चालू घडामोडी - १७ जानेवारी २०१५

·        १७ जानेवारी १७०६ : बेंजामिन फ्रँकलिन जन्मदिन.
·        गुन्हेगारी आणि थरार साहित्यनिर्मिती करणाऱ्या जगभरातील लेखकांचे पहिले संमेलन दिल्लीत १७ जानेवारी रोजी पार पडले.
·        गुन्हेगारी, थरार, पोलिस या विषयांवर क्राइम रायटर्स फेस्टिव्हलमध्ये विचारमंथन होणार आहे.
·        मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाला हिरवा कंदील दिल्याच्याLeela Samson निषेधार्थ सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांच्या पाठोपाठ आणखी आठ सदस्यांनी राजीनामे दिले.
·        इरा भास्कर, लोरा प्रभू, पंकज शर्मा, राजीव मसंद, शेखरबाबू कंजरेला, शाजी करूण, शुभ्रा गुप्ता आणि टीजी थायगराजन यांनी माहिती-प्रसारण खात्याला आपला राजीनामा पाठवला आहे.
·        केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री : अरुण जेटली
·        माहिती व प्रसारण राज्यमंत्री : राज्यवर्धन राठोड
·        ई-गव्हर्नन्सबाबत जिल्हा पातळीवर ठोस कामगिरी केल्याबद्दल जम्मू-काश्मीरला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
·        राज्यातील ई-पंचायत या पथदर्शी प्रकल्पासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २०१३-१४ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पांतर्गत १४७ पंचायती सक्षम केल्या आहेत.
·        ३० जानेवारी रोजी गांधीनगरमध्ये होणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्समध्ये पुरस्कार वितरण सोहळा होईल.
·        बारामुल्ला जिल्ह्यात लष्कर ए तय्यबाच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
·        अबू मौविय असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून, तो पाकिस्तानी नागरिक आहे.
·        काँग्रेस अध्यक्षा सोनियाThe Red Sari Book गांधी यांच्या जीवनावर स्पॅनिश लेखक जेव्हिअर मोरो यांनी लिहिलेले द रेड सारी पुस्तक आता भारतात उपलब्ध झाले आहे.
·        २००८ मध्ये पहिल्यांदा हे पुस्तक स्पॅनिश भाषेमध्ये प्रकाशित झाले होते. मात्र, काँग्रेस सरकारच्या राजवटीमध्ये या पुस्तकामधील मजकुराला आक्षेप घेण्यात आल्याने ते भारतात उपलब्ध झाले होते.
·        या पुस्तकात चुकीच्या, अर्धसत्य माहितीच्या आधारावर लेखन झाले असून त्यातून बदनामी करण्याचा उद्देश असल्याचा आक्षेप सोनियांच्यावतीने २०१० मध्ये नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती.
·        २०१४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ७१४ कोटी, तर काँग्रेसने त्यापाठोपाठ ५१६ कोटी रुपये खर्च केले.
·        निवडणूक आयोगाने २०१४ ची लोकसभा निवडणूक, तसेच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीवर विविध राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या खर्चाची आकडेवारी जारी केली.

No comments:

Post a Comment