चालू घडामोडी - ४ फेब्रुवारी २०१५

·        ४ फेब्रुवारी १६७० : कोंढाणा किल्ला लढविताना नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.
·        विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी असलेली पन्नास हजार तिकिटे वीस मिनिटांत संपली आहेत.
·        विश्वकरंडक स्पर्धेत भारत कधीही पाकिस्तानविरुद्ध हरलेला नाही.
·        सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांचा वेतन सुधारणेसाठी होणार्‍या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने बॅंक कर्मचारी संघटनेने २५ फेब्रुवारीपासून चार दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
·        अश्लील आणि शिवराळ भाषेचा वापर झालेल्या वादग्रस्त एआयबी कार्यक्रमाचा व्हिडिओ अखेर यू ट्यूब चॅनेलवरून हटविण्यात आला आहे.
·        शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार श्रीजॉय बोस यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केल्याने सुटका झाली.
·        सतत नवनव्या सुविधा देऊन लोकप्रियता कायम ठेवण्यात यश मिळविलेल्या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक४ फेब्रुवारी रोजी आपला ११वा जन्मदिन साजरा करत आहे.
·        फेसबुकबाबत काही रंजक बाबी
·        १३ वर्षांच्या कोणालाहीHappy Birthday Facebook फेसबुकवर विनामूल्य खाते उघडता येते.
·        फेसबुकवर दररोज ६ लाखवेळा हॅकिंक करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
·        फेसबुकचे अमेरिकेतील युजर्स दररोज सरासरी ४० मिनिटे फेसबुकवर असतात.
·        सर्वसाधारण स्मार्टफोन युजर दिवसातून १४ वेळा फेसबुकला भेट देतो.
·        फेसबुकद्वारे तुम्ही कोणत्या साईटस्‌ला भेट देता हे फेसबुकला माहिती असते.
·        मार्क झुकेरबर्गला लाल आणि हिरव्या रंगाचा आंधळेपणाने असल्याने फेसबुकचा रंग निळा ठेवण्यात आला आहे.
·        फेसबुकवर ३ कोटी मृत युजर्सची खाती आहेत.
·        २००९ पासून चीनमध्ये फेसबुकवर बंदी घालण्यात आली आहे.
·        अमेरिकेत २०११ मध्ये घटस्फोटाच्या एक तृतीयांश प्रकरणांचे कारण हे फेसबुक होते.
·        फेसबुकचा कोणताही युजर मार्क झुकेरबर्गला फेसबुकवर ब्लॉक करू शकत नाहीत.
·        अमेरिकेत मतदान करणाऱ्या नागरिकांपेक्षा फेसबुकवरील युजर्सची संख्या जास्त आहे.
·        इसिस या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेल्या जॉर्डन या देशाच्या वैमानिकाला जिवंत जाळण्यात आल्याचा व्हिडिओ ३ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन प्रसारित करण्यात आला.
·        मोझ अल-कसाबेह असे या वैमानिकाचे नाव आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी मोहिमेत लेफ्टनंट मोझ याचे विमान सीरियातील रक्का येथे दुर्घटनाग्रस्त झाल्याने पडले होते. तेव्हापासून तो इसिसच्या ताब्यात होता.
·        यानंतर काही तासांतच जॉर्डनने इसिसच्या एका दहशतवादी महिलेसह दोघांना फाशी दिली. साजिदा अल-रिशावी आणि जियाद कारबोली अशी फाशी देण्यात आलेल्यांची नावे आहेत.
·        अपहरण करण्यात आलेले पायलट मोझ-अलकसाबेह यांच्या सुटकेसाठी रिशावी हिची सुटका करण्याची तयारीही जॉर्डनने दाखविली होती.
·        इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान बीबीसीसाठी समालोचन करेल. टेस्ट मॅच स्पेशल नावाने ओळखल्या जाणाऱ्या कॉमेंट्री टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. तो उपांत्यपूर्व फेरीपासून समालोचन करेल.
·        ३१  जानेवारी ते १४ फेब्रुवारी ह्या कालावधीत केरळात होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले.
·        केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राच्या २१ वर्षीय मयुरेश पवार या नेट बॉल खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment