चालू घडामोडी - १० एप्रिल २०१५


    Yakub Memon
  • मुंबईला पंचवीस वर्षांपूर्वी हादरविणाऱ्या साखळी बॉंबस्फोटांच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावलेला एकमेव प्रमुख आरोपी आणि गॅंगस्टर टायगर मेमनचा भाऊ याकूब अब्दुल रझाक मेमनची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यामुळे मेमनच्या फाशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 
  • मुंबईत १९९३मध्ये शहर-उपनगरांत घडलेल्या बॉंबस्फोटांत २५७ निष्पाप ठार, तर सातशेहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. 
  • मेमनला विशेष टाडा न्यायालयाने कटकारस्थान आणि बॉंबस्फोटांना आर्थिक पाठबळ केल्याच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
  • मात्र, ही याचिका दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने नामंजूर केली होती. तरीही फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्विचार याचिकेद्वारे केली होती.

  • देशातील कॉर्पोरेट क्षेत्राला हादरा देणाऱ्या ‘सत्यम कॉम्प्युटर्स’चा गैरव्यवहार २००९मध्ये उघडकीस आला. 
  • या गैरव्यवहारप्रकरणी हैदराबाद विशेष न्यायालयाने कंपनीचा संस्थापक बी. रामलिंग राजूसह दहा आरोपींना दोषी ठरवीत सात वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा आणि पाच कोटी रुपयांचा दंड सुनावला आहे.
  • सत्यम कॉम्प्युटर्सच्या गैरव्यवहारात गुंतवणूकदार आणि वेगवेगळ्या वित्तसंस्थांना तब्बल १४ हजार १६२ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. 
  • १६ डिसेंबर २००८ रोजी ‘सत्यम’च्या समभागाची किंमत २२७.५५ रुपये होती. गैरव्यवहार उघडकीस आल्यावर १ सप्टेंबर २००९ पर्यंत समभागांची किंमत १९.७० रुपयांपर्यंत खाली आली. 
  • कंपनी आणि संबंधित कंपनीच्या ५२ हजार कर्मचाऱ्यांना फटका बसला.

  • रोमिंगमध्ये मोबाईलवर बोलणे किंवा संदेश (एसएमएस) पाठविणे १ मेपासून स्वस्त होणार आहे. देशभरातील ‘रोमिंग’चे दर कमी करण्याचा निर्णय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतला आहे. 
  • रोमिंगमध्ये मोबाईल कॉलचे दर २३ टक्के, तर एसएमएसचे दर ७५ टक्क्यांनी कमी होतील. 
  • ट्रायने दूरध्वनी ऑपरेटर्सना नवा रोमिंग प्लॅन लागू करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय रोमिंग सर्व्हिससाठी कमाल शुल्कही कमी केले आहे. 
  • यापूर्वी राष्ट्रीय रोमिंगचे दर २०१३ मध्ये बदलले होते. रोमिंगचे नवे दर १ मे २०१५ पासून लागू होतील. रोमिंगमध्ये असताना आऊटगोईंग कॉल दर १ रुपये प्रतिमिनिटवरून ८० पैसे प्रतिमिनिट करण्यात आला आहे. 
  • त्याचप्रमाणे आता ‘रोमिंग’मध्ये असताना ‘इनकमिंग कॉल’साठी प्रतिमिनिट जास्तीत जास्त ४५ पैसे इतकाच दर आकारता येणार आहे.

  • आपल्या शेजाऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी आक्रमक धोरणे स्वीकारणाऱ्या चीनने तिबेट ते नेपाळ असा रेल्वेमार्ग बांधण्याची योजना आखली आहे. 
  • या रेल्वेमार्गासाठी माउंट एव्हरेस्ट खालूनच बोगदा बांधण्याचा चीनचा विचार असून, हा मार्ग अस्तित्वात येणे हे भारतासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. 
  • चीनमधील किंघाई ते ल्हासादरम्यान असलेल्या रेल्वेमार्गाचा विस्तार करण्याबाबतचे धोरण चीनने याआधी जाहीर केले होते. मात्र, यामध्ये बोगद्याचा कोणताही उल्लेख नव्हता. 
  • या मार्गाचा प्रस्तावित विस्तार चीनला नेपाळपर्यंत घेऊन जाणार असून, यामुळे दोन देशांमधील व्यापार आणि पर्यटनाला वाव मिळेल.

  • ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक रिची बेनॉ यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. 
  • जुन्या काळातील महान क्रिकेटपटू म्हणून तर त्यांची ओळख होतीच; पण समालोचक म्हणूनही त्यांनी नाव कमाविले. त्यामुळेच त्यांना ‘क्रिकेटचा आवाज’ असेही म्हटले जायचे..

  • ग्राहकांना ऑनलाईन खरेदीनंतर वेळेत वस्तू प्राप्त व्हावी यासाठी फ्लिपकार्टने मुंबईतील डबेवाल्यांसोबत करार केला. 
  • यामुळे स्थानिक विक्रेते आणि खरेदीदारांना जोडता येऊ शकेल तसेच वितरणासाठीचा वेळ कमी होईल, असा विश्वास याबाबत कंपनीने व्यक्त केला आहे.

    D. Jayakantan
  • तमिळ साहित्याच्या परंपरेतील एक महत्त्वाचे आणि प्रभावी ज्ञानपीठ विजेते लेखक, पत्रकार, चित्रपट निर्माते व तितकेच प्रभावी वक्ते असलेले दंडपाणी जयकांतन यांचे ८ एप्रिलला निधन झाले.
  • जयकांतन यांचा जन्म तामिळनाडूतील कडलोर येथे २४ एप्रिल १९३४ रोजी झाला. 
  • त्यांचा सोवाबारियावथी या नियतकालिकात त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला होता. ‘आनंद विकटन’ या साप्ताहिकात १९६० च्या सुमारास ते लिहीत होते. 
  • त्या काळात त्यांचे लेखन वाचकप्रिय ठरले होते. समाजातील वंचित गटांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. त्यांच्या साहित्याने तामिळ भाषेला समृद्ध केले. 
  • त्यांची ‘सिला नेरंगलील मनिथरगल’ ही त्यांची कादंबरी गाजली. त्यासाठी त्यांना १९७२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.  
  • सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, राजा राजन पुरस्कार, साहित्य अकादमीचे फेलो अशा अनेक मानसन्मानांबरोबरच २००२ मध्ये साहित्यातील देशाचा सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला. रशियाने २०११ मध्ये ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप पुरस्कार देऊन त्यांना गौरवले. 
  • भाकप नेत्यांचा नेहरूप्रणीत समाजवाद त्यांना आवडत होता व त्यांना इंदिरा गांधी यांच्याविषयी आदर होता. नंतर ते तामिळ देसीय काटची या ए. व्ही. के. संपथ यांच्या पक्षात गेले व सरतेशेवटी काँग्रेसवासी झाले. 
  • काँग्रेसचे नवशक्ती नावाचे वृत्तपत्र ते संपादित करीत असत. कालांतराने लेखक म्हणून त्यांची लोकप्रियता कमी झाली. 

    E.M.Hanifa
  • प्रख्यात तमिळ मुस्लिम गायक आणि द्रमुकचे प्रचारक इ. एम. हनिफा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. 
  • हनिफा यांनी अनेक तमिळ मुस्लिम भक्तीगीते गायली असून गेल्या ५० वर्षांपासून ते द्रमुकचे प्रमुख प्रचारक होते. 
  • नागपट्टीणम जिल्ह्यातील नागोर या तिर्थस्थानी जन्म घेतलेल्या हनिफा यांचा आवाज द्रमुकमध्येही फार लोकप्रिय होता. द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी हनिफा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा