चालू घडामोडी - २० जानेवारी २०१५

·        २० जानेवारी १९८८ : खान अब्दुल गफार खान स्मृतीदिन
·        गेल्या चार वर्षांत देशातील वाघांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून आता विविध जंगलांमध्ये2226 Tigers in India तब्बल २२२६ वाघ वास्तव्य करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
·        २०१०च्या व्याघ्रगणनेत देशात १७०६ वाघ आढळले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भारतीय वन्यजीव संस्थांच्यावतीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरणाने देशभरात ट्रान्झिट पद्धतीने व्याघ्रगणना केली. त्यात २२२६ वाघांची नोंद झाली आहे.
·        जगातील एकूण वाघांपैकी तब्बल ७० टक्के वाघ भारतात आहेत.
·        यंदाच्या व्याघ्रगणनेत कर्नाटकात सर्वाधिक ३४० वाघ आढळले असून तामिळनाडूतील व्याघ्र प्रकल्पांमध्ये २२९ वाघांचं वास्तव्य आहे. मध्य प्रदेशात २०८, महाराष्ट्रात १९० आणि बंगालमधील सुंदरबनमध्ये ७६ वाघांची नोंद झाली आहे.
·        द इन्स्टिट्यूट ऑफ चाटर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियामार्फत (आयसीएआय) नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल ८.२३ टक्के लागला.
·        गुडगावच्या विजेंद्र अगरवाल याने ६९.७५ टक्के मिळवत देशात पहिला क्रमांक तर अहमदाबाद येथील पूजा पारीख हिने ६९.५ टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला.
·        नंदुरबार येथील संतोष नानकणी व हावडा येथील निकिता गोयल या दोघांनी ६९.१३ टक्के गुणांसह संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळविला आहे.
·        सरकारच्या धोरणावर आगपाखड करीत लीला सॅमसन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने बोर्डाचे पुनर्गठन करीत अन्य नऊ सदस्यांचीही नियुक्ती केली.
·        डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या मेसेंजर ऑफ गॉड या वादग्रस्त चित्रपटाला Pahlaj Nihlani - New President of Censor Board चित्रपट प्रमाणीकरण अँपिलेट लवादाने (एफसीएटी) मंजुरी दिल्यानंतर लीला सॅमसन यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता.
·        बोर्डाने मनाई केली असतानाही एफसीएटीने प्रदर्शनाला मंजुरी दिल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यांच्या सर्मथनार्थ बोर्डाच्या अनेक सदस्यांनीही राजीनामे दिले होते.
·        सरकारने बोर्डाचे नऊ सदस्यही नियुक्त केले आहेत. या नऊ सदस्यांमध्ये भाजपा नेत्या वाणी त्रिपाठी टिक्कू, चित्रपट निर्माते अशोक पंडित, चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा समावेश आहे. अन्य सदस्यांमध्ये पटकथा लेखक मिहिर भुटा, सय्यद अब्दुल बारी, रमेश पतंगे, कलाकार जॉर्ज बेकर, अभिनेता आणि चित्रपट निर्माता जिविता आणि अभिनेता एस. व्ही. शेखर यांचा समावेश आहे.
·        अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संस्थेकडून (एनएसएस) यंदाचा स्पेस पायोनियर पुरस्कार भारताच्या मंगळ मोहिमेवर काम करणाऱ्या पथकाला जाहीर करण्यात आला आहे.
·        हा पुरस्कार मे महिन्यात टोरंटोमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश विकास परिषदेदरम्यान (आयएसडीसी) देण्यात येणार आहे.
·        आंबा लवकर पिकवण्यासाठी रसायने आणि औषधे यांचा वापर होत असल्याचे कारण देत युरोपीयन युनियनने हापूसवर बंदी घातली होती.
·        ही बंदी युरोपीयन युनियनने मागे घेतली आहे. त्यामुळे  हापूस आंब्याच्या युरोपमधील निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.
·        किरण बेदी यांचे नाव भाजप पक्षाने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा