चालू घडामोडी - १३ जानेवारी २०१५

·        १३ जानेवारी : १९३८ : भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा जन्मदिन.
·        नर्मदा नदीच्या कालव्यावर ३.६ किलोमीटर अखंड लांबीचा १०Canal-top Power project मेगावॉट क्षमता असलेला सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
·        कालव्यावर छत टाकून केलेल्या या प्रकल्पातून दरवर्षी १.६२ कोटी युनिट विजेचे उत्पादन होणार आहे. तसेच यामुळे कालव्यातील प्रवाहाच्या बाष्पीभवनाला आणि प्रदूषणाला आळा बसणार आहे.
·        संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.
·        गुजरात सरकारने ‘सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेड’ ही संस्था स्थापन केली आहे. या प्रकल्पासाठी सरकारने १०९.९१ कोटी रुपये खर्च केले आहेत. कालव्यावर साडेतीन किलोमीटर लांब छप्पर केले असून, त्यावर ३६ हजार सौर पॅनल बसविण्यात आले आहेत.
·        हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) या कंपनीने प्रकल्प पूर्णत्वास नेला असून, पुढील २५ वर्षे कंपनी त्याची देखभाल करणार आहे.
·        ताशी १५० किलोमीटर वेग असलेल्या वाऱ्याचा सामना करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे.
·        पहिल्या वर्षी १.६२ कोटी विजेचे युनिट उत्पादन प्रकल्पातून होणार आहे.
·        सौर पॅनेलमुळे कॅनॉलमध्ये पडणारा कचरा पूर्णपणे बंद झाला आहे. तसेच, उन्हाळ्यात या पाण्याचे होणारे बाष्पीभवन घटेल.
·        ११ महिने राष्ट्रपती राजवट अनुभवणाऱ्या दिल्लीमध्ये ७ फेब्रुवारीDelhi Assembly Elections 2015 रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा निकाल १० फेब्रुवारीला लागेल.
·        भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. केजरीवाल हे ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. तर राजकारणातून निवृत्त झालेल्या शीला दीक्षित यांच्या जागी आता अनुभवी व तरुण अजय माकन यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
·        डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ३१ जागा, तर आम आदमी पार्टीने २८ जागा जिंकल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली लढणारा काँग्रेस पक्ष केवळ ८ जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता.
·        दिल्ली विधानसभा निवडणूकDelhi Election Results 2013 २०१३ :
·        एकूण मतदारसंघ : ७०
·        अनुसूचित जातींसाठी राखीव : १२ जागा
·        एकूण मतदारसंख्या : १ कोटी ३० लाख ८५ हजार २५१
·        एकूण मतदानकेंद्रे : ११ हजार ७६३
·        मतदानाची तारीख : ७ फेब्रुवारी २०१५
·        मतमोजणी : १० फेब्रुवारी २०१५
·        बेंगळुरू, होंबेगौडा येथे झालेल्या ४८व्या राष्ट्रीय खोखो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी केरळचा २ गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले.
·        पुरुष गटात मात्र रेल्वेने महाराष्ट्राला पाच गुणांनी नमवत विजेतेपदाची संधी हिरावून घेतली.
·        स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’- सारिका काळे  (महाराष्ट्र)
·        स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू ‘एकलव्य पुरस्कार’- विलास करंडे (रेल्वे)
·        संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रसिध्द गायिका पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांना मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली.
·        राज्यपालांच्या हस्ते आमोणकर यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
·        श्रीलंकेचे नवे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली आहे.
·        सार्वजनिक बँकांमधील सर्वांत मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँकेने कर्ज बुडवल्याप्रकरणी मल्ल्यांना सहेतूक कर्जबुडवे (विलफुल डिफॉल्टर) ठरविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
                                                    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा