चालू घडामोडी - २५ जानेवारी २०१५

·      २५ जानेवारी : राष्ट्रीय मतदार दिन
·      तीनदिवसीय भारत भेटीवर आलेलेObama Visits India अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले.
·      इस्लामिक स्टेट ऑफ सराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या जपानच्या दोन नागरिकांपैकी एकाची हत्या केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
·      इसिसने हत्या केलेला जपानी नागरिक हरुना याकुवा याच्यासह केंजी गोटो यांचेही गेल्यावर्षी अपहरण करण्यात आलेले होते.
·      इसिसने हा व्हिडिओ प्रसिद्ध करताना दुसरा जपानी नागरिक सुखरूप हवा असेल तर पैशांची मागणी केली आहे. यापूर्वी इसिसने या दोन्ही नागरिकांच्या सुटकेसाठी १२०० कोटी रुपयांची मागणी केली होती.
·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्चशिक्षण घेताना लंडनमध्ये वास्तव्य केलेले ऐतिहासिक घर राज्य सरकारने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री विनोद तावडे यांनी आज ट्‌विटरद्वारे सांगितले.
·      हेरिटेज वास्तू
·      डॉ. आंबेडकरांनी १९२१-२२ या काळात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये शिकताना १०, किंग हेन्री रोड या निवासस्थानी वास्तव्य केले होते.
·      हे निवासस्थान ब्रिटिश सरकारनेही हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर केली असून, भारतीय सामाजिक लढ्याचे अग्रणी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा निवास येथे होता,”अशी पट्टीकाही घरावर लावली आहे.
·      अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर आल्यानंतर व्हाईट हाऊसकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये जय हिंद असा उल्लेख करण्यात आला आहे.
·      राज्यात २६ जानेवारी २०१५ रोजी जलमुक्त शिवार अभियानचे उद्घाटन होणार आहे.
·      ग्रामविकास खात्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत १० हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
·      ग्रामविकास मंत्री: पंकजा मुंडे
·      भारतीय निवडणूक आयोग २५ जानेवारीला देशभरात पाचवा राष्ट्रीय  मतदार दिन साजरा करत असून यंदाची  संकल्पना सोपी नोंदणी, सोपी दुरुस्ती अशी आहे.
·      राष्ट्रीय कार्यक्रम नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु स्टेडिअमच्या भारत्तोलन सभागृहात माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली  होणार आहे.
·      निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली असून मतदारनोंदणी वाढवणे, खासकरुन पात्र नवमतदारांची  नोंदणी करुन घेणे हे राष्ट्रीय मतदार दिनाचे उद्दिष्ट आहे.
·      अस्तंगत होत चाललेल्या गिधाडांची संख्या वाढत असल्यामुळे चर्चेत आलेले अभयारण्य: कुनो वन्यजीव अभयारण्य (मध्य प्रदेश)
·      २००३ मध्ये मोठ्या संख्येने मरण पावल्यामुळे गिधाडे अस्तंगत होण्याचा धोका निर्माण झाला होता.
·      राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ५८ करण्याचा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सरकारचा निर्णय पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे.

No comments:

Post a Comment