चालू घडामोडी - १७ फेब्रुवारी २०१५

·        १७ फेब्रुवारी १८३६ - स्वामी रामकृष्ण परमहंस जयंती
·        १७ फेब्रुवारी १८७१- हिंदू धर्माचे पहिले मिशनरी विष्णूबुवा ब्रम्हचारी यांचे निधन
·        जेष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामीGovind Pansare विचारवंत, कामगार व श्रमिकांचे कैवारी गोविंद पानसरे ऊर्फ अण्णा (वय ७८) व त्यांच्या पत्नी सौ. उमा (७०) यांच्यावर कोल्हापूर येथे प्राणघातक हल्ला झाला.
·        दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ‘मॉर्निंग वॉक’ करून घरी परतत असताना शास्त्रीनगरजवळील आयडियल कॉलनी येथील घराजवळ सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.
·        विनम्रता, उत्तम वक्ता, सामाजिक जाण असलेलेR.R.Patil नेतृत्व आणि मोकळे-ढाकळे व्यक्तिमत्त्व, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. ऊर्फ आबा पाटील (वय ५७) यांचे निधन झाले.
·        सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्‍यातील अंजनी या छोट्या गावात एका सामान्य कुटुंबात आबांचा जन्म झाला.
·        राज्याचे ग्रामविकासमंत्री ते उपमुख्यमंत्री म्हणून आबांनी गेल्या पंधरा वर्षांत यशस्वी धुरा सांभाळली. ग्रामविकास आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी विविध समाजपयोगी योजना राबवल्या. आबांच्या संकल्पनेतील निर्मल ग्राम योजना केद्र सरकारने स्वीकारली.
·        २००४ मध्ये राज्यात डान्स बार बंदी कायदा आणून आबांनी तरुणाईत पसरलेली नशेची विषवल्ली रोखण्याचा प्रयत्न केला.
·        साडेतीन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या आबांचे मुंबईत लीलावती रुग्णालयात निधन झाले.
·        नाव - रावसाहेब रामराव पाटील
·        १६ ऑगस्ट १९५७ रोजी सांगलीमध्ये तासगाव तालुक्‍यातील अंजनी गावात जन्म
·        प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत श्रमदान करून शिक्षण
·        सांगलीतील शांतिनिकेतन महाविद्यालयात कला शाखेची पदवी आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण
·        उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता
·        राजकीय प्रवास
·        १९७९ ते १९९० पर्यंत जिल्हा परिषद सदस्य
·        १९९० पासून सलग सहा वेळा आमदार
·        ग्रामविकास मंत्रालयाची यशस्वी धुरा
·        गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचं सर्वस्वी श्रेय आबांना
·        उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून मोठी जबाबदारी
·        भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी नागरी अणुसहकार्य करारावर स्वाक्षरी करताना संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावरही भर देण्याचा निर्णय घेतला.
·        पूर्व अफगणिस्तानमध्ये असलेल्या पोलिस मुख्यालयावर चार आत्मघाती हल्लेखोरांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात २२ पोलिस ठार झाले.
·        दुसरी घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. पाकिस्तानमधील पूर्व लाहोरमध्ये असलेल्या पोलिस मुख्यालयावर आत्मघाती हल्ला झाला असून, यामध्ये पोलिस ठार झाले आहेत.
·        तालिबान या दहशतवादी संघटनेने दोन्ही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
·        भारतीय सैन्य दलाचे जवान व आसामच्या पोलिसांनी संयुक्तरीत्या राबविलेल्या कारबी अंगलॉंग (आसाम) येथील १६ तासांच्या मोहिमेनंतर ७ दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक करण्यात यश आले आहे.
·        ‘कारबी पीपल्स लिबरेशन टायगरचे’ (केपीएलटी) दहशतवादी जंगलामध्ये लपून बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. भारतीय जवान व पोलिसांनी जंगलामध्ये संयुक्तरीत्या शोध मोहिम राबविली.
·        पश्‍चिम अमेरिकेमधील वॉशिंग्टन राज्यातील एका हिंदु मंदिरावर हल्ला करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या देशातील हिंदु समुदायामध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
·        वॉशिंग्टन येथील सिऍटल मेट्रोपोलिटन भागामधील मंदिरावर काही समाजकंटकांनी हल्ला करून या मंदिराच्या भिंतीवर ‘गेट आऊट’ असा संदेशही लिहिला होता.
·        हे मंदिर अमेरिकेमधील सर्वांत मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.
·        आम आदमी पक्षाचे प्रमुख अरिवद केजरीवाल यांनी दिल्लीचे आठवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
·        केजरीवालांचे नवे मंत्रिमंडळ
·        मनीष सिसोदिया : उपमुख्यमंत्री, शिक्षण, नगरविकास आणि अर्थ
·        गोपाल राय : वाहतूक, कामगार, ग्रामविकास आणि सामान्य प्रशासन
·        सत्येंद्र जैन : ऊर्जा, आरोग्य, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, पूरनियंत्रण
·        असिम अहमद खान : अन्न व नागरी पुरवठा, पर्यावरण आणि वन
·        संदीप कुमार : महिला व बालकल्याण
·        जितेंदर सिंग तोमर : कायदा
                                           

No comments:

Post a Comment