चालू घडामोडी - २९ जानेवारी २०१५

·      केंद्र सरकारने सुजाता सिंह यांना परराष्ट्र सचिव पदावरून दूर केल्यानंतर नवे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पदाची सूत्र स्वीकारली.
·      जयशंकर हे १९७७ च्या परराष्ट्र सेवा बॅचचे अधिकारी आहेत.
·      अमेरिकेत राजदूत होण्यापूर्वी जयशंकर यांनी चीनमध्ये राजदूत म्हणून काम केले होते.
·      भारताच्या सामरिक नीती क्षेत्राचे ‘गुरू’ म्हणून ओळखले जाणारे (कै.) के. सुब्रह्मण्यम यांचे ते चिरंजीव आहेत.
·      तत्कालीन सोव्हिएत महासंघ, जपान, श्रीलंका या देशांमध्येही त्यांनी काम पाहिले. रशियन भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.
·      केंद्रीय अर्थमंत्रीRepublic Day Ad अरुण जेटली यांच्या अखत्यारीतील माहिती व नभोवाणी मंत्रालयाने प्रजासत्ताक दिनी जाहिरात प्रकाशित केली.
·      यामध्ये राज्यघटनेचा सरनामा प्रसिद्ध केला होता. मात्र यामधून धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) आणि समाजवादी (सोशालिस्ट) हे शब्द वगळण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले.
·      भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आयुष्य दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे सहा तासांनी घटल्याचा दावा अमेरिकी प्रसारमाध्यमांनी केला आहे.
·      जागतिक प्रदुषणाच्या वस्तुस्थितीनुसार पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो, तर भारताचा नंबर अमेरिकेनंतर येतो.
·      सौदी अरेबियाचे दिवंगत राजे किंग अब्दुल्ला यांना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी हेडस्कार्फशिवाय वाहिलेली श्रद्धांजली वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे
·      सन २००६ मधील बहुचर्चित निठारी साखळी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोलीच्या शिक्षेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने बदल केला.
·      कोलीला आता फाशी होणार नाही. त्याला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे.
·      खगोल शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकास अमेरिकेच्या केपलर या दुर्बिणीमधून अवकाशाचा वेध घेत असताना विश्‍वामधील सर्वांत जुनी सूर्यमाला शोधण्यात यश आले आहे. या सूर्यमालेमध्ये पाच ग्रह आढळले असून, ही सूर्यमाला विश्‍वाच्या जन्मानंतर काहीच कालावधीत निर्माण झाल्याचे संशोधकांनी सांगितले.
·      या सूर्यमालेत मुख्य तारा केपलर ४४४ हा आहे. केपलर हाAncient Solar System सूर्यासारखाच तारा असून, तो सुमारे ११.२ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला आहे. पृथ्वी असलेल्या आपल्या सूर्यमालिकेचे वय केवळ ४.५ अब्ज वर्षे आहे.
·      संशोधकांच्या या आंतरराष्ट्रीय पथकाचे नेतृत्व बर्मिंगहॅम विद्यापीठाने केले होते. या पथकामध्ये डेन्मार्क, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, जर्मनी व इटलीच्या संशोधकांचा समावेश होता.
·      केपलर ४४४ हा तारा सूर्यापेक्षा सुमारे २५ टक्‍क्‍यांनी लहान आहे. ही सूर्यमाला असून, ११७ प्रकाशवर्षे दूर आहे. या सूर्यमालिकेमधील पाचही ग्रहांचे क्षेत्रफळ पृथ्वीपेक्षा कमी आहे.
·      या सूर्यमालेतील सर्व ग्रह दहा दिवसांपेक्षाही कमी दिवसांत केपलर ४४४ ताऱ्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करतात.
·      या नव्या संशोधनामुळे प्राचीन ग्रहांच्या निर्मितीसंदर्भातील बहुमोल माहिती हाती लागण्याची शक्‍यता आहे.
·      हिझबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी इस्राईल लेबनॉन सीमारेषेवर केलेल्या हल्ल्यामध्ये या भागातील राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेमधील एक स्पॅनिश सैनिक व दोन इस्राईली सैनिक मृत्युमुखी पडले.
·      या हल्ल्यात सात इस्राईली सैनिक जखमीही झाले आहेत. इस्राईलच्या सैन्यावर क्षेपणास्त्र डागण्यात आल्यानंतर त्यांनीही दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार गोळीबार करत या हल्ल्यास प्रत्युत्तर दिले.
·      इस्राईलमधील पुन्हा चिघळणाऱ्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीची न्यूयॉर्क येथे तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.
·      इस्राईलचे पंतप्रधान : बेंजामिन नेतान्याहू
·      आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या वेळपत्रकामध्ये २०१६ मध्ये होणारी ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धा भारतात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा ११ मार्च आणि एप्रिल या कालावधीत खेळविली जाणार आहे.
·      २०१४ ची ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धा बांगलादेशमध्ये खेळविण्यात आली होती. या स्पर्धेत श्रीलंकेने भारताचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा खेळविण्यात येते.
·      अण्वस्त्रासंदर्भातील संवेदनशील माहिती देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमेरिकेमधील पेड्रो लिओनार्डो मशेरोनी (वय ७९) या आण्विक शास्त्रज्ञास पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली.
·      मशेरोनी हे मूळचे अर्जेंटिनाचे असून व्हेनेझुएला या देशास आण्विक तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न करताना ते पकडले गेले होते.

No comments:

Post a Comment