चालू घडामोडी - ९ जानेवारी २०१५

·        ९ जानेवारी : राष्ट्रीय पर्यटन दिन.
·        पत्नी सुशिक्षित आणि स्वतः नोकरी करून आर्थिक कमाई करण्यास सक्षम असली; मात्र ती नोकरी करत नसेल तर पती तिच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळू शकत नाही, असा निकाल देऊन २५ हजार रुपयांची पोटगी पत्नीला देण्याचा आदेश दिल्ली कोर्टाने दिला आहे.
·        नवनव्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी ‘नासा’ने सोडलेल्या केप्लर या यानाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, या यानाने जीवसृष्टीची शक्यता असलेल्या आठ नव्या ग्रहांचा शोध लावला आहे.
·        विशेष म्हणजे, यातील दोन ग्रहांचे पृथ्वीशी खूपच साम्य असून, त्यांचा पृष्ठभागही पृथ्वीसारखा खडकाळ आहे.Kepler
·        पृथ्वीशी साम्य असणाऱ्या दोन ग्रहांना केप्लर - ४३८ बी आणि केप्लर - ४४२ बी अशी नावे देण्यात आली आहेत. हे दोन्ही ग्रह सूर्यापेक्षा छोट्या आणि कमी तापमान असलेल्या ‘रेड ड्वार्फ’ गटातील ताऱ्यांभोवती फिरत आहेत. या दोन्ही ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता ९७ टक्के आहे, असे संशोधक डेव्हिड किपिंग यांनी सांगितले.
·        केप्लर ४३८ बी > परिभ्रमण काळ-३५ दिवस > आकार- पृथ्वीपेक्षा १२ टक्के जास्त
·        केप्लर - ४४२ बी > ताऱ्याभोवती फिरण्याचा काळ-११२ दिवस > आकार-पृथ्वीपेक्षा ३३ टक्के मोठा
·        पॅरिस येथील ‘चार्ली हेब्डो’ या व्यंगसाप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करून १२ लोकांचा जीव घेणाऱ्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाने स्वत:हून पॅरिस पोलिसांपुढं शरणागती पत्करली आहे.
·        शरण आलेला दहशतवादी अवघा १८ वर्षांचा असून हमीद मोराद असं त्याचं नाव आहे.
·        एअर एशियाच्या अपघातग्रस्त ‘क्यूझेड ८५०१’ या विमानाचा मागचा भागही शोधपथकाला सापडल्याने त्यातील ब्लॅक बॉक्सच्या आधारे अपघाताची नेमकी माहिती कळण्यास मदत होणार आहे.
·        हॉलिवूडचा कुंग फू सुपरस्टार जॅकी चेन याचा ३२ वर्षांचा मुलगा जेसी चॅन याला ड्रगसंदर्भातील गुन्ह्यावरून चीनमधील कोर्टाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे तसेच दोन हजार युआन (३२६ डॉलर) एवढा दंडही ठोठावला आहे.
·        त्याने अन्य चौघांना त्याच्या घरात ड्रग घेण्याची परवानगी दिली होती. 
·        तब्बल वीस हजार ठेवीदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणीSubrato Roy गेले नऊ महिने तिहार जेलमध्ये असणारे सहारा ग्रूपचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामिनासाठी विदेशातून डॉलरमध्ये कर्ज घेण्याची अनुमती सुप्रीम कोर्टाने दिली.
·        मात्र, हे पैसे भारतात आणण्याआधी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी, अशी अट घालण्यात आली आहे.
·        सुब्रतो रॉय यांना १० हजार कोटी रुपयांच्या जामिनावर सोडण्यात येईल. मात्र, त्यातील ५ हजार कोटींची रक्कम रोख भरावी लागेल. उर्वरित रक्कम बँक गॅरंटी म्हणून ठेवावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा