चालू धडामोडी - १० जानेवारी २०१५

·        श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मैत्रीपालाMaitreepal sirisena सिरीसेना यांचा विजय झाल्यामुळे राजपक्षे यांची १० वर्षांची राजवट संपुष्टात आली.
·        काही दिवसांपूर्वी महिंद्रा राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री असलेले ६३ वर्षांचे ‌ सिरिसेना यांना ५१.२ टक्के, तर राजपक्षे यांना ४७.६ टक्के मते मिळाली.
·        विजयी झालेले सिरिसेना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. श्रीलंकेतील शांतता आणि विकासासाठी भारताचा कायम पाठिंबा असेल, अशी ग्वाही मोदींनी ‌सिरिसेना यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे.
·        तब्बल सहा दशकांनंतर देशाच्या हवाई उड्डाण क्षेत्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या टाटा उद्योगसमूहाच्या नवीन ‘विस्तारा’ एअरलाइन्सचे पहिले विमान शुक्रवारी दिल्लीहून उड्डाण करून मुंबई विमानतळावर उतरले.
·        टाटा समूहाचे अध्यक्ष : सायरस मिस्री
·        सुनंदा यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी सुनिल नावाची व्यक्ती हॉटेल लीला पॅलेसमध्ये त्यांच्यासोबत होती. त्या व्यक्तीने सुनंदा यांनी ट्विट करण्यास तसेच काही मेसेज कॉपी करण्यास मदत केल्याचे थरूर यांचा नोकर नरेन याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
·        हाइक या देशी चॅट मेसेंजरने अमेरिकेतील व्हॉइसhike aquires zip phone कॉलिंग कंपनी ‘झिप फोन’वर ताबा मिळवला आहे. इंटरनेटआधारीत संपर्कासंबंधी उत्पादनांना चालना देण्याच्या उद्देशाने हाइकने ही खरेदी केली आहे.
·        जागतिक स्तरावर व्हॉइस कॉलिंग अॅप सेवा देणाऱ्या झिप फोन या कंपनीची अमेरिकेत अनुज जैन यांनी स्थापना केली होती.
·        ओमर अब्दुल्ला यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्यास नकार दिल्यामुळे केंद्र सरकारला जम्मू काश्मीर राज्यात राज्यपाल राजवट लागू करणे भाग पडले.
·        गेल्या ३८ वर्षांत राज्यात सहाव्यांदा राज्यपाल शासन लागू करण्यात आले आहे.
·        ‘चार्ली हेब्डो’ व्यंगसाप्ताहिकावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करून पॅरिस पोलिसांनी अखेर हे भयनाट्य संपवले.
·        तर त्याचवेळी पूर्व पॅरिसच्या एका ज्यू सुपरमार्केटमध्ये अनेक नागरिकांना ओलिस धरत नवा दहशतअध्याय सुरू केलेल्या हल्लेखोरालाही पोलिसांनी कंठस्नान घातले. मात्र तोपर्यंत त्याने चार निष्पापांना ठार केले होते.
·        ‘चार्ली हेब्डो’ हल्ल्यातील सईद कुआशी आणि चेरिफ कुआशी या बंधूंनी पॅरिसच्या ईशान्येकडील व चार्ल्स द गॉल विमानतळाजवळच्याच दामार्टिन-एन-गोल शहरातील एका गोदामात आश्रय घेतल्याचे पोलिसांना समजताच, त्यांनी या शहराच्या सर्व प्रवेशवाटा बंद केल्या.
·        हेलिकॉप्टर व पोलिसांच्या असंख्य वाहनांनी आठ हजार वस्तीच्या या शहराला वेढा दिला. विमानतळावरील दोन रनवेही बंद केले. नंतर या गोदामाच्या दिशेने कूच करत, पोलिसांनी स्फोटकांनी हल्ला चढवला व त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी आत प्रवेश करीत, त्यांना ठार केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा