चालू धडामोडी - ११ जानेवारी २०१५

·        ११ जानेवारी १८९८ : ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते, मराठीतील विख्यात साहित्यिक वि.स. खांडेकर (विष्णु सखाराम खांडेकर) जन्मदिन
·        ११ जानेवारी १९६६ : लालबहादूर शास्त्री, भारताचे माजी पंतप्रधान स्मृतिदिन.
·        मलमूत्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्यBill Gates बनवणाऱ्या सिएटलमधील जेनिक बायो एनर्जी कंपनीशी गेट्स यांनी भागीदारी केली आहे.
·        या कंपनीच्या सहकार्याने बिल गेट्स माणसाच्या मल-मुत्रावर प्रक्रिया करून वीज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारणार आहेत.
·        ‘ओमनीप्रोसेसर’ नावाच्या या प्रकल्पाची रचना आणि निर्मिती सिएटलची कंपनी, बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन संयुक्तरित्या करणार आहेत.
·        मल-मुत्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून तयार केलेलं पाणी अतिशय शुद्ध असल्याचं गेट्स यांनी स्वत: पाणी प्यायल्यानंतर सांगितलं. या पाण्याची चव बाटलीबंद पाण्यासारखीच असून अतिशय सुरक्षित आणि सर्व नियमांचं पालन करून ते बनवलं जातं. त्यामुळं हे पाणी रोज आनंदानं पिण्याची माझी तयारी आहे, असं गेट्स यांनी ब्लॉगवरील पोस्टमध्ये नमूद केलंय.
·        कोलकाता येथील डमडम रेल्वे स्टेशनवर शनिवारी संध्याकाळी झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात दोन मुले जखमी झाली. एका बॅगमधील टिफिनमध्ये हा बॉम्ब होता.
·        स्फोटानंतर बॉम्बशोथक पथकाला घटनास्थळी आणखी दोन बॉम्ब सापडले. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
·        नीती आयोगाच्या सीईओपदीSindhushree Khullar योजना आयोगाच्या माजी सचिव सिंधुश्री खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली.
·        निवृत्त आयएएस अधिकारी असलेल्या खुल्लर यांची १ जानेवारी २०१५पासून एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
·        पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांसाठीच्या वेतन आयोगाचे माजी अध्यक्ष आणि गुवाहाटी हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती आर. के. मणिसाना (८२) यांचे इम्फाळ येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
·        मणिसाना यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपदही भूषविले होते.
·        नर्मदा नदीवर उभारलेल्या राज्यातील पहिल्या १० मेगाव्हॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‍घाटन संयुक्त राष्ट्राचे सचिव बान की मून यांच्या हस्ते करण्यात आले.
·        ‘चार्ली हेब्डो’ या नियतकालिकाच्या पॅरिस इथल्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं फ्रान्स हादरलं असतानाच, सलग दुसऱ्या दिवशी पॅरिसच्या दक्षिण भागात गोळीबार झाला आहे.
·        या हल्ल्यात एक महिला पोलीस अधिकारी ठार झाली असून एक सरकारी कर्मचारी जखमी झाला आहे.
·        दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये १२ शिलेदार गमावाल्यानंतरही चार्ली डेब्डो साप्ताहिकाने दहशतीला शरण न जाण्याचा आपला बाणा कायम ठेवला आहे.
·        बुधवारी ठरल्याप्रमाणेच साप्ताहिक येईल, असे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. दहशतीच्या वृत्तीचा कधीच विजय होत नाही, असे सदरलेखक पॅट्रिक पेलॉक्स यांनी म्हटले आहे.
·        मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रहमान लख्वीला अफगाणिस्तानी नागरिकाच्या अपहरण प्रकरणामध्ये जामीन मिळाला आहे. मात्र, सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी त्याला कैदेत ठेवण्याच्या आदेशावरील सुनावणी अद्याप प्रलंबित असल्यामुळे त्याची सुटका होणार नाही.
·        पाकिस्तानात वाघा सीमेवर झालेल्या बॉम्बस्फोटाचा संशयित मास्टरमाइंड रूहुल्ला उर्फ असदुल्ला आणि त्याच्या दोन साथीदारांना पाकिस्तानी सुरक्षा दलांनी लाहोरमध्ये एका चकमकीत ठार मारले.
·        असदुल्ला हा तहरिक-ए- तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असल्याचे मानले जाते. गेल्या वर्षी दोन नोव्हेंबरला वाघा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात ६१ जणांचा मृत्यू झाला होता.
·        आयसिस, तालिबान, अल् कायदासारख्या दहशतवादी संघटनांनी इस्लामच्या नावावर जगभरात हिंसाचार चालवला असतानाच चीन सरकारने त्यांच्या देशातील मुस्लिमबहुल उरुम्की शहरात सार्वजनिक ठिकाणी बुरखा बंदी लागू केली आहे.
·        सातत्याने होणारी कर्मचाऱ्यांची गळती रोखण्यासाठी देशातील आघाडीची सॉफ्टवेअर निर्मिती कंपनी असणाऱ्या इन्फोसिस कंपनीने डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत १०० टक्के बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला.
·        तसेच, कंपनीचे सीआईओ विशाल सिक्का यांनी चांगली कामगिरी करणाऱ्या ३०००व‌रिष्ठ अधिकाऱ्यांना आयफोन ६ हा अत्यंत महाग मोबाइल फोन भेट दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा