चालू घडामोडी - २४ जानेवारी २०१५

·        २४ जानेवारी १९५० : ‘जन गण मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता.
·        २४ जानेवारी १९६६ : अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभांचे विमान अपघातात निधन झाले.
·        विधान परिषदेच्या चार रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीत शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपच्या स्मिता वाघ, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.
·        बिहारमधील आरा येथील सत्र न्यायालयाच्या आवारात एका महिला आत्मघातकी हल्लेखोराने घडवून आणलेल्या बॉंबस्फोटामध्ये एका महिलेसह पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, अन्य सोळा जण गंभीर जखमी झाले आहेत.
·        भारताचा परकीय चलन साठा १६ जानेवारीला संपलेल्या आठवड्यात २.६६ अब्ज डॉलरने वाढून ३२२.१३५ अब्ज डॉलर एवढा झाला आहे.
·        भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा चार वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
·        कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा “जनस्थान पुरस्कार” ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर झाला असून, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी याKusumaagraj Pratishthan पुरस्काराची घोषणा केली.
·        रोख एक लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी (२७ फेब्रुवारी) नाशिक येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
·        जनस्थान पुरस्काराची सुरवात १९९१ पासून करण्यात आली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो.
·        विजय तेंडुलकर हे पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले, तर २०१३चा पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आला.
·        या पुरस्काराने आजपर्यंत विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबूराव बागूल, ना. धों. महानोर,महेश एलकुंचवार यांना सन्मानित करण्यात आले आहे.
·        पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षपदी पुन्हा मेहबुबा मुफ्ती यांची निवड करण्यात आली असून, आता राज्यातील सरकार स्थापनेलाही वेग येईल अशी शक्‍यता राजकीय जाणकारांनी व्यक्‍त केली आहे.
·        हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संशयित सदस्य लियाकत शाह याच्यावरील दहशतवादी कारवायांचे सर्व आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रद्द केले.
·        अंधत्वावर मात करत आपल्याDr. Vrushali आवडीच्या क्षेत्रात काम करून यशाचे शिखर गाठलेल्या नाशिकच्या अंध रेडिओ स्टार डॉ. वृषाली शेख यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड २०१५ च्या अंकात भारतातील पहिला अंध महिला रेडिओ स्टार बनण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.
·        चार वेळच्या विजेत्या रॉजर फेडररला ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्याच फेरीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. बिगरमानांकित इटलीच्या अँड्रीयस सेप्परीने त्याला चार सेटमध्ये गारद केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा