प्रश्नसंच १५० - चालू घडामोडी

MT Quiz
[प्र.१] ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसंदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
१] सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट - कोर्ट
२] सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - एलिझाबेथ एकादशी
३] लोकप्रिय चित्रपट - मेरी कोम
४] सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - क्वीन


२] सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - एलिझाबेथ एकादशी
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -किल्ला
  • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - एलिझाबेथ एकादशी

[प्र.२] पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिले जाणारे ‘टायलर प्राईझ’ या वर्षी डॉ. माधव गाडगीळ यांच्यासोबत सागरी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जेन लुबचेन्को यांनाही जाहीर झाले आहे. डॉ. जेन लुबचेन्को कोणत्या देशाचे नागरिक आहेत?
१] फ्रांस
२] अमेरिका
३] इटली
४] युनायटेड किंगडम


२] अमेरिका

[प्र.३] दुचाकी चालकांना हेल्मेटशिवाय पेट्रोल देऊ नये असे आदेश कोणत्या राज्य सरकारने नुकतेच काढले आहेत?
१] महाराष्ट्र
२] कर्नाटक
३] गुजरात
४] मध्यप्रदेश


४] मध्यप्रदेश

[प्र.४] शियापंथीय हौथी संघटना व सरकार यांच्यामधील संघर्षाने जेरीस आलेल्या येमेनमधील राजकीय संकटातून तोडगा काढण्याच्या उद्देशाने केले जाणारी राजनैतिक चर्चा कोठे केली जाणार आहे.?
१] सौदी अरेबिया
२] बहारिन
३] कुवेत
४] कतार


४] कतार (दोहा)

[प्र.५] इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड ट्रॅव्हल कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) रेल्वे प्रवाशाच्या सुविधेसाठी रूपे प्रीपेड कार्ड सेवा सुरू केली आहे. ही सेवा कोणत्या बँकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आली आहे?
१] युनियन बॅक ऑफ इंडिया
२] स्टेट बँक ऑफ इंडिया
३] सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
४] रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया


१] युनियन बॅक ऑफ इंडिया

[प्र.६] माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्दबातल ठरविले?
१] ६२-अ 
२] ६४-अ
३] ६६-अ
४] ६८-अ


३] ६६-अ

[प्र.७] २१ मार्च २०१५ रोजी अद्भुत शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या सशस्त्र दलामधील कोणत्या जवानाला राष्ट्रपतींनी कीर्ती चक्र प्रदान केले?  
१] कॅप्टन जयदेव
२] सुभेदार प्रकाश चांद
३] कॅप्टन महावीरसिंह


१] कॅप्टन जयदेव

[प्र.८] इंडियन वेल्स ओपन टेनिस २०१५ महिला एकेरी स्पर्धेची विजेती कोण ठरली?
१] सेरेना विल्यम्स 
२] मारिया शारापोवा 
३] सायना नेहवाल
४] सिमोन हालेप


४] सिमोन हालेप

[प्र.९] खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
अ] इंडियन वेल्स ओपन महिला दुहेरीचे जेतेपद भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी पटकावले आहे.
ब] हा किताब मार्टिना हिंगिसने दुसऱ्यांदा पटकावला असून याआधी तिने १७ वर्षापूर्वी १९९८ मध्ये अ‍ॅना कुर्निकोवा सोबत खेळताना इंडियन वेल्स ओपनचे जेतेपद पटकावले होते.
क] सानिया मिर्झाने हा किताब दुसऱ्यांदा पटकावला आहे. याआधी २०११ मध्ये सानिया-कारा ब्लॅक जोडीने जेतेपदावर आपले नाव कोरले होते.

१] फक्त अ आणि क
२] फक्त ब
३] फक्त ब आणि क
४] वरील सर्व


३] फक्त ब आणि क
  • हा किताब मार्टिना हिंगिसने दुसऱ्यांदा पटकावला असून याआधी तिने १६ वर्षापूर्वी १९९९ मध्ये अ‍ॅना कुर्निकोवा सोबत खेळताना इंडियन वेल्स ओपनचे जेतेपद पटकावले होते.
  • सानिया मिर्झानेही हा किताब दुसऱ्यांदा पटकावला आहे. याआधी २०११ मध्ये सानिया-वेसनीना जोडीने जेतेपदावर आपले नाव कोरले होते.

[प्र.१०] योग्य विधाने ओळखा?
अ] केंद्र सरकारने नुकतेच देशातील १७ नव्या मेगा फूड पार्कचे वाटप केले आहे.
ब] यापैकी सात फूड पार्क राज्यांना देण्यात आले आहेत, तर दहा पार्क खासगी कंपन्यांमार्फत विकसित करण्यात येणार आहेत.
क] महाराष्ट्रात नागपूर आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कचे वाटपही या १७ मध्ये समाविष्ट आहे.
ड] आतापर्यंत देशात ४२ मेगा फूड पार्कला मंजुरी देण्यात आली आहे.

१] फक्त अ, क आणि ड
२] फक्त ब. क आणि ड
३] फक्त अ, ब आणि ड
४] वरील सर्व


३] फक्त अ, ब आणि ड
  • महाराष्ट्रात अहमदनगर आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कचे वाटपही या १७ मध्ये समाविष्ट आहे.

चालू घडामोडी - २६ मार्च २०१५


  • स्थावर मालमत्ता-जमीन, घर किंवा फ्लॅटची मालकी आपल्या रक्ताच्या नातेवाईकाला हस्तांतरित करताना आता कोणतेही मुद्रांक शुल्क (स्टँम्पड्युटी) द्यावी लागणार नाही असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
  • राज्य सरकारने ‘महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम प्रचलित नियम‘ या मालकी हस्तांतरणाच्या नियमात बदल केला आहे. 
  • या निर्णयामुळे अवघ्या पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर (स्टँम्प पेपर) आपल्या रक्ताच्या नातलगांना मालमत्ता-जमीन, घर किंवा फ्लॅट हस्तांतरित करता येणार आहे. 
  • यापुर्वी रक्ताच्या नातलगांना मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी हस्तांतरणावर पाच टक्के मुद्रांक शुल्क महसूल विभागात जमा करावे लागत होते.

Twitter Samvad Seva
  • ‘ट्‌विटर संवाद सेवा’
  • ‘ट्विटर’ आणि केंद्र सरकार यांनी संयुक्तरीत्या ‘ट्‌विटर संवाद सेवा’ ही सेवा सुरू केली असून, या सेवेमुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रत्येक ट्‌विटचा मोफत एसएमएस नागरिकांना मिळणार आहे. 
  • पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे ‘ट्‌विटर संवाद’ सेवेचा प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ‘ट्‌विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डिक कोस्टोलो उपस्थित होते. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाचा भाग म्हणून आणि देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारने घेतलेले निर्णय त्यांच्या मोबाईलवर प्रत्यक्ष त्याच वेळेला (रिअल- टाइम) समजण्यास मदत मिळणार आहे. 
  • कोणत्याही व्यक्तीने आपल्या मोबाईलवरून ०११ ३००६ ३००६ या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास त्यांना नरेंद्र मोदी यांच्या ट्‌विटचे एसएमएस मोफत मिळणार आहेत. 
  • त्याचप्रमाणे रेल्वे मंत्रालयानेही या उपक्रमात भाग घेतला असून, ०११ ३०४६ ९२२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास रेल्वेचे अलर्ट आणि ट्‌विटचे एसएमएस मिळणार आहेत.

  • राष्ट्रपतींनी मंजूर केलेल्या भूसंपादन अध्यादेशात नऊ दुरुस्त्या करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
  • त्यापैकी काही दुरुस्त्या खालीलप्रमाणे :
  • खासगी क्षेत्राला शेतजमिनी घेण्यापूर्वी जमिनीच्या मालकाची लेखी परवानागी बंधनकारक असेल.
  • जमीन हस्तांतरानंतरही मालकाला आक्षेप असेल तर त्याला न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात येईल.
  • ज्यांच्या जमिनी जातील त्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन उद्योगांना व्यवहारापूर्वी द्यावे लागेल. 
  • ज्या भागातील जमिनी अधिग्रहित होतील त्या भागातील स्थानिकांसाठी रोजगारात आरक्षण देणे तसेच २०१३ मध्ये मंजूर झालेल्या कायद्यात जमीन अधिग्रहण कायद्यातून १३ क्षेत्रे वगळली होती. त्या क्षेत्रांनाही नवा कायदा लागू होईल.

  • ‘सागरमाला’ प्रकल्पाची संकल्पना व चौकटीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 
  • त्यातून रेल्वे, अंतर्गत जलवाहतूक तसेच किनारपट्टी आणि रस्ते सेवा वाढविण्याचा त्यात उद्देश आहे.
  • बंदर हा केंद्रबिंदू धरून विकास करणे, ही या प्रकल्पाची संकल्पना आहे. 

  • परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे तसेच सहकार्य संबंध दृढ करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या नऊ एप्रिलपासून फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 
  • नऊ एप्रिलला फ्रान्सभेटीने ते दौऱ्याचा प्रारंभ करतील. नंतर १२ एप्रिलला ते जर्मनीला रवाना होतील. १४ आणि १५ एप्रिलला ते कॅनडाला भेट देतील. 
  • मोदींची भेट ही या तिन्ही देशांतील गुंतवणूक व तंत्रज्ञान यांच्या आदानप्रदानावर केंद्रित असणार आहे,

  • कनिष्ठ सहकारी महिला न्यायाधीशाचा लैंगिक छळ केल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. गंगेले यांच्याविरुद्ध संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव राज्यसभाध्यक्ष हमीद अन्सारी यांनी दाखल करून घेतला आहे. 
  • न्या. गंगेले यांच्याविरुद्ध महाभियोग चालविला गेल्यास राज्यसभेच्या ६२ वर्षांच्या इतिहासातील अशा प्रकारची ही दुसरी व संसदेच्या इतिहासातील ही तिसरी कारवाई असेल. 
  • यापूर्वी २०११ मध्ये पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सौमित्र सेन यांच्याविरुद्ध ३३ लाखांच्या निधीचा भ्रष्टाचार केल्याबद्दल राज्यसभेने महाभियोग खटला चालविला होता. तो ऐतिहासिक ठराव मंजूर करताना राज्यसभेतील २०६ उपस्थित खासदारांपैकी ‘बसप’ वगळता तब्बल १८९ सदस्यांनी सेन यांना न्यायाधीशपदावरून हाकलण्यासाठी मतदान केले होते. 
  • त्यापूर्वी लोकसभेने १९९३ मध्ये न्या. व्ही. रामस्वामी यांच्याविरुद्ध महाभियोग चालविला होता. माजी मंत्री कपिल सिब्बल यांनी रामस्वामी यांची बाजू मांडली होती.
  • न्या. गंगेले यांनी ग्वाल्हेरच्या सत्र न्यायालयातील महिला न्यायाधीशांचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला व त्यांनी तो जुमानला नाही तेव्हा त्यांनी या महिला न्यायाधीशांची सूडबुद्धीने दुर्गम भागात बदली केली, असा आरोप आहे. राज्यसभेतील वानसुक सियेम यांच्यासह ५८ खासदारांनी गंगेले यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव दिला होता. 
  • अन्सारी यांनी हा प्रस्ताव न्यायमूर्ती चौकशी कायदा १९६८ नुसार स्वीकारला आहे. 
  • न्या. गंगेले सध्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात कार्यरत आहेत. 
  • संबंधित न्यायाधीश महिलेने गेल्या वर्षी जुलैमध्ये सरन्यायाधीशांकडे या प्रकाराची तक्रार केल्यावर या न्यायासनात सुरू असलेल्या अनैतिक प्रकाराला वाचा फुटली. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी न्या. गंगेले यांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींची समिती नेमली. त्याचा तपास सुरू असतानाच राज्यसभेने हा महाभियोग चालविण्याचा निर्णय अमलात आणल्यास तो ऐतिहासिक प्रसंग असेल. 
  • महाभियोग चालविण्याची ठकळ कारणे 
    1. लैंगिक छळ 
    2. आपल्या अनैतिक व बेकायदेशीर मागण्या न पुरविणाऱ्या महिला न्यायाधीशांना त्रास देणे
    3. आपल्या न्यायालयीन उच्चपदाचा दुरुपयोग करून एका सहकारी महिलेला त्रास देणे. 
  • पुढे काय? 
    • कायद्यानुसार एखाद्या न्यायमूर्तीवर संसदेत महाभियोग चालविला गेला तर त्यानंतर संबंधिताच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, एखाद्या राज्याच्या न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व एक ज्येष्ठ न्यायमूर्ती यांची तपास समिती नेमली जाते. 

  • फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगांमध्ये कोसळलेल्या 'जर्मनविंग्ज' कंपनीच्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्‍स' शोधपथकाला सापडला असून व्हॉइस रेकॉर्डर शोधण्यातही शोधपथक यशस्वी झाले आहे. 
  • आल्प्स पर्वतराजीमधील दुर्गम भागामध्ये हे विमान कोसळले असून, विमानातील मृतदेह शोधण्यास आणखी काही काळ लागेल.

  • चीनकडून दक्षिण चीनी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या कृत्रिम बेटांमुळे भारताची चिंता वाढली आहे. यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या प्रदेशात चीनला नाविक आणि हवाई फौजा तैनात करू शकते. 
  • चीन या हालचालींमुळे भारताच्या आशियाई-पॅसिफिक संपर्काला, तसेच ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. 
  • आर्थिक समृद्धीसाठी या प्रदेशात स्थैर्य महत्त्वाचे असून, वाद मिटविण्यासाठी सैन्यबळाचा वापर करायचा नाही असे भारताने म्हटले आहे.

  • सौदी अरेबियाप्रणित अरबी फौजांनी बंडखोर होती फौजांवर हल्ले सुरू केल्यानंतर येमेनने त्यांची महत्त्वाची बंदरे बंद केली. 
  • अमेरिकेसह पाश्चात्य देशांचा पाठिंबा असलेल्या येमेनी अध्यक्षांविरुद्ध हौती बंडखोर अनेक दिवसांपासून कारवाया करीत आहेत.

  • सूक्ष्म वित्त संस्थांसाठी पुनर्वित्तपुरवठा करण्यासाठी आणि आर्थिक समावेशन ध्येय पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिल रोजी मुद्रा (मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी) बॅंकेचे अनावरण करणार आहेत.
  • उद्देश : सूक्ष्म व्यावसायिक क्षेत्रात येणाऱ्या व्यावसायिकांना मदत करणे.
  • केंद्र सरकार लहान व्यावसायिक, बचत गट, लहान मायक्रो-फायनान्स कंपन्या, एनबीएफसी व ट्रस्ट यांसारख्या संस्थांना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करणार आहे. 
  • देशात सद्यस्थितीत ५ कोटीपेक्षा अधिक लहान व्यावसायिक असून ते पारंपारिक मार्गाने व्यवसाय करतात. त्यांना आता फायदा होणार आहे.

सोलर इम्पल्स – २

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

     राईट बंधूंनी सुमारे १११ वर्षांपूर्वी पहिल्यांदा विमान उडवून प्रवासाची व्याख्याच बदलली होती. आता पुन्हा एक नवा इतिहास लिहिला जातोय... सौरऊर्जेवर चालणाऱ्या विमानातून जगप्रवास करण्याचा...!
    पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे विमान ‘स्वच्छ ऊर्जेचा संदेश’ घेऊन जगाच्या प्रवासाला निघालं आहे. केवळ सौरऊर्जेवर चालणारं 'सोलर इपल्स-२' हे विमान अहमदाबाद मध्ये आले होते. अबूधाबीहून सुरू झालेल्या या विमानाच्या प्रवासातला अहमदाबाद हा तिसरा टप्पा (पहिला टप्पा : ओमान) आहे. या टप्प्यातच सौरऊर्जेवर सर्वांत जास्त १ हजार ४६५ किलोमीटर चालण्याचा विक्रम या विमानानं आपल्या नावावर केला आहे. 

Solar Impulse 2
सोलर इपल्सचे जनक 
बर्ट्रांड पिकार्ड - व्यवसायानं मानसोपचारतज्ज्ञ, ‘बलून’च्या साह्यानं न थांबता जगप्रवास करणारी पहिली व्यक्ती, सोलर इंपल्सचे संस्थापक अध्यक्ष. त्यांच्या कुटुंबातल्या ऑगस्ट पिकार्ड (स्ट्रॅटोस्फिअरचा अभ्यास) आणि जॅक्‍स पिकार्ड (समुद्राच्या खोलीचा अभ्यास) यांच्या पावलावर पाऊल ठेवत संशोधनाच्या क्षेत्रात.

अँण्ड्रू बोर्शबर्ग - अभियंता, मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधून मॅनेजमेंट सायन्सची पदवी. प्रशिक्षित लढाऊ वैमानिक, हेलिकॉप्टर वैमानिक, सोलर इंपल्स प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

सोलर इंपल्सची टीम - ३० अभियंते, २५ तंत्रज्ञ, २२ मिशन कंट्रोलर. शंभराहून अधिक आश्रयदाते आणि सल्लागार.
नियंत्रण कक्ष - मोनॅकोमध्ये नियंत्रण कक्ष. या नियंत्रण कक्षातूनच जगप्रवासाकडं लक्ष ठेवण्यात येणार आहे. विविध देशांतल्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि इंटरनॅशनल एरोनॉटिकल फेडरेशन यांच्या कायम संपर्कात हा कक्ष असेल. हा कक्ष जगप्रवास पूर्ण होईपर्यंत २४ तास काम करेल.

प्रकल्पाची सुरवात :
  • ‘सोलर इंपल्स’ प्रकल्पाची सुरवात सुमारे १२ वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये झाली. सौरऊर्जेवर चालणारं विमान तयार करण्याचं उद्दिष्ट या प्रकल्पात निश्‍चित करण्यात आलं होतं. ‘इकोले पॉलिटेक्‍निक फेडरल डी लॉजेन’द्वारा हा प्रकल्प संचालित केला जातो.
  • ‘सोलर इंपल्स’च्या पहिल्या विमानाची चाचणी डिसेंबर २००९ मध्ये घेण्यात आली. त्यानंतर या विमानानं ७ जुलै २०१० मध्ये स्वित्झर्लंडच्या पेअर्न विमानतळावरून उड्डाण केलं होतं. सौरऊर्जेवर सलग २६ तास उड्डाण विमानानं केलं. त्यातले ९ तास हे रात्रीच्या उड्डाणाचे होते. पुन्हा पेअर्न विमानतळावरच सोलर इंपल्स उतरलं होतं. हे पहिलं उड्डाण यशस्वी केलं होतं स्विस वायुसेनेतले माजी लढाऊ वैमानिक आंद्रे बोर्शबर्ग यांनी.
  • पुढे सोलर इंपल्स-१ च्या साह्यानं २०१३ मध्ये संपूर्ण अमेरिका खंड पालथा घालण्याची कामगिरीही पिकार्ड व बोर्शबर्ग यांनी केली. या सगळ्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी जगप्रवासाला उपयुक्त ठरेल असं ‘सोलर इंपल्स-२’ हे विमान तयार केलं. गेल्या वर्षी त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या व आता पिकार्ड या विमानातून जगप्रवासाला निघाले आहेत. अर्थातच बोर्शबर्ग हेही त्यांचे सहप्रवासी आहेत. दोघंही आलटून-पालटून विमान चालवणार आहेत.

गुजरात कनेक्शन
  • ‘सोलर इंपल्स-२’चे काही भाग भडोच इथल्या सोल्व्हे या कंपनीच्या पानोळी इथल्या प्रकल्पात तयार करण्यात आले आहेत. या विमानाचं वजन कमी करण्यासाठी विशेष ‘पॉलिमर’ तयार करण्यात आलं आहे. हे ‘पॉलिमर’ तयार करण्याचं काम सोल्व्हे या कंपनीनं केलं आहे. 
  • सोल्व्हे ही कंपनी मूळची स्वित्झर्लंडची आहे. विमानाच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेले ‘स्क्रू’ही गुजरातमधल्या प्रकल्पात तयार करण्यात आले आहेत.

विमानाची वैशिष्ट्ये
  • दोन्ही पंखांची मिळून मीटरमध्ये लांबी : ७२ मी.
  • विमानाचं वजन किलोग्रॅममध्ये : २३०० कि. ग्रॅ. (एखाद्या मोटारीएवढं)
  • लिथियम बॅटरींचं वजन किलोग्रॅममध्ये : ६३३ कि. ग्रॅ.
  • दररोज तयार होणारी किलोवॉट-अवर ऊर्जा : ३४० KWPH
  • दिवसाच्या वेळी उड्डाणाची सरासरी उंची मीटरमध्ये : ८५०० मी.
  • रात्रीच्या वेळी उड्डाणाची सरासरी उंची मीटरमध्ये : १५०० मी.
  • सोलर सेल जाडी १३५ मायक्रॉन (मानवी केसाच्या सरासरी जाडीएवढी)
  • एकूण १७,२४८  सौर घट
  • कार्बन फायबरचा आराखडा. कागदापेक्षा तीन पटींहून अधिक हलके.
  • १६ एलईडी दिव्यांचा वापर. घरातील साध्या दोन दिव्यांपेक्षा कमी वापर.
  • १७.४ हॉर्सपॉवरची ४ इंजिने
  • वैमानिक क्षमता : १
  • जगप्रवासातले टप्पे : १२
  • कापलं जाणारं एकूण अंतर : ३५००० किमी
  • विमानोड्डाणाचे अंदाजे तास : ५००
  • जगप्रवासाचे एकूण महिने : ५

चालू घडामोडी - २५ मार्च २०१५


  • २५ मार्च : व. पु. काळे जन्मदिन

  • ६२वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
  • पुरस्काराचे स्वरूप : सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये रोख पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी 
  • पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी
  • सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट - कोर्ट (दिग्दर्शन  : चैतन्य ताम्हाणे) 
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -किल्ला 
  • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - एलिझाबेथ एकादशी
  • लोकप्रिय चित्रपट - मेरी कोम (दिग्दर्शन  : उमंग कुमार)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - विजय (कन्नड)National Award for Best Movie - Court
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणावत 
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - हैदर 
  • स्पेशल ज्युरी अवॉर्ड - भाऊराव कराडे 
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - क्वीन 
  • उल्लेखनीय चित्रपट - किल्ला आणि भूतनाथ रिटर्न
  • सर्वोत्कृष्ट लघुपट - मित्रा (दिग्दर्शन  : रवी जाधव)
  • सवोत्कृष्ट दिग्दर्शन - श्रीजित मुखर्जी (चौतुसकौम)

  • केंद्र सरकारने देशातील १७ नव्या मेगा फूड पार्कचे वाटप केले आहे. यापैकी ७ फूड पार्क राज्यांना देण्यात आले आहेत, तर १० पार्क खासगी कंपन्यांमार्फत विकसित करण्यात येणार आहेत.
  • महाराष्ट्रात अहमदनगर आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कचे वाटपही या १७ मध्ये समाविष्ट आहे.
  • महाराष्ट्र (वर्धा, अहमदनगर), हरियाणा (सोनिपत, पानिपत), पंजाब (लुधियाना, कपूरथळा), मध्य प्रदेश (देवास), बिहार (बक्सर), गुजरात (कच्छ) याशिवाय केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये दोन-दोन, तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक फूड पार्क बनणार आहे.
  • हजारो रोजगार संधी : प्रत्येक फूड पार्कमध्ये ४० ते ५० युनिट असतील. यात ८० हजार लोकांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे. याचा लाभ पाच लाख शेतकऱ्यांना होईल.
  • ६००० कोटींची गुंतवणूक : फूड पार्क बनवण्यासाठी २०३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील ८५० कोटी रुपये केंद्राकडून मिळतील, तर प्रकल्प उभे करणाऱ्या कंपन्या सुमारे ४००० कोटी रुपयांची गुंतवणूक करतील.
  • नाबार्डचा निधी : देशातील प्रत्येक राज्यात मेगा फूड पार्क उभे करण्यासाठी नाबार्डने दोन हजार कोटी रुपयांचा विशेष निधी राखून ठेवला आहे. या निधीतून पार्कमध्ये आधुनिक सुविधा उभारण्यात येतील.
  • आतापर्यंत ४२ मेगा फूड पार्कला मंजुरी : यातील २५ पार्कचे वाटप झाले आहे. इतर १७ वाटप आता झाले. हरिद्वार (उत्तराखंड), चित्तूर (आंध्र प्रदेश), तुमकूर (कर्नाटक) आणि फाजिल्का (पंजाब) येथील फूड पार्क सुरू झाले आहेत. 
  • फायदे : मेगा फूड पार्कमधून अन्न प्रक्रिया, शेतकरी, रिटेलर्स आणि निर्यातदार यांना विविध सुविधा मिळणार आहेत.
  • अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री - हरसिमरत कौर

    Dr. Madhav Gadgil wins Tyler Prize 2015
  • पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिले जाणारे ‘टायलर प्राईझ’ या वर्षी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि केंद्र सरकारच्या पश्चिम घाट पर्यावरण अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर झाले.
  • त्यांच्यासोबत अमेरिकी सागरी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जेन लुबचेन्को यांनाही हे पारितोषिक जाहीर झाले आहे. 
  • दोन लाख अमेरिकी डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • इंटरनॅशनल टायलर प्राईझ एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि अमेरिकेच्या साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. 
  • अमेरिका, भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संवर्धन आणि शाश्वत धोरणांच्या विकासासाठी कार्यरत राहिल्याबद्दल आणि त्यासाठी नेतृत्व केल्याबद्दल या दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • रशियावादी बंडखोरांशी संघर्ष करत असलेल्या युक्रेनच्या सरकारला शस्त्रपुरवठा करण्याच्या निर्णयास अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाने भरघोस बहुमताने समर्थन दर्शविले आहे. या संदर्भातील विधेयक लोकप्रतिनिधीगृहामध्ये ३४८/४८ अशा मतांनी संमत करण्यात आले.
  • युक्रेनमधील सरकार व बंडखोरांमधील संघर्षामध्ये ५४०० हून अधिक जण ठार झाले असून, सुमारे १५ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. युक्रेनमधील रशियावादी बंडखोरांना शस्त्रे पुरविल्याचा रशियावर आरोप आहे. 
  • याशिवाय, पूर्व युक्रेनमध्ये बंडखोरांच्या बाजूने रशियाचे सैन्यही लढत असल्याचे पाश्‍चिमात्य देशांनी म्हटले आहे. रशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

  • राज्यातील दुचाकी चालकांकडे हेल्मेट असले तरच त्यांना पेट्रोल देण्यात यावे, अशा प्रकारचे आदेश मध्य प्रदेश सरकारने काढले आहेत. यामुळे दुचाकी चालकांना हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही.

  • शियापंथीय हौथी संघटना व सरकार यांच्यामधील संघर्षाने जेरीस आलेल्या येमेनमधील राजकीय संकटातून तोडगा काढण्याच्या उद्देशाने केली जाणारी राजनैतिक चर्चा कतारची राजधानी दोहा येथे केली जाणार आहे.
  • येमेनमधील सरकारने हौथींविरोधात आखाती देशांच्या संघटनेकडे (गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल) लष्करी साहाय्याची मागणी केली होती. या संघटनेमध्ये सौदी अरेबिया, बहारिन, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या देशांचा समावेश आहे.

  • आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड ट्रॅव्हल कार्पोरेशनने रेल्वे प्रवाशाच्या सुविधेसाठी युनियन बॅक ऑफ इंडियाच्या सहकार्याने रूपे प्रीपेड कार्ड सेवा सुरू केली आहे. याचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीत करण्यात आले.
  • त्यामुळे भारतीय रेल्वे प्रवासी आता रेल्वेची तिकीटे रूपे प्रीपेड कार्डच्या सहय्यानेही आरक्षित करू शकणार आहेत. सुरवातीला केवळ तिकीट आरक्षणापुरती असलेली ही सुविधा नंतर खरेदी आणि रेल्वेतील अन्य सेवांसाठी द्याव्या लागणाऱ्या देयकांसाठीही वापरता येणार आहे. 
  • व्हीसा आणि मास्टरकार्डप्रमाणेच “रूपे” ही भारतीय कार्ड पेमेंट सुविधा आहे. ती फक्त भारतातच वापरता येणार आहे. यासाठी ग्राहकाला युनियन बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही. 
  • ही डेबिट कार्ड सेवा केवायसीच्या रूपात प्रथम १० हजार रूपये भरल्यानंतर वापरता येणार आहे. केवायसीची सर्व पूर्तता केल्यानंतर वर्षाला कार्डाची सीमा ५० हजार रूपयांपर्यंत वाढणार आहे. 
  • या सेवेला १ लाख रूपयांपर्यंत अपघात विमा संरक्षणही आहे आणि महिन्यातून ५ वेळा ही सेवा मोफत वापरता येणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी १० रू शुल्क आकारले जाणार आहे.

  • महाराष्ट्रात गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळासाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे.
  • महाराष्ट्र सरकारने सहा हजार कोटी रुपये मदतीची मागणी केली होती.

  • महापालिका क्षेत्रातील लाखो अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत राज्य सरकारने नेमलेली समिती : कुंटे समिती

प्रश्नसंच १४९ - राज्यशास्त्र

MT Quiz [प्र.१] राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा करण्यात येतो?
१] २४ जानेवारी 
२] २५ जानेवारी 
३] २७ जानेवारी
४] २८ जानेवारी


२] २५ जानेवारी
----------------
[प्र.२] खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना नाही?
१] शासनाचा विरोध करण्याचे स्वातंत्र्य.
२] सशस्त्र विरोध करण्याचे व त्यात भाग घेण्याचे स्वातंत्र्य.
३] सरकार बदलण्यासाठी आंदोलन सुरु करण्याचे स्वातंत्र्य.
४] घटनेच्या केंद्रीय मूल्यांना विरोध करण्याचे स्वातंत्र्य.


२] सशस्त्र विरोध करण्याचे व त्यात भाग घेण्याचे स्वातंत्र्य.
----------------
[प्र.३] भारतातील निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात, हे दर्शविणारी वाक्ये खाली दिली आहेत. त्यापैकी अयोग्य वाक्ये ओळखा.
१] जगातील सर्वाधिक मतदार भारतात आहेत.
२] भारतात निर्वाचन आयोग खूप शक्तिशाली आहे.
३] भारतात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाची प्रत्येक व्यक्ती मतदाता आहे.
४] भारतात निवडणुकीत पराभूत झालेली पार्टी जनादेश स्वीकार करते.


१] जगातील सर्वाधिक मतदार भारतात आहेत.
----------------
[प्र.४] भारतीय दंड संहितेमधील कोणते कलम बलात्कार या गुन्ह्याविरुद्ध वापरले जाते?
१] कलम १८०
२] कलम ३७६
३] कलम ४७६
४] कलम ५७६


२] कलम ३७६
----------------
[प्र.५] कमाल जमीन धारणा कायद्याचे उद्दिष्ट कोणते?
अ] मोजक्या हातात जमीन संकलित होण्यास प्रतिबंध करणे.
ब] अतिरिक्त जमिनीवर भूमिहीन शेतमजुरांचे पुनर्वसन करणे.
क] सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. 

१] अ आणि ब 
२] अ आणि क
३] ब आणि क
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.६] न्यायपालिकेच्या बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे?
१] संसदेद्वारे पारित प्रत्येक कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी लागते. 
२] जर एखादा कायदा राज्यघटनेच्या विरुध्द असेल तर न्यायपालिका तो रद्द करू शकते. 
३] न्यायपालिका कार्यकारी मंडळापेक्षा स्वतंत्र असते.
४] जर एखाद्या नागरिकाच्या अधिकारांची पायमल्ली होत असेल, तर तो न्यायालयात जाऊ शकतो.


१] संसदेद्वारे पारित प्रत्येक कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी लागते.
----------------
[प्र.७] राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार काही खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केले जातात?  
१] कलम १३९ अ
२] कलम १३९ ब
३] कलम १३९ क
४] कलम १३८


१] कलम १३९ अ
----------------
[प्र.८] खालीलपैकी कोणत्या खटल्यांचा भारतीय संविधानात दिलेल्या ‘मुलभूत हक्क’ प्रकरणाशी संबंध नाही?
१] केशवानंद वि. केरळ राज्य 
२] गोलकनाथ वि. पंजाब राज्य 
३] मोहिरीबिबी वि. धरमदास घोष
४] शंकरीप्रसाद खटला


३] मोहिरीबिबी वि. धरमदास घोष
----------------
[प्र.९] आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये लोकशाही व्यवस्थेची गरज आहे, कारण .....
१] विकसित राष्ट्रांच्या शब्दाला जास्त किंमत प्राप्त होईल.
२] विभिन्न राष्ट्रांच्या समस्यांचे निराकरण त्यांच्या सैन्य बळाकडे बघून केले जावे. 
३] राष्ट्रांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुविधा मिळाव्यात.
४] जगातील सर्व राष्ट्रांशी समान व्यवहार व्हावे.


४] जगातील सर्व राष्ट्रांशी समान व्यवहार व्हावे.
----------------
[प्र.१०] UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसंबंधी सुधारणांसाठी डॉ. अरुण निगवेकर समितीने कोणत्या शिफारसी केल्या आहे?
अ] उमेदवारांकडे गतिमान प्रशासनासाठीचे कौशल्य असावे. 
ब] समाज व सरकार यामधील दुवा बनवण्याची क्षमता उमेदवारांमध्ये असावी.
क] परीक्षांचा (प्रक्रिया) कालावधी ६ महिन्यांपर्यंत कमी करावा.
ड] विषय ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे.

१] फक्त अ, क आणि ड
२] फक्त ब. क आणि ड
३] फक्त अ, ब आणि ड
४] वरील सर्व


३] फक्त अ, ब आणि ड
(परीक्षांचा (प्रक्रिया) कालावधी १० महिन्यांपर्यंत कमी करावा.)
----------------

प्रश्नसंच १४८ - भूगोल

MT Quiz
[प्र.१] कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारे निश्चित होईल?
१] नर्मदेचा त्रिभुज प्रदेश
२] रोहिलखंड
३] माळवा
४] रामनाड


२] रोहिलखंड
----------------
[प्र.२] आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपिमुळे प्रभावित आहे. मृदा धुपिखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते?
१] राजस्थान
२] मध्यप्रदेश
३] महाराष्ट्र
४] उत्तर प्रदेश


१] राजस्थान
----------------
[प्र.३] उसापासून साखर करताना उसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रुपांतर होऊ शकते?
१] ४० टक्के
२] ३० टक्के
३] २० टक्के
४] १० टक्के


४] १० टक्के
----------------
[प्र.४] खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुवृत्तीय हवामानात आढळत नाही?
१] येथे हिवाळा नसतो.
२] दुपारी पाउस पडतो.
३] वर्षभर सारखेच तापमान असते.
४] प्रतिरोध पर्जन्य


४] प्रतिरोध पर्जन्य
----------------
[प्र.५] मुंबई हाय मध्ये भारताच्या एकूण उत्पादनाच्या ६३ टक्के खनिज तेल तर ८० टक्के नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ओ.एन.जी.सी. ला येथे सर्वप्रथम १९७४ मध्ये तेल सापडले. हे खनिज तेल कोणत्या कालावधीचे आहे?
१] इओसीन
२] मायोसीन
३] प्लायोसीन
४] प्लीस्टोसीन


२] मायोसीन
----------------
[प्र.६] आंतरराष्ट्रीय तिथी / वार रेषा म्हणजे काय?
१] जिच्या दोन्ही बाजूंच्या वेळांमध्ये २४ तासांचे अंतर असते.
२] जेथील वेळ ग्रीनविच वेळेपेक्षा २४ तासांनी मागे असते.
३] जेथील वेळ ग्रीनविच वेळेपेक्षा २४ तासांनी पुढे असते.
४] जिच्यापासून जगातील सर्व देशांसाठी तिथी निर्धारण केले जाते.


१] जिच्या दोन्ही बाजूंच्या वेळांमध्ये २४ तासांचे अंतर असते.
----------------
[प्र.७] गंगाखेड हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] परभणी
२] अकोला
३] बुलढाणा
४] नांदेड


१] परभणी
----------------
[प्र.८] पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा.
अ] अँडीज पर्वत
ब] न्युझीलँड
क] फ़िलिपाइन्स
ड] तैवान
वरीलपैकी कोणता ‘अग्नीकंकणाचा’ भाग आहे?

१] फक्त अ
२] अ आणि ब
३] ब, क आणि ड
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.९] भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते कारण .....
अ] मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यावर अवलंबून असणे.
ब] मासे साठविण्याच्या मर्यादित सोई
क] सरकार मासेमारीस प्रोत्साहन देत नाही.
ड] जास्त चांगली बाजारपेठ नाही.

१] फक्त अ, क आणि ड
२] फक्त ब. क आणि ड
३] फक्त अ, ब आणि ड
४] फक्त क


३] फक्त अ, ब आणि ड
----------------
[प्र.१०] खालील नद्यांचा त्यांच्या खोऱ्यांच्या क्षेत्रफ़ळानुसार उतरता क्रम लावा.
अ] ब्रम्हपुत्रा
ब] कृष्णा
क] तापी
ड] कावेरी

१] ब - अ - ड - क
२] ब - ड - क - अ
३] अ - ब - ड - क
४] अ - क - ब - ड


१] ब - अ - ड - क
----------------

चालू घडामोडी - २४ मार्च २०१५

·        २४ मार्च : जागतिक क्षयरोग निर्मुलन दिन
·        इंडियन वेल्स ओपन महिला दुहेरीचेSania-Mirza-and-Martina-Hingis wins Indian Wells Open जेतेपद भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी पटकावले आहे.
·        रशियाच्या एलेना वेसनीना आणि एकातेरिना माकारोवा यांना सानिया आणि हिंगिस यांच्या जोडीने खेळण्यात आलेल्या सामन्यात ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.
·        हा किताब हिंगिसने दुसऱ्यांदा पटकावला असून याआधी तिने १६ वर्षापूर्वी १९९९ मध्ये अॅना कुर्निकोवा सोबत खेळताना इंडियन वेल्स ओपनचे जेतेपद पटकावले होते.
·        तर दुसरीकडे, सानिया मिर्झानेही हा किताब दुसऱ्यांदा पटकावला आहे. याआधी २०११ मध्ये सानिया-वेसनीना जोडीने जेतेपदावर आपले नाव कोरले होते.
·        पुण्यभूषण फाउंडेशनचा यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार” ‘सकाळ वर्तमानपत्राचेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर झाला आहे.
·        नांगराच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजीची प्रतिकृती व एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
·        सामाजिक, पत्रकारिता; तसेच उद्योग क्षेत्रात गेल्या सुमारे चाळीस वर्षांपासून पवार कार्यरत आहेत. त्यांना गेल्या वर्षी "पद्मश्रीपुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
·        मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे अध्यक्षपद; तसेच वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्सचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
·        प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. भारत फोर्ज, फोर्स मोटार्स, किर्लोस्कर ऑइल इंजिन, फिनोलेक्स केबल या कंपन्यांच्या संचालक मंडळावर पवार काम करीत आहेत.
·        तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय दिनानिमित्त संचलन झाले. तालिबानी दहशतवाद्यांच्या भीतीच्या छायेत वावरत असल्याने २००८ नंतर येथे एकदाही राष्ट्रीय दिनानिमित्त संचलन होऊ शकले नव्हते.
·        पंतप्रधान नवाझ शरीफ आणि अध्यक्ष मामनून हुसेन हे दोघेही सोमवारी झालेल्या लष्करी संचलनास उपस्थित होते. पाकिस्तानी लष्कराच्या सर्व दलांनी संचलनात सहभाग घेतला होता. या वेळी क्षेपणास्त्रांचेही प्रदर्शन करण्यात आले.
·        २३ मार्च १९४० ला मुस्लिम लीगने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये पाकिस्तानच्या निर्मितीचा उल्लेख केला होता. त्यानिमित्त २३ मार्च हा पाकिस्तान दिन म्हणून साजरा केला जातो.
·        ऑनलाईन संकेतस्थळांवर व्यक्त केलेल्या मतांसंदर्भात अटक करण्यासाठी पोलिसांकडून आधार घेण्यात येणारे माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ६६-अ हे कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले.
·        शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईमधील कामकाज पूर्णत: बंद पडल्यासंदर्भात टीका करणाऱ्या पोस्ट् दोन तरुणींनी प्रसिद्ध केल्या होत्या. यावर पोलिसांनी या कलमाचा आधार घेत या तरुणींना अटक केली होती. तेव्हा २१ वर्षे वय असलेल्या श्रेया सिंघलने याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.
·        मिचेल प्लॅटिनी यांची युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (युईएफए) अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे.
·        २४ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत प्लॅटिनी यांनी तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान मिळवला.
·        फ्रान्सचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू प्लॅटिनी यांनी पहिल्यांदा २००७ मध्ये युईएफएच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती़ 
·        निवडणुकीत ५४ देशांच्या प्रतिनिधींनी त्यांची बिनविरोध निवड करून त्यांच्याकडे आणखी चार वर्षे सूत्रे दिली.
·        राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २१ मार्च रोजी सशस्त्र दलातील जवानांना १ कीर्ती चक्र आणि ११ शौर्य चक्र देऊन सन्मानित केले. यात तिघांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला.
·        राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. दहशतवाद आणि नक्षलविरोधी कारवायांमध्ये आपल्या प्राणांची बाजी लावून अद्भुत शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या सशस्त्र दलांमधील जवानांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
·        कीर्ती चक्र आणि शौर्य चक्रांसोबतच राष्ट्रपतींनी १४ परमविशिष्ट सेवा पदक, तीन उत्तम युद्ध सेवा पदक आणि २६ अतिविशिष्ट सेवा पदकही जवान व अधिकाऱ्यांना प्रदान केले. या सोहळ्यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह अनेक मंत्री आणि विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
·        एकमेव कीर्ती चक्र पॅराशूट रेजिमेंटचे कॅप्टन जयदेव यांना प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षी १९ जून रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांमध्ये घमासान सुरू असताना छाती, चेहरा आणि पायावर गोळी लागल्यानंतरही दोन अतिरेक्यांचा खात्मा करीत, जयदेव यांनी मोहीम फत्ते होईपर्यंत वैद्यकीय उपचारालाही नकार दिला होता.
·        तर, २८ ऑक्टोबर २०१३ रोजी नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना प्राणाची आहुती देणारे सुभेदार प्रकाश चांद यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.
·        गुटखा विक्री करणं हा आता अजामीनपात्र गुन्हा असेल अशी घोषणा महाराष्ट्र राज्य सरकारनं केली आहे.
·        या नव्या निर्णयामुळे आरोपीवर भारतीय दंडविधानाच्या कलम ३२८ नुसार विषप्रयोग करून गुन्हा करण्याचा इरादा असणे असा आरोप ठेवला जाणार आहे व त्याला १० वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली जाणार आहे.
·        अन्न आणि औषध प्रशासन मंत्री - गिरीश बापट
·        नोवाक जोकोविकने रॉजर फेडररचा बीएनपी पारिबास इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव करून जेतेपद पटकविले.
·        जोकोविकने कारकिर्दितील ५०वा एटीपी किताब आपल्या नावावर केला आहे. या विजयासह इंडियन वेल्समध्ये सर्वाधिक चार किताब जिंकण्याच्या फेडररच्या विक्रमाची बरोबरी जोकोविकने केली आहे. यापूर्वी त्याने २००८, २०११ आणि २०१४ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकविले होते.
·        रोमानियाच्या सिमोन हालेपने सर्बियाच्या जेलेना जानकोविकचा बीएनपी पारिबास इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव करून महिला एकेरीचे जेतेपद पटकविले.
·        जानकोविकला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या हालेपने २-६, ७-५, ६-४ च्या फरकाने पराभूत केले.