चालू घडामोडी - २५ मार्च २०१५


 • २५ मार्च : व. पु. काळे जन्मदिन

 • ६२वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
 • पुरस्काराचे स्वरूप : सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये रोख पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी 
 • पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी
 • सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट - कोर्ट (दिग्दर्शन  : चैतन्य ताम्हाणे) 
 • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट -किल्ला 
 • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - एलिझाबेथ एकादशी
 • लोकप्रिय चित्रपट - मेरी कोम (दिग्दर्शन  : उमंग कुमार)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता - विजय (कन्नड)National Award for Best Movie - Court
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणावत 
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - हैदर 
 • स्पेशल ज्युरी अवॉर्ड - भाऊराव कराडे 
 • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - क्वीन 
 • उल्लेखनीय चित्रपट - किल्ला आणि भूतनाथ रिटर्न
 • सर्वोत्कृष्ट लघुपट - मित्रा (दिग्दर्शन  : रवी जाधव)
 • सवोत्कृष्ट दिग्दर्शन - श्रीजित मुखर्जी (चौतुसकौम)

 • केंद्र सरकारने देशातील १७ नव्या मेगा फूड पार्कचे वाटप केले आहे. यापैकी ७ फूड पार्क राज्यांना देण्यात आले आहेत, तर १० पार्क खासगी कंपन्यांमार्फत विकसित करण्यात येणार आहेत.
 • महाराष्ट्रात अहमदनगर आणि वर्धा येथील मेगा फूड पार्कचे वाटपही या १७ मध्ये समाविष्ट आहे.
 • महाराष्ट्र (वर्धा, अहमदनगर), हरियाणा (सोनिपत, पानिपत), पंजाब (लुधियाना, कपूरथळा), मध्य प्रदेश (देवास), बिहार (बक्सर), गुजरात (कच्छ) याशिवाय केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये दोन-दोन, तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक फूड पार्क बनणार आहे.
 • हजारो रोजगार संधी : प्रत्येक फूड पार्कमध्ये ४० ते ५० युनिट असतील. यात ८० हजार लोकांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे. याचा लाभ पाच लाख शेतकऱ्यांना होईल.
 • ६००० कोटींची गुंतवणूक : फूड पार्क बनवण्यासाठी २०३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील ८५० कोटी रुपये केंद्राकडून मिळतील, तर प्रकल्प उभे करणाऱ्या कंपन्या सुमारे ४००० कोटी रुपयांची गुंतवणूक करतील.
 • नाबार्डचा निधी : देशातील प्रत्येक राज्यात मेगा फूड पार्क उभे करण्यासाठी नाबार्डने दोन हजार कोटी रुपयांचा विशेष निधी राखून ठेवला आहे. या निधीतून पार्कमध्ये आधुनिक सुविधा उभारण्यात येतील.
 • आतापर्यंत ४२ मेगा फूड पार्कला मंजुरी : यातील २५ पार्कचे वाटप झाले आहे. इतर १७ वाटप आता झाले. हरिद्वार (उत्तराखंड), चित्तूर (आंध्र प्रदेश), तुमकूर (कर्नाटक) आणि फाजिल्का (पंजाब) येथील फूड पार्क सुरू झाले आहेत. 
 • फायदे : मेगा फूड पार्कमधून अन्न प्रक्रिया, शेतकरी, रिटेलर्स आणि निर्यातदार यांना विविध सुविधा मिळणार आहेत.
 • अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री - हरसिमरत कौर

  Dr. Madhav Gadgil wins Tyler Prize 2015
 • पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिले जाणारे ‘टायलर प्राईझ’ या वर्षी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि केंद्र सरकारच्या पश्चिम घाट पर्यावरण अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर झाले.
 • त्यांच्यासोबत अमेरिकी सागरी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जेन लुबचेन्को यांनाही हे पारितोषिक जाहीर झाले आहे. 
 • दोन लाख अमेरिकी डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • इंटरनॅशनल टायलर प्राईझ एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि अमेरिकेच्या साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. 
 • अमेरिका, भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संवर्धन आणि शाश्वत धोरणांच्या विकासासाठी कार्यरत राहिल्याबद्दल आणि त्यासाठी नेतृत्व केल्याबद्दल या दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 • रशियावादी बंडखोरांशी संघर्ष करत असलेल्या युक्रेनच्या सरकारला शस्त्रपुरवठा करण्याच्या निर्णयास अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाने भरघोस बहुमताने समर्थन दर्शविले आहे. या संदर्भातील विधेयक लोकप्रतिनिधीगृहामध्ये ३४८/४८ अशा मतांनी संमत करण्यात आले.
 • युक्रेनमधील सरकार व बंडखोरांमधील संघर्षामध्ये ५४०० हून अधिक जण ठार झाले असून, सुमारे १५ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. युक्रेनमधील रशियावादी बंडखोरांना शस्त्रे पुरविल्याचा रशियावर आरोप आहे. 
 • याशिवाय, पूर्व युक्रेनमध्ये बंडखोरांच्या बाजूने रशियाचे सैन्यही लढत असल्याचे पाश्‍चिमात्य देशांनी म्हटले आहे. रशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

 • राज्यातील दुचाकी चालकांकडे हेल्मेट असले तरच त्यांना पेट्रोल देण्यात यावे, अशा प्रकारचे आदेश मध्य प्रदेश सरकारने काढले आहेत. यामुळे दुचाकी चालकांना हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही.

 • शियापंथीय हौथी संघटना व सरकार यांच्यामधील संघर्षाने जेरीस आलेल्या येमेनमधील राजकीय संकटातून तोडगा काढण्याच्या उद्देशाने केली जाणारी राजनैतिक चर्चा कतारची राजधानी दोहा येथे केली जाणार आहे.
 • येमेनमधील सरकारने हौथींविरोधात आखाती देशांच्या संघटनेकडे (गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल) लष्करी साहाय्याची मागणी केली होती. या संघटनेमध्ये सौदी अरेबिया, बहारिन, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या देशांचा समावेश आहे.

 • आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड ट्रॅव्हल कार्पोरेशनने रेल्वे प्रवाशाच्या सुविधेसाठी युनियन बॅक ऑफ इंडियाच्या सहकार्याने रूपे प्रीपेड कार्ड सेवा सुरू केली आहे. याचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीत करण्यात आले.
 • त्यामुळे भारतीय रेल्वे प्रवासी आता रेल्वेची तिकीटे रूपे प्रीपेड कार्डच्या सहय्यानेही आरक्षित करू शकणार आहेत. सुरवातीला केवळ तिकीट आरक्षणापुरती असलेली ही सुविधा नंतर खरेदी आणि रेल्वेतील अन्य सेवांसाठी द्याव्या लागणाऱ्या देयकांसाठीही वापरता येणार आहे. 
 • व्हीसा आणि मास्टरकार्डप्रमाणेच “रूपे” ही भारतीय कार्ड पेमेंट सुविधा आहे. ती फक्त भारतातच वापरता येणार आहे. यासाठी ग्राहकाला युनियन बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही. 
 • ही डेबिट कार्ड सेवा केवायसीच्या रूपात प्रथम १० हजार रूपये भरल्यानंतर वापरता येणार आहे. केवायसीची सर्व पूर्तता केल्यानंतर वर्षाला कार्डाची सीमा ५० हजार रूपयांपर्यंत वाढणार आहे. 
 • या सेवेला १ लाख रूपयांपर्यंत अपघात विमा संरक्षणही आहे आणि महिन्यातून ५ वेळा ही सेवा मोफत वापरता येणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी १० रू शुल्क आकारले जाणार आहे.

 • महाराष्ट्रात गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळासाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे.
 • महाराष्ट्र सरकारने सहा हजार कोटी रुपये मदतीची मागणी केली होती.

 • महापालिका क्षेत्रातील लाखो अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत राज्य सरकारने नेमलेली समिती : कुंटे समिती

No comments:

Post a Comment