चालू घडामोडी - १२ फेब्रुवारी २०१५

·        १२ फेब्रुवारी १८०९ : अब्राहम लिंकन जन्मदिन (अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष)

·        दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

·        दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराजयाला सामोरे जाणाऱ्या भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून शाही इमाम यांच्या वादग्रस्त फतव्यामुळे मतदान स्वातंत्र्यावर गदा आली आणि आपले मताधिक्‍य घटले, असा आरोप केला आहे.

·        मतदानाला काही दिवस राहिलेले असताना फेब्रुवारी रोजी कृष्णनगर विधानसभा मतदारसंघातील आप उमेदवाराच्या समर्थनार्थ जामा मशीदचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी आवाहन करत मुस्लिम मतदारांनी आपला पाठिंबा द्यावा, असे म्हटले होते. बुखारी यांच्या आवाहनावर भाजप नेत्यांनी टीका करत हा फतवा असल्याचे म्हटले होते.

·        दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेतली.

·        या भेटीदरम्यान केजरीवाल यांनी प्रामुख्याने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली.

·        नितीशकुमार यांची बिहारमधील संयुक्त जनता दल पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी करण्यात आलेली निवड पाटणा उच्च न्यायालयाने अवैध ठरवली.

·        झारखंड विकास मोर्चाच्या (झाविमो) सहा आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या उपस्थितीत या आमदारांचे स्वागत करण्यात आले.

·        ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत आता भाजपच्या आमदारांची संख्या ४३ झाली आहे.

·        ऍपल कंपनीचे शेअर बाजारातील भांडवल ७०० अब्ज डॉलर्सवर पोचले असून, जगात सर्वांत जास्त भांडवल असणारी ही पहिली कंपनी ठरली आहे.

·        ऍपल कंपनीचे भांडवल भारतीय चलनात ४२ लाख कोटी रुपये एवढे असून, हे प्रमाण भारतीय अर्थव्यवस्थेच्या एक तृतीयांश इतके असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

·        ऍपल आता सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्येही प्रवेश करणार असून, यासाठी फर्स्ट सोलर कंपनीसोबत करार केला जाणार आहे.

·        बाफ्टा २०१५ चित्रपट महोत्सवात रिचर्ड लिंकलेटर यांच्या बॉयहुड चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासह तीन महत्त्वाचे पुरस्कार पटकावले.

·        द ग्रॅण्ड बुडापेस्ट हॉटेल चित्रपटास सर्वाधिक पाच पुरस्कार चित्रपटास मिळाले.

·        दिवंगत आमदार गोविंद राठोड यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत डॉ. तुषार राठोड (भाजप) विजयी झाले.

                                       

Arvind Kejriwal meets Narendra Modi

No comments:

Post a Comment