँपबेल

उत्तर
३] हेनरी लॉरेन्स
----------------
[प्र.८] देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'आत्मनिष्ठ युवती' समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली?
अ] श्रीमती दुर्गाबाई बोहरा
ब] कल्पना दत्त
क] सौ. येसू बाबाराव सावरकर
ड] सौ. लक्ष्मीबाई दातार

१] फक्त क बरोबर
२] अ आणि ब दोन्ही बरोबर
३] वरील सर्व बरोबर
४] वरील सर्व चुकीचे

उत्तर
१] फक्त क बरोबर
----------------
[प्र.९] घटना कालानुक्रमे लावा.
अ] समता संघ
ब] निष्काम कर्ममठ
क] महिला विद्यालय
ड] महिला विद्यापीठ

१] अ - ब - क - ड
२] ड - क - ब - अ
३] क - ब - ड - अ
४] ब - क - अ - ड

उत्तर
३] क - ब - ड - अ
----------------
[प्र.१०] भारतात ब्रिटिशांनी जी संपत्तीची लुट केली त्याबद्दल ब्रिटीश इस्ट कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण' असे कोणी म्हंटले?
१] दादाभाई नौरोजी
२] अॅडम स्मिथ
३] लोकमान्य टिळक
४] ब्रॅड लॉ

उत्तर
२] अॅडम स्मिथ
----------------
[प्र.११] राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता?
अ] गोपाळकृष्ण गोखले
ब] गंगारामभाऊ मस्के
क] गोपाळ गणेश आगरकर
ड] फिरोजशहा मेहता

१] अ आणि ब बरोबर
२] ब आणि क चूक
३] अ, ब आणि ड बरोबर
४] अ, ब, क, ड बरोबर

उत्तर
४] अ, ब, क, ड बरोबर
----------------
[प्र.१२] जोड्या लावा
अ] भिल्लांचा उठाव                                              i] १८३८
ब] पागल पंथीयांचा उठाव                                    ii] १८२९
क] कोळ्यांचा उठाव                                             iii] १८२५
ड] फरेजी उठाव                                                   iv] १८१७

१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-iv / ब-iii /क-ii / ड-i
३] अ-i / ब-iv / क-ii / ड-iii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv

उत्तर
२] अ-iv / ब-iii /क-ii / ड-i
----------------
[प्र.१३] जोड्या लावा
अ] १८८७               i] अमलगमेटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्व्हटस ऑफ इंडिया
ब] १८९७                ii] कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये संप
क] १९१०                iii] कामगार हितवर्धक सभा
ड] १९१०                 iv] सोशल सर्व्हिस लीग

१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-iv / ब-iii /क-ii / ड-i
३] अ-i / ब-iv / क-ii / ड-iii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv

उत्तर
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv
---------------------------------

प्रश्नसंच १११ - [भूगोल-सहाय्यक पूर्व परीक्षा-२०१४]

[प्र.१] भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणते?
१] ९७' २५' E
२] ६७' ७' E
३] ८२' ५०' E
४] ९०' २५' E

उत्तर
१] ९७' २५' E
------------------
[प्र.२] 'लु' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने _ _ _ _ _ _ _ ?
१] एप्रिल-मे
२] मे-जून
३] जून-जुलै
४] ऑक्टोबर-नोव्हेंबर

उत्तर
२] मे-जून
------------------
[प्र.३] जोड्या लावा  
अ] गोंदिया                               i] २६ ऑगस्ट १९८२
ब] वाशीम                                ii] १६ ऑगस्ट १९८२
क] गडचिरोली                          iii] १ मे १९९९
ड] लातूर                                  iv] १ जुलै १९९८

१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-iv / ब-iii /क-i / ड-ii
३] अ-iii / ब-iv / क-i / ड-ii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv

उत्तर
३] अ-iii / ब-iv / क-i / ड-ii
------------------
[प्र.४] गुरु शिखर कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे?
१] छोटा नागपूर
२] अरवली
३] विंध्य
४] मालवा

उत्तर
२] अरवली
------------------
[प्र.५] खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?
१] दामोदर
२] कृष्णा
३] तुंगभद्रा
४] तापी

उत्तर
४] तापी
------------------
[प्र.६] जोड्या लावा
अ] पंजाब हिमालय                i] काळी आणि तिस्ता नदीमधील हिमालय
ब] आसाम हिमालय              ii] सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालय
क] नेपाळ हिमालय               iii] सतलज आणि काळी नदीमधील हिमालय
ड] कुमाऊ हिमालय               iv] दिहांग आणि तिस्ता नदीमधील हिमालय

१] अ-iv / ब-ii / क-iii / ड-i
२] अ-ii / ब-iv / क-i / ड-iii
३] अ-i / ब-iii / क-iv / ड-ii
४] अ-ii / ब-iv / क-iii / ड-i

उत्तर
२] अ-ii / ब-iv / क-i / ड-iii
------------------
[प्र.७] खालीलपैकी कोणते घटक वयरचनेवर परिणाम करतात?
अ] जन्मदर
ब] मृत्युदर
क] लोकसंख्येचे आकारमान
ड] स्थलांतर

१] ब, क आणि ड
२] फक्त क
३] फक्त ड
४] वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर
४] वरीलपैकी कोणतेही नाही
------------------
[प्र.८] तृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे _ _ _ _ _ _ _ _?
१] प्रक्रिया करणे
२] गोळा करणे
३] वितरण करणे
४] साठवून ठेवणे

उत्तर
३] वितरण करणे
------------------
[प्र.९] डेक्कन ओडिसी हा संयुक्त प्रकल्प MIDC आणि _ _ _ _ _ मध्ये आहे?
१] भारतातील हॉटेल्स
२] रेल्वे
३] एयर इंडिया
४] आय.टी.डी.सी

उत्तर
२] रेल्वे
------------------
[प्र.१०] भारतातील खालील तेलशुद्धीकरण केंद्रांची पश्चिमेकडून पूर्वेकडे मांडणी करा.
अ] कोयाली
ब] बोनगईगाव
क] मथुरा
ड] नुमलीगड

१] अ ब क ड
२] अ क ब ड
३] क अ ब ड
४] ब ड क अ  

उत्तर
२] अ क ब ड
------------------
[प्र.११] खालीलपैकी कोणता मासा गोड्यापाण्याच्या मत्स्य शेतीत महत्वाचा आहे?
अ] बांगडा
ब] झिंगा
क] बोंबील
ड] कोळंबी

उत्तर
ड] कोळंबी
------------------
[प्र.१२] मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात _ _ _ _ _ पेक्षा जास्त आहे?  
अ] ०.३
ब] ०.५
क] ०.९
ड] ०.८

उत्तर
ड] ०.८
------------------
[प्र.१३] 'एल निनो' हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणा-या देशाचा किनारा _ _ _ _ _ आहे?
अ] अर्जेन्टिना
ब] पेरू
क] ब्राझील
ड] चिली  

उत्तर
ब] पेरू
----------------------------

प्रश्नसंच ११० - [चालू घडामोडी-सहाय्यक पूर्व परीक्षा-२०१४]

[प्र.१] २०१३ मध्ये इंटरनेटचा वापर करणा-या देशांमध्ये भारताचे स्थान कितवे आहे?
१] ६ वे
२] ५ वे
३] ४ थे
४] ३ रे

उत्तर
४] ३ रे
------------------
[प्र.२] भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण? 
१] अमृता मल्होत्रा
२] लक्ष्मी  जोसेफ
३] जुईली भंडारे
४] मोनिका पटेल

उत्तर
३] जुईली भंडारे
------------------ 
[प्र.३] मार्च २०१४ मध्ये मलेशियाचे कोणते विमान बेपत्ता झाले? 
१] एम.ए. – २१ 
२] एच.एम. – २७० 
३] एम.एल. – २७० 
४] एम.एच. – ३७०

उत्तर
४] एम.एच. – ३७०
------------------
[प्र.४] सर्वोच्च न्यालयाच्या मुख्य न्यायाधीशांबाबत विधाने लक्षात घ्या. 
अ] राजेंद्रमल लोढा यांची नुकतीच सर्वोच्च न्यालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली.
ब] ते सर्वोच्च न्यायालयाचे ४०वे सरन्यायाधीश आहेत.
क] जानेवारी १९९४ मध्ये ते राजस्थान उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश बनले.
ड] मे २००८ मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश बनले.

१] विधाने अ आणि ब बरोबर क आणि ड चुकीचे  
२] विधाने अ आणि ब चुकीचे क आणि ड बरोबर 
३] विधाने अ आणि ड बरोबर ब आणि क चुकीचे  
४] विधाने अ आणि क बरोबर ब आणि ड चुकीचे

उत्तर
४] विधाने अ आणि क बरोबर ब आणि ड चुकीचे
------------------
[प्र.५] RBI च्या डेप्युटी गव्हर्नर बाबत विधाने लक्षात घ्या. 
अ] आर.गांधी यांची नुकतीच RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती झाली.
ब] त्यांची नेमणूक ५ वर्षासाठी आहे.
क] ते नामांकित बँकर आहेत.
ड] ते अर्थतज्ञ आहेत.
इ] आनद सिन्हा यांच्या जागी ते नेमले आहेत.

१] विधाने अ, ब, क बरोबर ड, इ चुकीचे  
२] विधाने अ, ब, ड बरोबर क, इ चुकीचे  
३] विधाने ब, क, इ बरोबर अ, ड चुकीचे  
४] विधाने अ, क, इ बरोबर ब, ड चुकीचे

उत्तर
४] विधाने अ, क, इ बरोबर ब, ड चुकीचे
------------------
[प्र.६] जोड्या लावा 
अ] हवाई दल प्रमुख                                   A] विक्रम सिंग
ब] नौदल प्रमुख                                        B] अरूप राहा
क] भूसेनादल प्रमुख                                  C] रॉबीन के. धवन
ड] भारतीय तटरक्षक दल महासंचालक          D] अनुराग गोपालन तापलीलाल

१] अ-B/ब-C/क-A/ड-D
२] अ-C/ब-B/क-A/ड-D
३] अ-A/ब-B/क-D/ड-B
४] अ-B/ब-A/क-C/ड-D

उत्तर
१] अ-B/ब-C/क-A/ड-D
------------------
[प्र.७] 'अंडरनिथ द सदर्न क्रॉस' हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे?
१] महेंद्रसिंग धोनी
२] रिकी पोंटिंग 
३] कपिल देव
४] मायकेल हसी

उत्तर
४] मायकेल हसी
------------------
[प्र.८] 'दि टाईम्स ऑफ इंडिया' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 
१] १७५वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला.
२] वर्धापन दिन १२ नोव्हेंबर २०१२ रोजी साजरा करण्यात आला.
३] स्मृत्यर्थ ५ रुपयांच्या टपाल तिकिटाचे अनावरण भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.
४]  "१७५ वर्षाचे जुने नव्हे तर १७५ वर्षाचे तरुण" विनीत जैन [द टाईम्स ग्रुपचे M.D.] यांनी तेव्हा म्हंटले.

उत्तर
२] वर्धापन दिन १२ नोव्हेंबर २०१२ रोजी साजरा करण्यात आला.
------------------
[प्र.९] २०१३ चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? 
१] वसंत आबाजी डहाके
२] नामदेव कांबळे
३] मारुती चित्तमपल्ली 
४] सतीश कळसेकर

उत्तर
४] सतीश कळसेकर
------------------
[प्र.१०] ICC वर्ल्ड कप २०-२० बाबत जोड्या लावा 
वर्ष-विजेता                                             उपविजेता
अ] २००७ - भारत                                   A] श्रीलंका 
ब] २०१० - इंग्लंड                                    B] पाकिस्तान 
क] २०१२ - वेस्ट इंडीज                            C] ऑस्ट्रेलिया 
ड] २०१४ - श्रीलंका                                  D] भारत

१] अ-B/ब-C/क-A/ड-D
२] अ-C/ब-B/क-A/ड-D
३] अ-A/ब-B/क-D/ड-B
४] अ-B/ब-A/क-C/ड-D

उत्तर
१] अ-B/ब-C/क-A/ड-D
------------------
[प्र.११] 'चोगम' [CHOGM] २०१३ च्या बाब्तीय चुकीची विधाने ओळखा.
अ] नोव्हेंबर २०१३ मध्ये कोलंबो येथे झाले.
ब] भारताचे पंतप्रधान हजर नव्हते.
क] कॅनडा व मॉरेशर्सच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. 
ड] ५३ शासनाच्या प्रमुखांपैकी फक्त २७ हजर
इ] राष्ट्रकुलाच्या प्रमुख राणी एलिझाबेथ - II या हजर होत्या.
फ] मलेशियाची 'चोगम - २०१५' साठी यजमान म्हणून निवड झाली.

१] ब फक्त
२] अ आणि क
३] ड आणि इ 
४] इ आणि फ

उत्तर
४] इ आणि फ
------------------
[प्र.१२] मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने जानेवारी मध्ये कमी उत्पन्न असलेल्या चार राज्यांसाठी ग्रामीण पाणी पुरवठा व निःसारण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सहमती दर्शवली ती राज्ये म्हणजे
अ] आसाम ब] बिहार क] झारखंड 
चौथे राज्य कोणते? 
१] छत्तीसगढ
२] उत्तर प्रदेश
३] उत्तराखंड
४] मध्यप्रदेश  

उत्तर
२] उत्तर प्रदेश
------------------
[प्र.१३] लैंगिक छळ प्रतिबंधक विधेयकाबाबत बरोबर विधाने ओळखा. 
अ] राज्यसभेने ते सर्वसंमतीने मंजूर केले.
ब] राज्यसभेने ते प्रचंड बहुमताने मंजूर केले.
क] खाजगी क्षेत्र वगळता संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील महिलांना संरक्षण दिले गेले.
ड] तक्रार निवारणासाठी अंतर्गत यंत्रणा करणे आवश्यक आहे.  

१] अ आणि क
२] ब आणि ड
३] अ आणि ड
४] ब आणि क

उत्तर
३] अ आणि ड
------------------
[प्र.१४] खालील विधानांचा विचार करा व बरोबर विधाने ओळखा. 
अ] केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारी २०१४ मध्ये समान संधी आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली.
ब] समान संधी आयोगाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाने सच्चर समितीच्या शिफारसीनुसार तयार केला आहे.
क] समान संधी आयोग ५ सदस्यांचा असून त्याच्या प्रमुखपदी सर्वोच्च न्यायालायचे निवृत्त न्यायाधीश असतील.

१] अ आणि क
२] अ आणि ब 
३] ब आणि क
४] वरील सर्व  

उत्तर
२] अ आणि ब
------------------
[प्र.१५] खालील विधानांचा विचार करा व बरोबर विधाने ओळखा. 
अ] अग्नी-IV या आण्विक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली आहे.
ब] अग्नी-IV चा मारक टप्पा ३००० किमी आहे.
क] २० मीटर उंचीचे क्षेपणास्त्र असून वजन १७ टन आहे.

१] अ आणि क
२] अ आणि ब 
३] ब आणि क
४] वरील सर्व

उत्तर
१] अ आणि क
--------------------------------

प्रश्नसंच १०९ - [इतिहास]

[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?
अ] बाबा पदमनजी
ब] ना. म. जोशी
क] बाळशास्त्री जांभेकर
ड] गोपाळ हरी देशमुख

उत्तर
क] बाळशास्त्री जांभेकर
-------------------
[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?
अ] गोपाळ कृष्ण गोखले
ब] आचार्य अत्रे
क] गोपाळ हरी देशमुख
ड] साने गुरुजी

उत्तर
क] गोपाळ हरी देशमुख
-------------------
[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी ______________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.
अ] मौलाना महमद अली
ब] हाकीम अजमल खान
क] बॅ. हसन इमाम
ड] मदन मोहन मालवीय

उत्तर
ब] हाकीम अजमल खान
{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.}

-------------------
[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?
अ] केसरी
ब] मराठा
क] अमृतबझार पत्रिका
ड] तरुण मराठा

उत्तर
क] अमृतबझार पत्रिका
{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.}

-------------------
[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?
अ] शाहू महाराज
ब] वि. रा. शिंदे
क] सयाजीराव गायकवाड
ड] बाबासाहेब आंबेडकर

उत्तर
क] सयाजीराव गायकवाड
{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.}

-------------------
[प्र.६] १९४१ साली ___________ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.
अ] रामराव देशमुख
ब] टी. जे. केदार
क] शंकरराव देव
ड] स. का. पाटील

उत्तर
अ] रामराव देशमुख
रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा
टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद
शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव]

-------------------
[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व ______ जिल्हे होते.
अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

उत्तर
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद}
{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.}

-------------------
 [प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
अ] पंडित नेहरू
ब] वल्लभभाई पटेल
क] जे. बी. क्रपलनी
ड] एच. सी. मुखर्जी

उत्तर
ड] एच. सी. मुखर्जी
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते}

-------------------
[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?
अ] पंडित नेहरू
ब] जे. बी. क्रपलनी
क] वल्लभभाई पटेल
ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद

उत्तर
ब] जे. बी. क्रपलनी
-------------------
[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?
अ] सातव्या
ब] आठव्या
क] नवव्या
ड] दहाव्या

उत्तर
ब] आठव्या
{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

-------------------

प्रश्नसंच १०८ - [विज्ञान]

[प्र.१] कोणत्या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून पाळला जातो?
१] डॉ. चंद्रशेखर बोस
२] डॉ.चंद्रशेखर वेंकटरमण
३] डॉ. रामचंद्र वेंकटरमण
४] डॉ. जगदीशचंद्र बोस  

उत्तर
२] डॉ.चंद्रशेखर वेंकटरमण
------------------
[प्र.२] "सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा शोध" कोणी लावला?
१] केप्लर
२] आईनस्टाईन
३] न्यूटन
४] एडिसन

उत्तर
३] न्यूटन
------------------
[प्र.३] कर्करोगात पेशींचे विभाजन कोणत्या पद्धतीने होते?
१] सूत्री विभाजन
२] अर्धसुत्री विभाजन
३] अनियंत्रित सूत्री विभाजन
४] अनियंत्रित अर्धसुत्री विभाजन

उत्तर
३] अनियंत्रित सूत्री विभाजन
------------------
[प्र.४] मानवाची श्राव्य मर्यादा _ _ _ _ _ _ या दरम्यान असते.
१] ०.००२ KHz ते ०.२०२ KHz
२] ०.२ KHz ते २.२ KHz
३] ०.०२ KHz ते २० KHz
४] २ KHz ते २० KHz

उत्तर
३] ०.०२ KHz ते २० KHz
------------------
[प्र.५] रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?
१] १००%
२] ९७%
३] ९०%
४] ५०%

उत्तर
३] ९०%
------------------
[प्र.६] समुद्राचे पाणी निळ्या रंगाचे दिसते कारण............
१] प्रकाशाचे अपवर्तन
२] प्रकाशाचे अपस्करण
३] प्रकाशाचे विकिरण
४] प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परिवर्तन

उत्तर
३] प्रकाशाचे विकिरण
------------------
[प्र.७] पुढीलपैकी कोणता परपोशींचा पोषण गट जैविकदृष्ट्या महत्वाचा आहे?
१] प्राणीसदृश्य
२] परजीवी
३] अंत परजीवी
४] मृतोपजीवी

उत्तर
४] मृतोपजीवी
------------------
[प्र.८] सूर्य सोडून पृथ्वीला सर्वात जवळचा तर कोणता?
१] प्रोक्झीमा सेंटॉरी
२] अल्फा सेंटॉरी
३] ध्रुव तारा
४] वेगा

उत्तर
१] प्रोक्झीमा सेंटॉरी
------------------
[प्र.९] पुढीलपैकी कोणता RNA हा DNA पासून जननिक माहितीचे वाहन करतो?
१] rRNA
२] tRNA
३] mRNA
४] xRNA

उत्तर
३] mRNA
------------------
[प्र.१०] खालीलपैकी अनानिल श्वसन [Anaerobic Respiration] पद्धतीमध्ये कोणत्या क्रियेचा समावेश होत नाही?
१] दुधाचे दही होणे
२] अल्कोहोल तयार करणे
३] पाव तयार करणे
४] सायट्रिक आम्ल तयार करणे

उत्तर
४] सायट्रिक आम्ल तयार करणे
----------------------------------

प्रश्नसंच १०७ - [अर्थशास्त्र]

[प्र.१] खालीलपैकी कोणता कर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आकारला जातो?
१] देणगी कर
२] घरपट्टी
३] उत्पादन शुल्क
४] आयकर

उत्तर
२] घरपट्टी
--------------------------------
[प्र.२] किंमती कमी होत असताना ज्या वस्तूंची मागणी कमी होते आणि किंमती जास्त असताना ज्या वस्तूंची मागणी वाढते त्या वस्तूंना . . . . .
१] संस्फिती वस्तू म्हणतात
२] अपवाद वस्तू म्हणतात
३] जिफ़ेन वस्तू म्हणतात
४] वरील सर्व

उत्तर
३] जिफ़ेन वस्तू म्हणतात
--------------------------------
[प्र.३] चलनघट व चलनवाढ दोन्हींचे सहअस्तित्व असलेल्या परिस्थितीला . . . . . .  
१] मुद्रा अपवाद म्हणतात
२] मुद्रा अपस्फिती म्हणतात
३] मुद्रा संस्फिती म्हणतात
४] यापैकी नाही

उत्तर
१] मुद्रा अपवाद म्हणतात
--------------------------------
[प्र.४] मंदीच्या काळात मुद्दाम घडवून आणलेली चलनवाढीची परिस्थिती म्हणजेच . . . .
१] मुद्रा अपवाद
२] मुद्रा अपस्फिती
३] मुद्रा संस्फिती
४] यापैकी नाही

उत्तर
३] मुद्रा संस्फिती
--------------------------------
[प्र.५] चलनवाढ होत असताना चलनवाढीचा दर कमी होत असेल तर त्यास
१] मुद्रा अपवाद म्हणतात
२] मुद्रा अपस्फिती म्हणतात
३] मुद्रा संस्फिती म्हणतात
४] यापैकी नाही

उत्तर
२] मुद्रा अपस्फिती म्हणतात
--------------------------------
[प्र.६] पतनियंत्रणाच्या राजकोषीय साधनांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होणार नाही?
१] सरकारी खाराचात कपात करणे
२] बँकदर कमी/जास्त करणे
३] शिलकी अंदाजपत्रक मांडणे
४] सार्वजनिक कर्जाची परतफेड थांबविणे

उत्तर
२] बँकदर कमी/जास्त करणे
--------------------------------
[प्र.७] चलनवाढीच्या काळात जनतेने सरकारच्या कर्जरोखे व बॉन्ड्समध्ये केलेल्या गुंतवणुकीचा फायदा
१] सरकारला होतो
२] जनतेला होतो
३] सरकार आणि जनता दोघांना होतो
४] यापैकी नाही

उत्तर
१] सरकारला होतो
--------------------------------
[प्र.८] भारतात चलनवाढीस/किंमतवाढीस आळा घालण्याचे उपाय खालीलपैकी कोणत्या घटकांमार्फत केले जातात?
अ] सरकार
ब] RBI
क] राष्ट्रीयकृत बॅंका
ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था

१] फक्त अ आणि क
२] फक्त अ, ब आणि क
३] अ आणि ब
४] वरील सर्व

उत्तर
३] अ आणि ब
--------------------------------
[प्र.९] चलनवाढीस/किंमतवाढीस नियंत्रित करण्याच्या "राजकोषीय उपायांचा" वापर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
अ] सरकार
ब] RBI
क] राष्ट्रीयकृत बॅंका
ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था

१] फक्त अ
२] फक्त अ, ब आणि क
३] अ आणि ब
४] फक्त ब

उत्तर
१] फक्त अ
--------------------------------
[प्र.१०] चलनवाढीस/किंमतवाढीस नियंत्रित करण्याच्या "चलनविषयक पतनियंत्रणाच्या उपायांचा" वापर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
अ] सरकार
ब] RBI
क] राष्ट्रीयकृत बॅंका
ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था

१] फक्त अ
२] फक्त अ, ब आणि क
३] अ आणि ब
४] फक्त ब

उत्तर
४] फक्त ब
  --------------------------------------

प्रश्नसंच १०६ - [पंचायत राज]

[प्र.१] सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसभेची बैठक बोलाविण्याचा अधिकार कोणाला असतो?
१] उपसरपंच
२] गट विकास अधिकारी
३] तहसीलदार
४] ग्रामसेवक

उत्तर
१] उपसरपंच
------------------
[प्र.२] महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे कामकाज कोणत्या अधिनियमानुसार चालते?
१] महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८  
२] मुंबई इलाखा ग्रामपंचायत अधिनियम, १९४८  
३] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८  
४] मुंबई  ग्रामपंचायत अधिनियम, १९६१  

उत्तर
३] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८
------------------
[प्र.३] ग्रामसभेच्या बैठका बोलविण्याची जबाबदारी कोणाची असते?
१] सरपंच
२] उपसरपंच
३] ग्रामसेवक
४] तहसीलदार

उत्तर
१] सरपंच
------------------
[प्र.४] ७५०१ पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्यसंख्या किती असते?
१] १३
२] १५
३] १७
४] १९

उत्तर
३] १७
------------------
[प्र.५] सरपंच व उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेची बैठक बोलाविण्याचा अधिकार कोणाला असतो?
१] जिल्हाधिकारी
२] गट विकास अधिकारी
३] तहसीलदार
४] ग्रामसेवक

उत्तर
२] गट विकास अधिकारी
------------------
[प्र.६] ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याबाबत अधिकार कोणाला आहेत?
१] तहसीलदार
२] राज्य शासन
३] जिल्हाधिकारी
४] विभागीय आयुक्त

उत्तर
२] राज्य शासन
------------------
[प्र.७] ग्रामसभेच्या असाधारण बैठकीची सूचना सभेच्या तारखेच्या किमान किती दिवस अगोदर द्यावी लागते?
१] ७ दिवस
२] ४ दिवस
३] ५ दिवस
४] १४ दिवस

उत्तर
२] ४ दिवस
[साधारण बैठकीची सूचना सभेच्या तारखेच्या किमान ७ दिवस अगोदर द्यावी लागते]

------------------
[प्र.८] 'प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत' अशी तरतूद मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कोणत्या कलमात केलेली आहे?
१] कलम ७
२] कलम ५
३] कलम ८
४] कलम ३

उत्तर
२] कलम ५
------------------
[प्र.९] एका वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा सभा घेण्यात येतील अशी तरतूद कोणत्या साली करण्यात आली?
१] १९५८
२] १९९५
३] १९९४
४] २००३

उत्तर
४] २००३
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षापेक्षा जास्त असू नये अशी तरतूद केलेली आहे?
१] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २७  
२] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम ०६
३] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २५
४] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २०

उत्तर
१] मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, कलम २७
----------------------

प्रश्नसंच १०५ - [राज्यशास्त्र]

[प्र.१] संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवितो?
१] राष्ट्रपती
२] पंतप्रधान
३] लोकसभा सभापती
४] राज्यसभा सभापती

उत्तर
३] लोकसभा सभापती
--------------------------------
[प्र.२] विधानपरिषदेतील सदस्य संख्या कमीत कमी किती असावी लागते?
१] ५०
२] ४०
३] ६०
४] ३०

उत्तर
२] ४०
--------------------------------
[प्र.३] केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
१] संसदेला
२] जनतेला
३] लोकसभेला
४] पंतप्रधानाला

उत्तर
३] लोकसभेला
--------------------------------
[प्र.४] राज्यघटनेच्या ७व्या परिशिष्टात कशाचा समावेश होतो?
१] केंद्रशासित प्रदेश
२] राष्ट्रपतींचे वेतन
३] केंद्र, राज्य व समवर्ती सूची
४] राज्यसभेतील प्रतिनिधित्व

उत्तर
३] केंद्र, राज्य व समवर्ती सूची
--------------------------------
[प्र.५] कोणत्या कलमांद्वारे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे?
१] २१ ते २४
२] २४ ते २८
३] २५ ते २८
४] २३ ते २५

उत्तर
३] २५ ते २८
--------------------------------
[प्र.६] राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनादुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे?
१] १७ व्या
२] १८ व्या
३] १९ व्या
४] २० व्या

उत्तर
४] २० व्या
--------------------------------
[प्र.७] सार्वजनिक आरोग्य हा विषय कोणत्या सूचीत येतो?
१] राज्य सूची
२] केंद्र सूची
३] समवर्ती सूची
४] वरील सर्व

उत्तर
३] समवर्ती सूची
--------------------------------
[प्र.८] कोणत्या घटनादुरुस्तीने युपीएससीच्या अध्यक्षाचे वय ६० वरून ६२ करण्यात आले?
१] ४१ व्या
२] ४२ व्या
३] ४३ व्या
४] ४४ व्या

उत्तर
१] ४१ व्या
--------------------------------
[प्र.९] उत्तरप्रदेशनंतर लोकसभेत सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या राज्यातून जातात?
१] महाराष्ट्र
२] आंध्रप्रदेश
३] बिहार
४] पश्चिम बंगाल

उत्तर
१] महाराष्ट्र
--------------------------------
[प्र.१०] भारतात न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणाला आहे?
१] फक्त सर्वोच्च न्यायालय
२] फक्त उच्च न्यायालय
३] फक्त कनिष्ठ न्यायालय
४] भारतातील सर्व न्यायालये

उत्तर
१] फक्त सर्वोच्च न्यायालय
----------------------------------

प्रश्नसंच १०४ - [भूगोल]

[प्र.१] दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडक खालीलपैकी कशाचा परिणाम आहे?
१] मूळ खडकांचे अपक्षय
२] नदीमुळे झालेले अपक्षरण
३] शेकडो वर्षांपूर्वी झालेला ज्वालामुखीचा उद्रेक
४] वरील सर्व

उत्तर
३] शेकडो वर्षांपूर्वी झालेला ज्वालामुखीचा उद्रेक
------------------
[प्र.२] नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
१] डमडम-कोलकत्ता
२] पालम-दिल्ली
३] कोपा-गोवा
४] अमृतसर-पंजाब

उत्तर
१] डमडम-कोलकत्ता
------------------
[प्र.३] "चारमिनार" हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरात आहे?
१] आग्रा
२] दिल्ली
३] हैद्राबाद
४] मदुराई

उत्तर
३] हैद्राबाद
------------------
[प्र.४] २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
१] लातूर
२] वाशीम
३] जालना
४] सिंधुदुर्ग

उत्तर
४] सिंधुदुर्ग
------------------
[प्र.५] कसौली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
१] पंजाब
२] उत्तराखंड
३] हिमाचल प्रदेश
४] पश्चिम बंगाल

उत्तर
३] हिमाचल प्रदेश
------------------
[प्र.६] खालीलपैकी कोणती जमात सह्याद्री पर्वत क्षेत्रात आढळत नाही?
१] महादेव कोळी
२] ठाकर
३] गोंड
४] वारली

उत्तर
३] गोंड
------------------
[प्र.७] महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ {MSSIDC} ची स्थापना कधी झाली?
१] १९६०
२] १९६१
३] १९६२
४] १९६३

उत्तर
३] १९६२
------------------
[प्र.८] 'अभोर' व 'अप्तानी' या जमाती कोणत्या राज्यात आढळतात?
१] मेघालय
२] सिक्कीम
३] अरुणाचल प्रदेश
४] त्रिपुरा  

उत्तर
२] सिक्कीम
------------------
[प्र.९] भारतातील खालीलपैकी कोणते क्षेत्र जैवविविधतेला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्यांदा आरक्षित करण्यात आली?
१] निलगिरी
२] पश्चिम घाट
३] काझीरंगा
४] सुंदरबन

उत्तर
१] निलगिरी
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या भागात चहा व कॉफी हि दोन्ही पिके घेतली जातात?
१] ईशान्य भारत
२] नैऋत्य भारत
३] वायव्य भारत
४] आग्नेय भारत

उत्तर
२] नैऋत्य भारत
------------------------------------

प्रश्नसंच १०३ - [इतिहास]

[प्र.१] अहमदाबाद कापड कामगार संघटना कोणी स्थापन केली?
१] मृदुला साराभाई
२] एन.एम.जोशी
३] व्ही.व्ही.गिरी
४] एम.के.गांधी

उत्तर
४] एम.के.गांधी
------------------
[प्र.२] १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले?
१] फ्री इंडिया
२] नया भारत
३] इंडीपेंडॅंट
४] लीडर

उत्तर
४] लीडर
------------------
[प्र.३] क्रिप्स योजनेस "पोस्ट डेटेड चेक" असे कोण म्हणाले?
१] लोकमान्य टिळक
२] न्या.रानडे
३] दादाभाई नौरोजी
४] महात्मा गांधी

उत्तर
४] महात्मा गांधी
------------------
[प्र.४] खालीलपैकी कोणता उठाव सिन्दो आणि कान्हो यांच्याशी संबंधित आहे?
१] १९५५ चा संथाल उठाव
२] १९२०-२७ चा कोल उठाव
३] १८०४-१९०० मुंडा उठाव
४] १८०४-१८१७ ओरिसातील जमीनदारांचा उठाव

उत्तर
१] १९५५ चा संथाल उठाव
------------------
[प्र.५] मद्रास महाजन सभेची स्थापना केव्हा झाली?
१] १८८२
२] १८८३
३] १८८४
४] १८८५

उत्तर
३] १८८४
------------------
[प्र.६] यमुना पर्यटन हि कादंबरी कोणी लिहिली?
१] बाबा पदमजी
२] दादोबा पांडुरंग तर्खडकर
३] आचार्य अत्रे
४] आचार्य विनोबा भावे

उत्तर
१] बाबा पदमजी
------------------
[प्र.७] अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरु केले?
१] विनोबा भावे
२] प्र.के.अत्रे
३] पंजाबराव देशमुख
४] वि.रा.शिंदे

उत्तर
३] पंजाबराव देशमुख
------------------
[प्र.८] अयोग्य विधान निवडा.
१] राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार घातला.
२] गांधीजी दुस-या गोलमेज परिषदेला हजर होते.
३] दुस-या गोलमेज परिषदेनंतर गांधी-आयर्विन करार झाला.
४] जातीय निवाडा हा गोलमेज परिषदेशी संबंधित होता.

उत्तर
३] दुस-या गोलमेज परिषदेनंतर गांधी-आयर्विन करार झाला.
------------------
[प्र.९] ब्रिटिशांनी फुलेंच्या स्त्री शिक्षण कार्यास कशाद्वारे मदत केली?
१] दक्षिण प्राईज फंड
२] महिला मुक्ती फंड
३] पुणा विकास फंड
४] महिला शिक्षण फंड

उत्तर
१] दक्षिण प्राईज फंड
------------------
[प्र.१०] इकता पद्धत सर्वप्रथम कोणी सुरु केली?
१] बल्बन
२] इल्तमश
३] रझिया सुलतान
४] कुतुबुद्दीन ऐबक

उत्तर
२] इल्तमश
----------------------------

प्रश्नसंच १०२ - [सामान्यज्ञान]

[प्र.१] भारतातील पहिली 4G सेवा कोणत्या राज्यात सुरु झाली?
१] महाराष्ट्र
२] पश्चिम बंगाल
३] दिल्ली
४] हैद्राबाद

उत्तर
२] पश्चिम बंगाल
--------------------------------
[प्र.२] हळद या बहुगुणी भारतीय वनस्पतीचे बौद्धिक संपदा हक्क भारतीयांसाठी रक्षण करण्यासाठी कोणत्या शास्त्रज्ञाने आंतरराष्ट्रीय लढा दिला?
१] एम.एस.स्वामिनाथन
२] अनिल काकोडकर
३] रघुनाथ माशेलकर
४] वसंत गोवारीकर

उत्तर
३] रघुनाथ माशेलकर
--------------------------------
[प्र.३] अयोग्य जोडी ओळखा.
१] सूर्य-स्थिरकक्षा - IRS उपग्रह सोडतात
२] भू-स्थिरकक्षा - Insat उपग्रह सोडतात  
३] भू-स्थिरकक्षा - पश्चिम ते पूर्व असे भ्रमण
४] सूर्य-स्थिरकक्षा - पूर्व ते पश्चिम असे भ्रमण

उत्तर
४] सूर्य-स्थिरकक्षा - पूर्व ते पश्चिम असे भ्रमण
--------------------------------
[प्र.४] हवेचे तापमान ५ अंश सेल्सिअसने वाढवल्यास ध्वनीचा हवेतील वेग कितीने वाढेल?
१] ६ m/s
२] ३६ m/s
३] ३ m/s
४] ९ m/s

उत्तर
३] ३ m/s
--------------------------------
[प्र.५] जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो?
१] ११ नोव्हेंबर
२] ९ ऑक्टोबर
३] १० ऑक्टोबर
४] १० नोव्हेंबर

उत्तर
२] ९ ऑक्टोबर
--------------------------------
[प्र.६] 'मर्डेका चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
१] फुटबॉल
२] हॉकी
३] बुद्धिबळ
४] F-1 रेसिंग

उत्तर
१] फुटबॉल
--------------------------------
[प्र.७] अपारंपरिक उर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
१] हिमाचल प्रदेश
२] सिक्कीम
३] महाराष्ट्र
४] केरळ

उत्तर
३] महाराष्ट्र
--------------------------------
[प्र.८] हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
१] कावेरी
२] कृष्णा
३] गोदावरी
४] इरावती

उत्तर
१] कावेरी
--------------------------------
[प्र.९] देशातील कोणत्या केंद्रावरून पहिली FM सेवा सुरु झाली?
१] हैद्राबाद
२] दिल्ली
३] मुंबई
४] मद्रास

उत्तर
४] मद्रास
--------------------------------
[प्र.१०] १० + २ + ३ या शिक्षण प्रणालीचे जनक कोण?
१] मधुकर चौधरी
२] डी.एस.कोठारी
३] यश गुप्ता
४] डॉ. राधाकृष्णन

उत्तर
२] डी.एस.कोठारी
-----------------------------

प्रश्नसंच १०१ - [भूगोल-PSI Pre 2014]

[प्र.१] महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
१] तापी
२] वैनगंगा
३] नर्मदा
४] कृष्णा

उत्तर
२] वैनगंगा
------------------
[प्र.२] एकाच नावाचे तालुके व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] खेड                                                  १] रायगड, अहमदनगर
ब] कर्जत                                               २] रत्नागिरी, पुणे
क] कळंब                                              ३] नाशिक, अमरावती
ड] नंदगाव                                             ४] उस्मानाबाद, यवतमाळ

पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
४] अ-२/ब-४/क-३/ड-१

उत्तर
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
------------------
[प्र.३] म्हैस प्रकार व संबंधित राज्य यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] मु-हा                                   १] उत्तर प्रदेश
ब] भादवरी                                २] पंजाब
क] महेसाना                              ३] हरियाणा
ड] निलीरवी                              ४] गुजरात

पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
४] अ-२/ब-४/क-३/ड-१

उत्तर
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
------------------
[प्र.४] लिंग गुणोत्तर व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] सिंधुदुर्ग                          १] ९३२
ब] रत्नागिरी                          २] ९२७
क] नाशिक                           ३] ११३६
ड] नागपूर                            ४] १०७९

पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-२/ड-१  
४] अ-२/ब-४/क-३/ड-१

उत्तर
३] अ-४/ब-३/क-२/ड-१
------------------
[प्र.५] धबधबे व संबंधित ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] मार्लेश्वर                           १] सातारा
ब] ठोसेघर                             २] रत्नागिरी
क] सौताडा                             ३] अहमदनगर
ड] रंधा                                   ४] बीड

पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-२/ड-१  
४] अ-२/ब-४/क-३/ड-१

उत्तर
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
------------------
[प्र.६] राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व ७ खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात?
१] भोपाळ
२] हैदराबाद
३] नागपूर
४] रायपुर

उत्तर
३] नागपूर
------------------
[प्र.७] आदिवासी जमाती व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] गोंड                          १] अमरावती
ब] भिल्ल                       २] ठाणे
क] कोरकू                      ३] धुळे, नंदुरबार
ड] वारली                       ४] चंद्रपूर, गडचिरोली

पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-१/ड-२  
४] अ-२/ब-४/क-३/ड-१

उत्तर
३] अ-४/ब-३/क-१/ड-२
------------------
[प्र.८] साक्षरता व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] धुळे                                            १] ७२.८%
ब] नागपूर                                        २] ८८.४%
क] नंदुरबार                                      ३] ६४.४%
ड] अमरावती                                    ४] ८७.४%

पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-१/ड-२  
४] अ-१/ब-२/क-३/ड-४

उत्तर
४] अ-१/ब-२/क-३/ड-४
------------------
[प्र.९] कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत?
१] विंध्य रांगा
२] सातपुडा रांगा
३] काराकोरम रांगा
४] कोल्ली  रांगा

उत्तर
१] विंध्य रांगा
------------------
[प्र.१०] योग्य विधाने ओळखा.
अ] सुवर्ण चतुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, बेंगलुरू व कोलकत्ता या प्रमुख शहरांना जोडतो.
ब] उत्तर दक्षिण कोरीडोर (मार्ग) हैदराबाद मधून जातो.

१] अ फक्त
२] ब फक्त
३] अ व ब दोन्ही
४] दोन्हीही नाही

उत्तर
२] ब फक्त
{सुवर्ण चतुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, चेन्नई व कोलकत्ता या प्रमुख शहरांना जोडतो.}

------------------
 [प्र.११] विषुवृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे?
अ] अत्यंत दाट आहेत.
ब] वार्षिक पानगळ होते.
क] लाकूड टणक व टिकाऊ असते.
ड] एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.

१] अ फक्त
२] अ आणि क फक्त
३] अ, क आणि ड
४] अ आणि ड फक्त

उत्तर
३] अ, क आणि ड
------------------
[प्र.१२] योग्य विधाने ओळखा.
अ] घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल द-या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.
ब] घडीच्या पर्वताची निर्मिती टेन्साईल फोर्सेसमुळे होते.

१] अ फक्त
२] ब फक्त
३] अ व ब दोन्ही
४] दोन्हीही नाही

उत्तर
१] अ फक्त
------------------
[प्र.१३] भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास "सनराईझ इंडस्ट्री" असे म्हणतात?
१] खत उद्योगधंदा
२] अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा
३] लोह आणि पोलाद उद्योगधंदा
४] सिमेंट उद्योगधंदा

उत्तर
२] अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा
-----------------------