चालू घडामोडी - २३ जानेवारी २०१५

·        २३ जानेवारी १९२६ : बाळासाहेब ठाकरे जन्मदिन
·        २३ जानेवारी १९१९ : राम गणेश गडकरी स्मृतिदिन
·        भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी आणि अध्यक्षीय कारकिर्दीत भारताला दोन वेळेस भेट देणारे अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष - बराक ओबामा
·        देशात मुलींचे कमी होत असलेल्या प्रमाणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलींच्या सबलीकरणासाठी पंतप्रधानBeti Bachao Beti Padhao नरेंद्र मोदी यांनी पानिपत हरियाणा येथे  “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाला सुरवात केली.
·        केंद्रीय दळणवळण मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी या अभियानाच्या टपाल तिकिटाचेही उद्‌घाटन केले.
·        या वेळी मोदी यांनी “सुकन्या समृद्धी योजने”चेही उद्‌घाटन केले. या योजनेनुसार, दहा वर्षांखालील मुलगी बॅंकेत आपले खाते उघडू शकते.
·        अभिनेत्री माधुरी दीक्षित या योजनेच्या ब्रॅंड ऍम्बेसिडर आहेत.
·        यिंगलुक शिनावात्रा या थायलंडच्या माजी महिला पंतप्रधानांविरोधात चालविण्यात आलेल्या महाभियोगास देशाच्या लोकप्रतिनिधींनी मान्यता दर्शविल्यानंतर शिनावात्रा यांच्यावर पाच वर्षांची राजकीय बंदी घालण्यात आली.
·        थायलंडमधील विवादास्पद तांदूळ अनुदान योजनेमध्ये शिनावात्रा यांचा सहभाग आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आले.
·        तांदूळ अनुदान योजना -
·        या योजनेंतर्गत शिनावात्रा यांनी तांदळाच्या जागतिक किंमतीच्या तुलनेत कितीतरी अधिक किंमतीने देशातील शेतकऱ्यांकडून तांदूळ विकत घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यामुळे थायलंडच्या तांदूळ निर्यातीवर विपरित परिणाम झाला.
·        देशामधील शेतकऱ्यांची मते मिळविण्यासाठी शिनावात्रा यांनी अशा प्रकारची योजना आखल्याचे देशातील भ्रष्टाचारविरोधी म्हटले आहे.
·        या प्रकरणी दोषी आढळल्यास शिनावात्रा यांना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
·        मेसेसिंग जगतातील लोकप्रिय अॅप असलेले व्हॉट्सअॅपचे संदेश आता मोबाइलबरोबरच डेस्कटॉपवरूनही पाठवता येणार आहेत.
·        आपल्या कोट्यवधी ग्राहकांना वेब ब्राऊजरमधून व्हॉट्सअॅप संदेश पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्याच्या या सुविधेची फेसबुकने घोषणा केली. ‘मिरर’ असे या वेब ब्राऊजरचे नाव असेल.
·        फेसबुकची मालकी असलेले हे अॅप्लिकेशन जगभर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.
·        तेल व नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यासंदर्भात पूर्णत: भारतावर अवलंबून असलेल्या नेपाळला वायुवाहिनीद्वारे (पाईपलाईन) एलपीजी व नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्यासंदर्भात पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्‍वासन भारताकडून देण्यात आले आहे.
·        दोन देशांमध्ये याआधीच वाहिनीद्वारे पेट्रोलियमचा पुरवठा करण्यासंदर्भातील करार झाला आहे.
·        भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायु राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) : धर्मेंद्र प्रधान
·        लष्करी विशेषाधिकार कायद्याविरोधात मागील चौदा वर्षांपासून उपोषण करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांच्या सुटकेचे आदेश मणिपूरमधील सत्र न्यायालयाने दिले आहेत.
·        शर्मिला यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा कोणताही पुरावा नाही, त्यामुळे त्यांची सुटका केली जावी असे आदेश न्यायालयाने दिल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.
·        आयपीएलच्या गेल्या मोसमातील स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली. तब्बल सतरा महिने ही प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार गुरुनाथ मय्यपन आणि राज कुंद्रा यांना सट्टेबाजीत दोषी धरण्यात आले आहे.
·        श्रीनिवासन यांना दोषमुक्त केले असले, तरी परस्पर हितसंबंधाचा निकष लावत त्यांना बीसीसीआयची निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
·        थोडक्‍यात निकाल
·        सहा आठवड्यात बीसीसीआयने नव्याने निवडणूका घ्याव्यात. श्रीनिवासन यांना निवडणूक लढविण्यास बंदी
·        बीसीसीआयच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचे व्यावसायिक हितसंबंध नसावेत
·        श्रीनिवासन यांना आयपीएलचा संघ घेण्यास परवानगी देणारा ६.२.४ नियम पूर्णपणे चुकीचा
·        बीसीसीआय ही सार्वजनिक संस्था. त्यांची एकाधिकारशाही मोडण्यासाठी कुठलाही कायदा सरकार आणू शकत नाही.
·        श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन आणि राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा हे संघाचे अधिकारी. सट्टेबाजीत त्यांचा थेट संबंध
·        चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे भवितव्य ठरविण्याचा अधिकार निवृत्त न्यायाधीश आर. एम. लोढा, अशोक भान आणि आर. व्ही. रवींद्रन यांची नवी समिती नियुक्त.
·        काही दिवसांपूर्वी हौती बंडखोरांनी सत्ता उलथविण्याचा आक्रमक होत अध्यक्षांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर येमेनचे अध्यक्ष अब्द-रब्बू मन्सूर हदी यांनी राजीनामा दिला.
·        हदी यांच्या राजीनाम्यामुळे येमेन अधिक अस्थिर झाला असून, येथील गदारोळात आणखी भर पडली आहे. यामुळे अल-कायदाविरुद्धच्या लढाईत अमेरिकेचा एक महत्त्वाचा सहकारी गळाला आहे.
·        होतीस संघटनेला इराणचे पाठबळ असून, येमेन सरकारच्या विरोधातील हा प्रमुख बंडखोर गट आहे. त्यांनी सप्टेंबरमध्ये सना हे राजधानीचे शहर ताब्यात घेतले आहे.
·        अमेरिकेचा जवळचे मित्रराष्ट्र असलेल्या सौदी अरेबियाचेKing Abdulla राजे अब्दुल्ला यांचे निधन झाले. अब्दुल्ला हे ९० वर्षांचे होते.
·        दहशतवादविरोधी लढाईमध्ये अमेरिकेने अल कायदा विरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत अब्दुल्ला यांनी सहभाग घेतला. अत्यंत पुराणमतवादी अशा मुस्लिम राजवटीत महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणत आधुनिक बनविण्याचा प्रयत्न अब्दुल्ला यांनी केला.
·        महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
·        अब्दुल्ला यांचे ७९ वर्षीय सावत्रभाऊ युवराज सलमान यांना त्यांचे वारसदार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
·        फ्रान्सने मुस्लिम समुदायाच्या भावना दुखाविल्याबद्दल शाही इमाम पंजाबने फ्रान्स विरोधात फतवा जारी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा