चालू घडामोडी - १५ जानेवारी २०१५

·               १५ जानेवारी : लष्कर दिन
·               आचारसंहिता भंगप्रकरणी केंद्रीय अल्पसंख्यांक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना उत्तर प्रदेश कोर्टाने दोषी ठरवून एक वर्षाच्या तुरुंगवासाची कैद सुनावली. त्यानंतर नक्वी यांची १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.
·               नक्वी यांच्या विरोधात रामपूरमध्ये कलम १८८, १४४, ३४२ आणि ३४३ अतंर्गत गुन्हे नोंदविले होते. सुनावणी दरम्यान, कलम १८८ प्रकरणी त्यांची सुटका केली. मात्र, इतर प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना शिक्षा सुनविण्यात आली.
·               मुख्य निवडणूकV.S.Sampath आयुक्त व्ही. एस. संपत वयाची ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने ते निवृत्त होणार आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह दोन लोकसभा निवडणुका आणि जवळपास सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपत यांच्या कार्यकाळात पार पडल्या.
·               हिंदुत्ववादी आणि जातीयवाद्यांच्या धमक्या आणि सातत्याने होणाऱ्या अपमानाला कंटाळून प्रसिद्ध तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी लिखाणच सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे.
·               त्यांच्या मधोरुबगन या पुस्तकावरून सध्या तामिळनाडूत मोठा वाद सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली असून त्याविरोधात निदर्शने सुरू आहेत.
·               अनेक ऑफिसमध्ये फेसबुकच्याFacebook at work वापरावर बंदी आहे. मात्र कंपन्यांमध्ये अंतर्गत वापर करता येईल यासाठी फेसबुकने “फेसबुक अॅट वर्क” ही नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
·               सध्या प्रायोगिक तत्त्वावर काही कंपन्यांमध्ये याची चाचपणी सुरू असून या कंपन्यांचे कर्मचारी वेबसाइट किंवा अॅपद्वारे या सुविधेचा लाभ घेत आहेत.
·               गुजरातमधील धार्मिक दंगलींप्रकरणी अमेरिकेच्या फेडरल न्यायालयात दाखल करण्यात आलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे.
·               केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमा’अंतर्गत महाराष्ट्राला ५२० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी दिला आहे. यात राष्ट्रीय वैरण विकासकामाच्या ६ कोटी २५ लाख रुपयांचाही समावेश आहे.
·               तसेच राज्य सरकारनेही ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी जाहीर झालेल्या २३ हजार ८११ गावांत जमीन महसुलात सूट दिली आहे.
·               शिवाय वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णत: माफ आणि टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या पंपाची वीजजोडणी न तोडणेबाबत राज्य सरकारने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयाचा शासनादेश काढण्यात आला.
·               भारताच्या भक्ती शर्मा या जलपरीने १ डिग्री तापमानात अंटाक्र्टिका समुद्रात १.४ मैल (२.२५ किमी) अवघ्या ५२ मिनिटांत पार करून विश्‍व विक्रमाची नोंद केली.
·               या कामगिरीबरोबर तिने ब्रिटिश जलतरणपटू लेवीस पुघ आणि अमेरिकन जलतरणपटू लिने कॉक्स यांचा विक्रम मोडला. अशी कामगिरी करणारी ती सर्वात तरुण जलतरणपटू असून, पहिली आशियाई मुलगी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा