चालू घडामोडी - २२ जानेवारी २०१५

·        २२ जानेवारी १९७२ : स्वातंत्र्यचळवळीचे नेते स्वामी रामानंद तीर्थ.
·        केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालीUnion Budget 2015-16 झालेल्या संसदीय कामकाजविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
·        संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २० मार्च आणि २० एप्रिल ते ८ मे दरम्यान होणार असून पहिल्याच दिवशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने त्याची सुरुवात होईल.
·        २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा होईल.
·        २६ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येईल.
·        २७ फेब्रुवारी रोजी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात येईल.
·        २८ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.
·        पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपलात्यामुळे ते निवृत्त झाले आहेत.
·        पाटील यांनी २२ जानेवारी २०१० रोजी पंजाबच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
·        आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी ‘कायम संशयित’ असलेले बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, त्यांचाSrinivasan जावई व चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मैयप्पन तसंच राजस्थान रॉयल्स संघाचा मालक राज कुंद्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला.
·        श्रीनिवासन यांचे चेन्नई सुपर किंग्ज संघाशी व्यावसायिक हितसंबंध असल्याचा ठपका ठेवतानाच असे संबंध असेपर्यंत श्रीनिवासन हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मैयप्पन व कुंद्रा हे फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणी दोषी असल्याचा निर्णयही न्यायालयाने दिला.
·        त्याचवेळी, बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक सहा आठवड्यांच्या आत पुन्हा घेण्याचे आदेशही दिले.
·        नायजेरियातील होतकरू विद्यार्थी आणि आदिवासी सहकारी संस्था यांच्यासाठी काम करणाऱ्या अक्षय जाधव याला प्रतिष्ठेचा राणी एलिझाबेथ तरुण नेतृत्व पुरस्कार जाहीर झाला आहे.
·        मूळचा विदर्भातला असलेला अक्षय कोझिकोडे येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटचा माजी विद्यार्थी आहे.
·        ऑनलाइन रिटेलमधील अग्रणी ‘ईबे’तर्फे एकूण मनुष्यबळापैकी सात टक्के कर्मचाऱ्यांना (२४००) कामावरून काढून टाकण्यात येणार आहे.
·        कंपनीचा एक भाग असणाऱ्या ‘पे पल’ या कंपनीची आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी चालू तिमाहीनंतर २४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे.
·        चालण्याच्या शर्यतीत सहभागी होणाऱ्या रशियाच्या पाच अॅथलीट्सवर रशियाच्या डोपिंगविरोधी समितीने बंदी घातली आहे. यातील तिघे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत.
·        ऑलिम्पिक विजेता सेरगेई किरडॅपकिन आणि ओल्गा कॅनस्किना; तसेच २०११ चा जगज्जेता सेरगेई बकुलिन हे डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने त्यांच्यावर तीन वर्षे आणि दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
·        मुंबईजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी कृती समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, समितीच्या अध्यक्षपदी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
·        अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणारा आशा भोसले पुरस्कार यंदा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हरिहरन यांना देण्यात येणार आहे.
·        १ लाख ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

No comments:

Post a Comment