प्रश्नसंच १४५ - इतिहास

MT Quiz [प्र.१] पुढीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
१] पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा मी १४९८ मध्ये कालिकत बंदरात येवून पोहचला.
२] इ.स. १५१० मध्ये गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी सत्ता स्थापन केली.
३] सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई इ. ठिकाणी इंग्रजांनी आपल्या वखारी स्थापन केल्या.
४] पोर्तुगीजांनी आपली पहिली वखार सुरत व मिदनापूर येथे स्थापन केली.


४] पोर्तुगीजांनी आपली पहिली वखार सुरत व मिदनापूर येथे स्थापन केली.
----------------
[प्र.२] सॅडलर विद्यापीठ कमिशन केव्हा स्थापन करण्यात आले?
१] १९१३
२] १९१७
३] १९०७
४] १९०३


२] १९१७
----------------
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या काश्मिरी शासकाचे वर्णन ‘काश्मीर का अकबर’ असे केले जाते?
१] हैदर अली शाह
२] अल्लाउद्दिन
३] शहाबुद्दीन
४] जैन-उल-अबिदीन


४] जैन-उल-अबिदीन
----------------
[प्र.४] खालीलपैकी कोणते एक प्रार्थना समाजाचे तत्व नाही?
१] मूर्तीपूजेला विरोध
२] आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना आवश्यक आहे.
३] ईश्वर भक्तीने प्रसन्न होतो.
४] धर्माच्या प्रचारासाठी पुजापाठाला प्राधान्य


४] धर्माच्या प्रचारासाठी पुजापाठाला प्राधान्य
----------------
[प्र.५] अयोग्य जोडी ओळखा?
१] संन्याशांचा उठाव – बंगाल प्रांत
२] हो जमातीचे बंड – उत्तर प्रदेश
३] चुआरांचा उठाव - मिदनापूर
४] फोंडांचा उठाव – ओरिसा प्रांत


२] हो जमातीचे बंड – उत्तर प्रदेश
----------------
[प्र.६] १८५७च्या उठावाचे आर्थिक कारण कोणते?
१] काडतूस प्रकरण
२] देशी उद्योगांचा ऱ्हास
३] हिंदू संस्कृती व समाज जीवनावर आघात
४] कंपनीचे साम्राज्यवादी धोरण


२] देशी उद्योगांचा ऱ्हास
----------------
[प्र.७] खालीलपैकी कोणते दुहेरी राजव्यवस्थेचे दुष्परिणाम आहेत?
अ] बंगालमधील अंतर्गत व्यापार उध्वस्त झाला.
ब] भारतीय उद्योग व कलेचा ऱ्हास झाला.
क] बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत झाली.
ड] परकीय सत्तांनी ही व्यास्वस्था स्वीकारली.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ, ब आणि क
४] क आणि ड


३] अ, ब आणि क
----------------
[प्र.८] योग्य विधाने ओळखा.
अ] इंग्रजांना बंगाल, बिहार आणि उडीसा येथील दिवाणी अधिकार प्राप्त होते.
ब] इ.स. १७६४ मध्ये इंग्रजांना दिवाणी अधिकार प्राप्त झाले.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही बरोबर
४] दोन्ही चूक


३] दोन्ही बरोबर
----------------
[प्र.९] सिंधू संस्कृतीविषयी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ] ही कांस्ययुगीन संस्कृती आहे.
ब] ही एक नागरी व व्यापार प्रधान संस्कृती आहे.
क] सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान होते.
ड] सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरांची संख्या लक्षणीय होती.
ई] सिंधू संस्कृतीच्या सर्व नगरांना तटबंदी होती.

१] फक्त अ, ब आणि क
२] फक्त अ, क, ड आणि ई
३] फक्त अ, ब, क आणि ई
४] वरील सर्व


३] फक्त अ, ब, क आणि ई
----------------
[प्र.१०] खालील वैशिष्ट्ये कोणत्या काळातील मानवाशी सुसंगत आहेत?
अ] या काळातील मानव मूर्तिपूजक होते.
ब] या काळातील मानव आगीचा वापार करू लागला.
क] दगडी नांगराद्वारे शेती करण्याचे तंत्र विकसित केले.
ड] उत्खननातून मोठ्या प्रमाणात भित्ती चित्रे मिळाली.

१] नवाश्मयुग
२] पुराश्मयुग
३] मध्यश्मयुग
४] ताम्रपाषाण युग


१] नवाश्मयुग
----------------

6 comments:

 1. Nice sir. But answer open nahi hot. Pls solve that issue..

  ReplyDelete
 2. Click here for Answer वर क्लिक केल्यावार उत्तर दिसत आहे ... तुम्ही पुन्हा एकदा तपासून बघा

  ReplyDelete
 3. खुप खुप आभारी आहे मी आपला . इंग्लिश ची पण question पेपर दिला असता रेगुलर तर खुप छान झाले असते. आपल्या वेबसाइट मुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे

  ReplyDelete
 4. आता माझी आपणास एकच रिक्वेस्ट आहे की subjectwise स्टडी नोट्स किंवा माहिती दिली तर खुपच छान होईल जेनेकरूँ अभ्यासाला मदत होईल

  ReplyDelete
 5. Nice information Sir. Thank you so much.

  ReplyDelete