चालू घडामोडी - १७ एप्रिल २०१५


  • १७ एप्रिल : राष्ट्रीय पेय दिन  

  • भारताच्या आयएनएस विशाखापट्टणम या विनाशिकेचे जलावतरण २० एप्रिलला मुंबई येथील माझगाव डॉकला होणार आहे. 
  • नौदलाच्या १५-बी या प्रकल्पाअंतर्गत तयार होणारी ही पहिलीच रडारवर दिसू न शकणारी विनाशिका आहे. 
  • परंपरेप्रमाणे युद्धनौकेचे जलावतरण महिलेकडून होत असल्याने यंदा नौदलप्रमुख ऍडमिरल आर. के. धवन यांच्या पत्नी मीनू धवन यांच्या हस्ते होणार आहे. 
  • प्रकल्प १५-बी अंतर्गत तयार होणाऱ्या विनाशिका आयएनएस कोलकताच्या पुढील वर्गातील असणार आहेत. नव्या वर्गातील चार विनाशिका तयार करण्याचा करार २०११ मध्ये झाला होता. 
  • या विनाशिकेवर विविध क्षेपणास्त्र आणि सेन्सर बसविण्यात आले आहेत. 
  • ‘आयएनएस विशाखापट्टणम’ची वैशिष्ट्ये 
    • १६३ मीटर : लांबी 
    • १७.४ मीटर : उंची 
    • ४ : गॅस टर्बाईन्स 
    • ३० नॉट्‌स : वेग 
    • ३०० : कर्मचारी-अधिकारी 
  • इतर वैशिष्ट्ये 
    • किनाऱ्यावरील आणि समुद्रावर दूत अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असलेली ‘व्हर्टिकली लॉंच्‌ड मिसाईल’ यंत्रणा 
    • धोक्याची आगाऊ सूचना देणारी बहुउद्देशीय रडार यंत्रणा. जगात अशा प्रकारच्या फार कमी विनाशिका आहेत.

  • भारताची सर्वांत मोठी युद्धनौका असलेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ला लवकरच स्वत:ची हवाई सुरक्षा मिळणार आहे. 
  • ‘गोदावरी’ वर्गातील एक जहाज लवकरच निवृत्त होणार असल्याने त्यावरील बराक क्षेपणास्त्र यंत्रणा हलविण्याचा नौदलाचा विचार आहे. 
  • यामुळे २०१३ मध्ये नौदलात दाखल झालेल्या या युद्धनौकेला आता स्वसंरक्षण करता येणार आहे.

    Agni III
  • स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-३’ क्षेपणास्त्राची व्हिलर बेटावर यशस्वी चाचणी करण्यात आली. 
  • जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा पल्ला तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. 
  • लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडतर्फे ही चाचणी झाली. या क्षेपणास्त्राची ही तिसरी चाचणी होती.

  • रशियाची राजधानी मॉस्कोमधील लाल चौकात होणाऱ्या विजय दिनाच्या संचलनात भारतीय लष्कराची ७१ सैनिकांची तुकडी सहभागी होणार आहे. 
  • पुढील महिन्यात ९ मे रोजी होणाऱ्या या संचलनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. 
  • भारतीय लष्कराची तुकडी प्रथमच या संचलनात सहभागी होत आहे. ग्रेनेडियर रेजिमेंटच्या ७५ जणांचे पथक पुढील महिन्यात मॉस्कोला रवाना होणार असून, यातील ७१ जण प्रत्यक्ष संचलनात सहभागी होतील आणि ४ जण राखीव असतील. 
  • भारतीय लष्कराने २००९ मध्ये प्रथम फ्रान्समध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संचलनात सहभाग घेतला होता. 
  • रशिया विजय दिन :
    • जर्मनीने शरणागती पत्करल्यानंतर युरोपमधील दुसरे महायुद्ध संपुष्टात आले होते. 
    • युरोपमध्ये हा विजय दिन ८ मे रोजी साजरा केला जातो. या तारखेला संध्याकाळी नाझी सैन्याने पराभव मान्य करत शरणागतीच्या करारावर सही केली होती. 
    • मात्र, या वेळी रशियामध्ये पुढील दिवस उगवला असल्याने ते ९ मे रोजी हा विजय दिन साजरा करतात.

  • हरियाणातील राखी गडी खेड्यामध्ये उत्खनन करताना पुरातत्त्व शास्त्रज्ञांना पाच हजार वर्षांपूर्वीचे हडप्पा संस्कृतीतील चार मानवी सांगाडे सापडले आहेत. 
  • दक्षिण कोरियातील सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी, डेक्कन कॉलेज पुणे आणि हरियाणा सरकारच्या पुरातत्त्व संशोधन विभागातील संशोधकांनी या ठिकाणी उत्खनन केले होते.

  • मोहन कुमार यांची फ्रांसमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सध्याचे फ्रांसमधील राजदूत अरुण कुमार यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून त्यांच्याजागी मोहन कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मोहन कुमार १९८१च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. याआधी ते बहारीनमध्ये भारतीय राजदूत होते.

    Canada to Supply Uranium to India for 5 Years
  • भारताचे पंतप्रधान प्रथमच कॅनडा भेटीवर आले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी मोदी यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर कौशल्य विकास क्षेत्रात दोन्हीही देशांनी १३ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
  • विजेच्या तीव्र टंचाईला तोंड देत असलेल्या भारताला कॅनडा यावर्षीपासूनच पाच वर्षे युरेनियम देणार आहे. तीन हजार मेट्रीक टन युरेनियमसाठी २५४ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा खर्च येणार आहे. 
  • सध्या रशिया आणि कझाकस्तानकडून भारताला युरेनिमयमचा पुरवठा होत आहे. युरेनियमचा हा पुरवठा आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेने ठरवून दिलेल्या सुरक्षा माणकांप्रमाणे केला जाईल. 
  • या करारानुसार कॅनडाची कंपनी कॅमिको कॉर्प भारतातील अणुभट्ट्यांना इंधनाचा पुरवठा करील.
  • फ्रान्स, जर्मनी व कॅनडा या तीन देशांच्या दौऱ्यातील पंतप्रधानांचा कॅनडा हा अखेरचा टप्पा आहे.
  • फ्रान्सने भारतीय पर्यटकांना ४८ तासांत व्हिसा देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तर भारताने फ्रेंच पर्यटकांना इलेक्ट्रॉनिक व्हिसा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. 

  • भाजपचे नेते विजेंद्र गुप्ता यांची दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी विजेंद्र गुप्ता यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली.
  • ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने ६७ तर भाजपने ३ जागा जिंकल्या आहेत.

  • आसाराम बापू यांचे पुत्र नारायणसाईला गुजरात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. 
  • सुरतमधील दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी डिसेंबर २०१३ पासून नारायण साई शिक्षा भोगत आहे. आजारी आईची देखभाल करण्यासाठी त्याने तीन आठवड्यांचा जामीन मागितला होता.

  • संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी रशिया आणि पाकिस्तानमध्ये प्रथमच युद्धसराव होणार आहे. 
  • पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांची आणि रशियाचे संरक्षणमंत्री सर्जी शोईगू यांच्यात मॉस्को येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • नेपाळचे माजी पंतप्रधान सूर्यबहाद्दूर थापा (वय ८७) यांचे कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले. 
  • थापांनी आपल्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तब्बल पाच वेळा नेपाळचे पंतप्रधानपद भूषविले होते.

  • येमेनमध्ये सध्या शियापंथीय हौथी व सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये सुरु असलेल्या संघर्षाने देशामध्ये हिंसाचाराचे थैमान असतानाच संयुक्त राष्ट्रसंघाचे येमेनमधील विशेष प्रतिनिधी जमाल बेनोमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा