चालू घडामोडी - ८ व ९ फेब्रुवारी २०१५

·      स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी थेट ग्राहकाच्या बॅंक खात्यात जमा करण्याच्या पहल योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले.
·      मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला तब्बल सहा वर्षे लोटल्यानंतर सरकारने अखेर मच्छीमारी बोटींमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस (मार्गनिरीक्षण उपकरण) बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
·      बोटींमध्ये हे उपकरण मोफत लावले जाणार असून, या उपकरणाद्वारे समुद्र किनाऱ्यावर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ शकेल तसेच सुरक्षेविषयीच्या धोक्यावर नियंत्रण आणले जाऊ शकेल.
·      सुरक्षेच्या कारणास्तव नायजेरियात १४ फेब्रुवारीला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
·      आता ही निवडणूक २८ मार्चनंतर घेण्यात येईल. सत्ताधारी पिपल्स डेमोक्रेटिक पक्ष (पीडीपी) आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
·      प्रसिद्ध पत्रकार सुजित रॉय यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या “स्वप्नेर फेरीवाला” (ड्रीम मर्चंट) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ग्रंथाला पश्चिम बंगालमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
·      मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रकाशित झालेल्या या ४३० पानी पुस्तकाची पहिली आवृत्ती पहिल्या सहा महिन्यांतच संपली आहे.
·      विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) वरिष्ठ नेते प्रवीण तोगडिया यांना पोलिसांकडून ते १० फेब्रुवारीदरम्यान बंगळूर शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.
·      बंगळूरमध्ये हिंदू विराट संमेलनकार्यक्रमाला तोगडिया उपस्थित राहणार असल्याचे माहिती, पोलिसांना मिळाली होती. प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आणि अनेक गुन्हे दाखल असलेल्या तोगडिया यांना बंगळूर पोलिसांना शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली.
·      पाकिस्तानमध्ये ३.४ मिलियन किलोवॅटची क्षमता असलेल्या सहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी चीनने पाकिस्तानला मदत करण्याचे ठरविले आहे.
·      नॅशनल डेव्हलपमेंट अँड रिफॉर्म कमिशनचे (एनडीआरसी) अधिकारी वँग झियाटाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन पाकिस्तानसह अर्जेंटिनालाही आण्विक तंत्रज्ञान पुरवित आहे.
·      चीन पाकिस्तानला सहा अणुभट्ट्या उभारण्यास मदत करत आहे. या अणुभट्ट्यांतून ३.४ मिलियन किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यासाठी चीनने ६.५ बिलियन डॉलरची मदत केली आहे.
·      आण्वि उर्जा साधने निर्यात करण्यासाठी चीन सध्या अनेक देशांबरोबर चर्चा करत आहे.
·      चीन पाकिस्तामधील पंजाब प्रांतातील चास्मा येथे ३२० मेगावॅट क्षमता असलेल्या दोन अणुभट्ट्या उभारणार आहे. तर, कराचीजवळ प्रथमच ११०० मेगावॅट क्षमता असलेल्या दोन अणुभट्ट्या उभारण्यात येणार आहेत.
·      एनएसजी कार्यक्रमांतर्गत भारत आणि अमेरिकेने दोन अणुभट्ट्या उभारण्याचे ठरविल्यानंतर चीनने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
·      संगीत क्षेत्रातील सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांपैकी दोन पुरस्कारांवर यंदा मूळ भारतीय वंशाच्या संगीतकारांनी मोहोर उमटविली आहे. या पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
·      ग्रॅमी पुरस्कारांचे हे ५७वे वर्ष आहे.
·      रिकी केज याला ‘नवयुगातीलRicky Kej & Neela Vaswani सर्वोत्कृष्ट अल्बम’, तर नीला वासवाणीला ‘लहान मुलांच्या सर्वोत्कृष्ट अल्बम’साठी पुरस्कार जाहीर झाला आहे.
·      ‘आय ऍम मलाला-हाउ वन गर्ल स्टुड अप फॉर एज्युकेशन अँड चेंज्ड् द वर्ल्ड’ या अल्बमसाठी नीला वासवानी हिला पुरस्कार मिळाला आहे.
·      रिकी केज याला त्याच्या ‘विंड्स ऑफ संसार’ अल्बमसाठी पुरस्कार मिळाला.
·      ‘सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम’ पुरस्काराच्या स्पर्धेत अनुष्का शंकर हिचे नाव आघाडीवर होते, मात्र त्यांना या पुरस्काराने हुलकावणी दिली.
·      सॅम स्मिथच्या ‘स्टे वित मी’ (डार्कचाइल्ड व्हर्जन) या गाण्याला वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे, तसेच सर्वोत्कृष्ट रेकॉर्डिंगचा पुरस्कार मिळाला आहे. सॅम स्मिथला सर्वोत्कृष्ट नवा कलाकार म्हणूनही पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
·      अमेरिका चीन या दोन मोठ्या देशांमधील संबंधांना नवा आयाम देण्याच्या दृष्टीने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग २०१५ च्या अखेरीस अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा