चालू घडामोडी - ११ फेब्रुवारी २०१५

·        ११ फेब्रुवारी १८४७ : थॉमस अल्वा एडिसन जन्मदिन (विद्युतप्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक.)
·        दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागा जिंकून ‘आप’ने दिल्लीत नवा इतिहास रचला आणि ‘मोदी चमत्कारा’च्या आशेवर असलेल्या भाजपच्या वाट्याला फक्त तीन जागा आल्या. कॉंग्रेस आणि बसप ला भोपळाही फोडता आला नाही.
·        गेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा ३२ मिळाल्या होत्या आणि ‘आप’ला दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजेच २८ जागा मिळाल्या होत्या, काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या.
·        दिल्लीमध्ये मिळालेल्या एकतर्फी विजयानंतर अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारीला रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
·        केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या नूपुर शर्मा यांचा ३१ हजार ५८३ मतांनी पराभव केला.
·        विशेष म्हणजे, गेल्या वर्षी केजरीवाल यांनी १४ फेब्रुवारीलाच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ४९ दिवसांचे सरकार चालवून गेल्या वर्षी राजीनामा दिलेले केजरीवाल आता बरोबर एक वर्षानंतर मात्र अधिक शक्तीने आणि संपूर्ण बहुमताच्या जोरावर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
·        दिल्ली निवडणूक निकालाची वैशिष्ट्ये
·        विधानसभेत आपच्या पाच महिला सदस्य.  
·        भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदींचा पराभव
·        दारुण पराभवानंतर काँग्रेसचे नेते अजय माकन यांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा
·        सर्व जागा लढवूनही बसपला एकही जागा नाही
·        केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर प्रथमच जोरदार धक्का
·        ‘आप’च्या तिकीटावर चार मुस्लिम उमेदवार विजयी
·        किरण बेदींना पराभूत करणारे एस.के.बग्गा ठरले जायंट किलर
·        अरविंद केजरीवाल : पारितोषिके, मानसन्मान -
Arvind Kejriwal
·        २००४ - अशोका फेलो
·        २००५ - कानपूर आयआयटीतर्फे सत्येंद्र दुबे स्मृती पारितोषिक
·        २००६ - रेमन मॅगसेसे पारितोषिक
·        २००६ - सीएनएन- आयबीएनतर्फे ‘इंडियन ऑफ इयर’ सन्मान
·        २००९ - आयआयटी खरगपूरतर्फे सर्वोत्कृष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार
·        २००९ - असोशिएशन फॉर इंडियाज डेव्हलपमेंटतर्फे फेलोशिप आणि निधी
·        २०१० - इकॉनॉमिक टाइम्सतर्फे ‘कॉर्पोरेट एक्‍सलन्स’ पारितोषिक
·        २०११ - ‘एनडी टीव्ही’तर्फे अण्णा हजारे यांच्यासोबत ‘इंडियन ऑफ इयर’ पारितोषिक
·        बिहार विधानसभेतील आपली ताकद दाखवून देण्यासाठी संयुक्‍त जनता दलाचे नेते नितीशकुमार १३० आमदारांना सोबत घेऊन आज दिल्लीत दाखल झाले.
·        उद्या नितीशकुमार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार असून, आमदारांची ओळख परेड घेण्यात येईल.
·        रशिया ईजिप्तला देशातील पहिलावाहिला आण्विक प्रकल्प बांधण्यासाठी मदत करणार असल्याची एकत्रित घोषणा दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे.
·        त्याचबरोबर रशिया व ईजिप्तमधील इतर व्यापाराबरोबरच नैसर्गिक वायुच्या व्यापाराचा अधिकाधिक विकास केला जाण्याची घोषणाही रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी यांनी संयुक्तरित्या केली.
·        इसिस या दहशतवादी संघटनेने अपहृत केलेल्या अमेरिकेच्या महिला नागरिक कायला जीन म्यूलर यांची हत्या केल्याचे, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
·        राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने येमेनमधील आपला दुतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
·        अमेरिकेतील एनबीसी या पत्रकारितेच्या क्षेत्रामधील प्रसिद्ध कंपनीने ब्रायन विल्यम्स (वय ५५) या कंपनीच्या ख्यातकीर्त वृत्तनिवेदकास खोटे बोलल्याबद्दल सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे.
·        विल्यम्स याने २००३ मधील इराक युद्धादरम्यान केलेल्या वार्तांकनाचे अनुभव सांगताना खोटी माहिती दिल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा