चालू घडामोडी - ६ फेब्रुवारी २०१५

·        ६ फेब्रुवारी १९३१ : पंडित मोतीलाल नेहरू, पंडित नेहरूंचे वडिल पुण्यतिथी.
·        ६ फेब्रुवारी १९३९ : सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज पुण्यतिथी.
·        भारतातील डॉल्फिन माशांचे अस्तित्व आता ठळकपणे समोर येणार असून,प्रथमच ओडिशातील भद्रक, बालासोर, बेहरामपूर आणि पुरी या किनारी भागातील डॉल्फिनची गणना केली जाणार आहे.
·        याआधी ही गणना केवळ चिल्का आणि भितरकनिकापुरतीच मर्यादित होती.
·        येत्या १५ फेब्रुवारीपासून या डॉल्फिन गणनेला प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
·        मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याची शिफारस साहित्य अकादमीच्या भाषा तज्ज्ञ समितीने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली आहे.
·        २७ फेब्रुवारी या मराठी भाषा दिनापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जामिळावा यासाठी मराठी भाषामंत्री विनोद तावडे प्रयत्न करत आहेत.
·        जॉर्डनच्या वैमानिकास इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने जिवंतपणी जाळल्याचा सूड घेण्यासाठी जॉर्डनने इसिसवर जोरदार हवाई हल्ले सुरु केले आहेत.
·        हे हवाई हल्ले आमच्या इसिसवरील कारवाईची निव्वळ सुरुवात असल्याचेही जॉर्डनने म्हटले आहे.
·        मोझ अल-कसाबेह या जॉर्डनच्या वैमानिकास जिवंतपणी जाळल्याच्या घृणास्पद घटनेमुळे संपूर्ण अरब जगतामध्ये अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
·        अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला तसेच चित्रपटसृष्टीत अनेक विक्रम नोंदविलेला अत्यंत लोकप्रिय असा शोलेचित्रपट पाकिस्तानमधील चित्रपटगृहात लवकरच प्रदर्शित होणार आहे.
·        पाकिस्तानमधील एक प्रमुख चित्रपट वितरक शोलेपाकिस्तानमध्ये प्रदर्शित करणार आहे.
·        जगातील आघाडीचे सोशल नेटवर्किंगMark Zuckerberg & Priscilla Chan संकेतस्थळ असलेल्या फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांनी सान फ्रान्सिस्को हॉस्पिटल फाउंडेशनला दशलक्ष डॉलर्स, म्हणजे सुमारे ४६५ कोटी ३७ लाख रुपयांची देणगी दिली आहे.
·        या फाउंडेशनची स्थापना १९९४ मध्ये झाल्यापासून ही सर्वांत मोठी देणगी ठरली आहे. या देणगीच्या सन्मानार्थ या रुग्णालयाचे नाव बदलण्यात येणार आहे.
·        प्रिसिला अँड मार्क झुकेरबर्ग सान फ्रान्सिस्को जनरल हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर असे त्याचे नामकरण करून झुकेरबर्ग दांपत्याचा गौरव करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा