चालू घडामोडी - ४ जानेवारी २०१५

·        ४ जानेवारी : आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन.
·        ४ जानेवारी १८८१ : केसरी वॄत्तपत्राची सुरुवात
·        मनुष्यबळ विकासासाठी Indian Science Congress विज्ञान व तंत्रज्ञान या थीमवर मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या १०२व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या ‘प्राइड ऑफ इंडिया’ हे भव्य विज्ञान प्रदर्शन बीकेसीच्या ‘एमएमआरडीए’ मैदानात पार पडले.
·        प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकरही उपस्थित होते.
·        नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हिज्युअल हॅण्डीकॅप्ड (नॅब) ही डेहरादूनची संस्था अवघ्या दोन यंत्रांच्या मदतीने ब्रेल भाषेतील पाठ्यपुस्तकांची छपाई करते.
·        इंग्रजी तसेच मराठी माध्यमाची पहिली ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांवर ‘नॅब’कडून ७५ टक्के सूट दिली जाते मात्र पाठ्यपुस्तकांचा उत्कृष्ट दर्जा राखणे हे वाढत्या छपाईमूल्यामुळे नॅबलाही कठीण झाले होते.
·        केंद्र सरकारने दिलेल्या पावणेदोन कोटी रुपयांच्या सुधारित अनुदानाच्या सहाय्याने नॅबसारख्या संस्थेला राज्यातील १०५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके देता येणार आहे. 
·        राज्यातील अनेक गरजू अंध विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक भार यामुळे हलका होणार आहे. 
·        रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवू पाहणारे काँग्रेस नेते निलेश राणे आणि त्यांच्या ५० कार्यकर्त्यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
·        गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्याच विमानाला पुन्हा टार्गेट करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याचे दिसून येत आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अॅलर्टनंतर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा वाढवली.
·        याआधी १९९९मध्ये दहशतवाद्यांनी कंदहारला जाणारे आयसी ८१४या विमानाचे अपहरण केले होते. 
·        राजस्थान सरकारने रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीसोबत झालेले जमीनीचे करार रद्द करून जमीन परत आपल्या ताब्यात घेतली आहे.
·        स्वयंपाकाच्या गॅसचे सरकारी अनुदान नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसापासून देशभरात लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
·        पहिल्या टप्प्यात देशातील ५४ जिल्ह्य़ांमध्ये ही योजना राबविल्यानंतर आता १ जानेवारीपासून ती उर्वरित ६२२ जिल्ह्य़ांमध्येही अंमलात येणार आहे.
·        ‘थेट लाभार्थी हस्तांतरण योजनें’तर्गत राबविण्यात येणारी ही प्रक्रिया ‘पहल’ (प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ) नावाने ओळखली जाणार आहे. १५ नोव्हेंबर २०१४ पासून सुरू झालेल्या या योजनेशी आतापर्यंत निम्मेच (४३ टक्के) ग्राहक जोडले गेले आहेत.
·        आधार क्रमांक व त्याच्याशी संलग्न असलेल्या बँक खात्यात सरकारमार्फत प्रति सिलिंडर (१४.२ किलो ग्रॅम) ५६८ रुपये लाभार्थीसाठी थेट जमा होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा