चालू घडामोडी - १४ जानेवारी २०१५

·        १४ जानेवारी : भूगोल दिन व मकरसंक्रांत
·        केरळमधील इदुक्की जिल्हा हाDigital India देशातील पहिला ऑप्टिकल फायबर प्रोजेक्टच्या माध्यमातून जोडण्यात आला आहे.
·        पुढील सव्वा वर्षात म्हणजेच मार्च २०१६ पर्यंत देशातील ५० हजार ग्रामपंचायती राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या (एनओएफएन) माध्यमातून कनेक्ट करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. त्यासाठी डिजिटल इंडिया प्रकल्प राबवण्यात येत आहे.
·        अग्नी क्षेपणास्त्राच्या निर्मितीत मोलाचे योगदान असलेले डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदर यांना केंद्र सरकारने त्यांचे कंत्राट संपण्याच्या १५ महिने आधीच पदावरून दूर केले.
·        देशाची जीवनवाहिनी आणि भारतीय संस्कृतीचं प्रतीक मानली जाणारी गंगा नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असताना, गंगेच्या परियर घाटाजवळ १०४ मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.
·        या घटनेमुळे, गंगेच्या प्रवाहात लहान मुलांचे आणि कुमारिकांचे मृतदेह सोडण्याची एक विचित्र आणि भीषण प्रथा उघड झाली आहे. त्यामुळे गंगेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्हच निर्माण झालंय.
·        जम्मू काश्मीरमधील जनतेने राज्यात सत्ताबदलासाठी कौल दिला असल्याचे सांगत पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाने नॅशनल कॉन्फरन्सने देऊ केलेला पाठिंबा नाकारला.
·        सीबीआयचे माजी अध्यक्ष आणि यूपीएससीचे सदस्य ए.पी.सिंग यांना केंद्र सरकारने युपीएससी सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे.
·        हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व्यंगसाप्ताहिक चार्ली हेब्डोने ५० लाख अंक छापले आहेत. तसंच साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर पुन्हा पैगंबराचे कार्टून काढले आहे.
·        या कार्टूनमध्ये कव्हर पेजवर पैंगबराच्या हाती ‘मी चार्ली आहे’ असं लिहिलेलं असून रडताना दाखवलं आहे.
·        आता छापलेल्या अंकाकडे ‘सर्वाईवर्स इश्यू’ म्हणून बघितलं जातंय. म्हणजे अंकाच्या विक्रीतून मिळणारा पैसा हा हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.
·        चार्ली हेब्डोने साप्ताहिकात पुन्हा पैगंबराचे कार्टून छापण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुस्लिम जगतातून त्याचा निषेध केला जातोय.
·        ‘सेंट्रल बँकिंग’ या ब्रिटीश मासिकाकाडून सेंट्रल बँकिंग अॅवॉर्ड्स २०१५मधील ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ म्हणून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांची निवड झाली आहे.
·        जेट एअरवेजचे मुख्य प्रवर्तक आणि अध्यक्ष नरेश गोयल यांनी ‘जेट एअरवेज’ मधील त्यांचे संपूर्ण, ५१ टक्के शेअर्स पंजाब नॅशनल बँकेकडे तारण ठेवले आहेत.
·        बेंगळुरू फुटबॉल क्लबने डेम्पो क्लबवर २-१ अशा गोलफरकाने मात करत प्रथमच फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बेंगळुरूकडून सुनील छेत्री व रॉबिन सिंग यांनी गोल नोंदवले, तर डेम्पोचा एकमेव गोल टॉल्गे ओझ्बीने केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा