चालू घडामोडी - २६ फेब्रुवारी २०१५

·        २६ फेब्रुवारी १९६६ : थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी
·        सौर कृषिपंप वितरण :
·        केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय स्तरावर एक लाख सौर कृषिपंप वाटप करण्यात येणार
·        राज्यात हजार ५४० सौरऊर्जा पंपांचे वितरण करण्यात येणार असून, यासाठी सुमारे ४४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
·        राज्याच्या वाट्याची पाच टक्के रक्कम (२२ कोटी २५ लाख रुपये) हरित ऊर्जा निधीमधून देण्यात येणार आहे.
·        सुरवातीला या योजनेंतर्गत राज्यासाठी हजार ६०० सौर कृषिपंप वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.
·        योजनेची अंमलबजावणीमहावितरणमार्फत करण्यात येईल. तसेच, महाऊर्जामार्फत तांत्रिक साह्य पुरविण्यात येईल.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शेतकऱ्यांसाठी  शेतजमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी व खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत बिघडू नये यासाठी मृदा स्वास्थ्य कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) योजना सुरु केली आहे.
·        सोशल नेटवर्किंगवर आत्महत्यांचे पोस्ट्‌स टाकून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी फेसबुकने पाऊल उचलले असून आता वापरकर्त्यांना अशा पोस्ट्‌स रिपोर्ट करण्याची व मदतीसाठी हेल्पलाईनला संपर्क करण्याची सुविधाही मिळणार आहे.
·        फेसबूक व ‘फोरफ्रंट : इनोव्हेशन इन सुसाइड प्रिव्हेंशन’ या वॉशिंग्टन विद्यापीठातील संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा तयार करण्यात आली आहे.
·        एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली एक कार घेऊन नाटोच्या अफगाणिस्तानातील एका प्रमुख अधिकाऱ्याच्या गाडीला धडक दिली. यामध्ये एक तुर्कीश सैनिक मारला गेला, तर एकजण जखमी झाला.
·        टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना ऑटोमोटिव्हRatan Tata इंजिनिअरिंग क्षेत्रात डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दक्षिण कॅरोलिना येथे होणाऱ्या ऑटोमोटिव्ह शिखर परिषदेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
·        रतन टाटा यांनी १९६२ मध्ये टाटा समूहात प्रवेश केला होता. त्यानंतर १९८१ साली त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले होते.
·        कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्चरची पदवी मिळवल्यानंतर टाटा यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्यवस्थापन (अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम) क्षेत्रात उच्चशिक्षण घेतले आहे.
·        भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मे पासून कोणताही क्रमांक कोणत्याही सेवापुरवठादाराकडे हस्तांतरिक करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे भारतातील मोबाईलधारकांना मोबाईल क्रमांक न बदलता कोणत्याही सेवा पुरवठादारांकडे हस्तांतरित करता येणे शक्‍य होणार आहे.
·        यापूर्वी एखादा क्रमांक अन्य सेवापुरवठादाराकडे हस्तांतरित करण्यासाठी मर्यादा होत्या. मूळ सेवापुरवठादाराच्या सेवा ज्या परिक्षेत्रात उपलब्ध आहेत तेथेच मोबाईल क्रमांक अन्य सेवापुरवठादारांकडे हस्तांतरीत करता येणे शक्‍य होते.
·        मात्र. ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार कोणताही ग्राहक कोणत्याही सेवापुरवठादाराकडील कोणताही क्रमांक भारतातील कोणत्याही ठिकाणी अन्य सेवापुरवठादारांकडे हस्तांतरित करू शकेल.
·        चारशे युनिटपर्यंत वीज वापरावर पन्नास टक्के दरकपात करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा थेट फायदा ९० टक्के दिल्लीकरांना होणार आहे.
·        बिल्डर प्रदीप जैन यांच्या खून प्रकरणातील दोषी कुख्यात गुन्हेगार अबू सालेम आणि मेहंदी हसन यांना विशेष ‘टाडा’ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
·        सालेमने दुबईत असताना १९९५ मध्ये जैन यांची हत्या घडवून आणली होती.
·        भ्रष्टाचारासंदर्भातील प्रकरणांच्या सुनावणीसाठी उपस्थित न राहिल्याने बांगला देशमधील न्यायालयाने विरोधी पक्ष नेत्या बेगम खालिदा झिया यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे.
·        मेक इन इंडियाच्या धर्तीवर व्हिडीओकॉन कंपनीने भारतातील पहिल्या वहिल्या वायफाय एसीची निर्मिती केली आहे.
·        महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमानुसार विद्यापीठाच्या कुलगुरूचे पद रिक्त झाल्यापासून १२ महिन्यांसाठी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात येत होती.
·        या अधिनियमात दुरुस्ती केल्यामुळे हा कालावधी आता १२ महिन्यांवरून १८ महिन्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
·        पुण्याजवळ झालेल्या सुखोई विमानाच्या अपघाताला मानवी चूक कारणीभूत होती, असा दावा सुखोई विमानाची मूळ रशियन उत्पादक असलेल्या इर्कुट कॉर्पोरेशन कंपनीने केला आहे.
·        इर्कुट कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष (लष्करी विक्री) - विटाली बोरोडिच
·        आयसीसीने विश्वपकरंडक स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी लागू केलेल्या आचारसंहितेनुसार खेळाडूंनी रात्री दहाच्या आत आपल्या रुममध्ये असणे बंधनकारक आहे.
·        या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेशिस्त वर्तनाबद्दल बांगलादेश संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज अल अमिन हुसेन याला घरी पाठवून दिले आहे. त्याच्याऐवजी शफीऊल इस्लाम याला संघात स्थान देण्यात आले. आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा