चालू घडामोडी - २ जानेवारी २०१५

·        २ जानेवारी : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथी, मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक.
·        २ जानेवारी १८८५ : पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज सुरु.
·        पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आणि दिव्यात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होऊन तब्बल सहा तास मध्य रेल्वे ठप्प राहिली.
·        दिवा येथे प्रवाशांनी केलेल्या दगडफेकीत मोटरमन आर. के. चावडा जखमी झाले.
·        बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती.
·        मुंबई किनाऱ्यालगतच्या प्रतिचक्रीवादळामुळे शहरात ढगाळ वातावरण असून वाऱ्यांची दिशा बदलल्याने दिवसाही गारठा जाणवत आहे.
·        बेळगावमध्ये सहा ते आठ फेब्रुवारी दरम्यान मराठी नाट्यसंमेलन होत आहे. या संमेलनात अध्यक्ष फैय्याज शेख यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
·        आजवरच्या नाट्यसंमेलनात संमेलनाध्यक्षांवर कार्यक्रम सादर झालेला नाही. हा प्रयोग पहिल्यांदाच होत
·        देशाच्या स्वातंत्र्यानंतर तीनच वर्षांत, १९५० मध्ये अस्तित्वात आलेल्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती) असे नवे नामकरण केले आहे.
·        नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती)
·        रचना
·        नियोजन आयोगाप्रमाणे पंतप्रधान हेच ‘नीती आयोगा’चे पदसिद्ध अध्यक्ष असतील, तर नियामक मंडळात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल यांचा समावेश असेल.
·        या व्यतिरिक्त या नियामक मंडळात उपाध्यक्ष, पूर्ण वेळ सदस्य, विद्यापाठीच्या अग्रगण्य संशोधन संस्थेतील दोन अर्ध वेळ सदस्य, पंतप्रधानांनी नियुक्त केलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील चार सदस्य, पंतप्रधानांकडून सरकारातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची निश्चित कालावधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येईल.
·        प्रमुख उद्देश
१.    राज्यांच्या स‌क्रिय भागीदारीने राष्ट्रीय विकास साधण्यासाठी दृष्टिकोन विकसित करणे. मुख्यमंत्र्यांना ‘राष्ट्रीय अजेंडा’चे प्रारुप उपलब्ध करून देणे.
२.    सशक्त राज्येच सशक्त देशाची निर्मिती करू शकतो, हे तथ्य स्वीकारून राज्यांबरोबर नियमितपणे संरचनात्मक सहकार्य, तंत्राच्या माध्यमातून सहकार्य आणि संघराज्यास चालना देणे.
३.    गावपातळीवर योजना तयार करण्यासाठी तंत्र विकसित करून हळूहळू उच्च स्तरावर त्याची अंमलबजावणी करणे.
४.    जे क्षेत्र विशेषकरून सोपविले गेले असेल, त्यामध्ये आर्थिक धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेचे हित जोपासणे.
५.    समाजातील आर्थिक मागास घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचा आर्थिक विकास साधणे. योजनाबद्ध आणि दीर्घ काळासाठीचे धोरण तयार करणे.
६.    राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ‘थिंक टँक’ आणि शैक्षणिक व धोरण संशोधन संस्थांना प्रोत्साहन देणे.
७.    विकासाचा अजेंडा राबविण्यास गती देण्यासाठी आंतरक्षेत्रीय आणि आंतरविभागीय आणि मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

·        नियोजन आयोग
·        स्थापना
·        भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात सोव्हिएत युनियनमधील नियोजन आयोगाच्या धर्तीवर देशात १५ मार्च १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.
·        रचना
·        पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष.
·        दैनंदिन कामकाज उपाध्यक्ष पाहायचे. उपाध्यक्षांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा.
·        याशिवाय आठ पूर्ण वेळ सदस्य आणि महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीही आयोगाचे पदसिद्ध सदस्य.
·        कामे
१.    पंचवार्षिक योजनांचा आराखडा तयार करणे. राज्यांच्याही योजनांना मान्यता देणे.
२.    या योजनांनुसार केंद्रीय निधींचे राज्यांना वितरण करणे.
३.    योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे.
४.    विकास योजनांबाबत केंद्र सरकारला शिफारशी करणे.
·        पंचवार्षिक योजना: देशातील भौतिक सुविधा, भांडवल व मानवी संसाधनांचा संतुलित वापर करण्यासाठी योजनेची निर्मिती करणे हे नियोजन मंडळाचे प्रमुख कार्य. नियोजनबद्ध विकासासाठी नियोजन आयोगाने गेल्या ६५ वर्षांत १२ पंचवार्षिक आणि सहा वार्षिक योजना सादर केल्या.
·        २७ नोव्हेंबरला सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन यंत्रणेद्वारे व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
·        गेल्या महिनाभरात गृहमंत्रालयाने सुमारे २२ हजार व्हिसा ऑनलाइन दिले.
·        अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, इस्रायल, जर्मनी, रशिया आदी ४३ देशांमधील नागरिकांसाठी ही ऑनलाइन व्हिसा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
·        हि सुविधा दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, कोची, गोवा, हैदराबाद, तिरुअनंतपुरम, कोलकाता या नऊ महत्त्वाच्या विमानतळांवर सुरू करण्यात आली आहे.
·        आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या खनिज तेलाच्या दरात झालेल्या घसरणीचा लाभ गुरुवारी विमानांच्या इंधनात (जेट फ्युएल) घट होण्यावर झाला. या इंधनाच्या दरात १२.५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली.
·        गुप्तचर विभागात (इंटेलिजन्स ब्युरो) विशेष संचालक पदावर कार्यरत असलेले अशोक प्रसाद, आयपीएस यांची गृहमंत्रालयाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
·        जगातील सर्वांत उंच असलेल्या ‘बुर्ज खलिफा’ या इमारतीवर करण्यात आलेल्या रोषणाईने विश्वविक्रम केला आहे.
·        नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या इमारतीला ७०००० एलईडी बल्बची रोषणाई करण्यात आली होती.
·        भारताने सोडलेल्या मंगळयानाला २ जानेवारीला मंगळाच्या कक्षेत शंभर दिवस पूर्ण झाले.
·        भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘पीएसएलव्ही सी-२५’ या प्रक्षेपकाद्वारे ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळयानाने श्रीहरिकोटा तळावरून उड्डाण केले होते.
·        नऊ महिन्यांच्या प्रवासानंतर २१ सप्टेंबर २०१४ रोजी ते मंगळाच्या कक्षेत दाखल झाले.
·        पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान नेणारा भारत एकमेव देश ठरला आहे.
·        पॅलेस्टाइनला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याचा सुरक्षा मंडळांचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे इस्रायलने त्यांच्या फौजा या प्रदेशातून मागे घेण्याची मुदत आता इ.स. २०१७ झाली आहे.
·        हा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात मांडण्यात आला असता त्याला अर्जेटिना, चॅड, चिली, चीन, फ्रान्स, जॉर्डन, लक्झेमबर्ग व रशिया यांनी पाठिंबा दिला.
·        पाच स्थायी सदस्य देशांपैकी कुणीही नकाराधिकार वापरला नसतानाही हा ठराव फेटाळला गेला. ठराव संमत होण्यास नऊ मते कमी पडली.
·        अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांनी ठरावाला विरोध केला तर इंग्लंड, नायजेरिया व दक्षिण कोरिया, रवांडा व लिथुआनिया या देशांनी तटस्थता बाळगली.
·        महिलांच्या सुरक्षिततेसाठी दिल्ली Himmat App पोलिसांनी  तयार केलेल्या “हिम्मत” या मोबाईल अॅपचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उदघाटन केले.
·        संकटात असताना या अॅपचा  वापर करुन महिलांना पोलिसांची  मदत मिळवता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा