चालू घडामोडी - ३० मार्च २०१५


    one horned Rhinoceros
  • आसाममधील प्रसिद्ध काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातील एकशिंगी गेंड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातच गेंड्यांची गणना पूर्ण झाली असून त्याप्रमाणे या जंगलात ७२ गेंड्यांची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यासोबतच, एकूण ५४ गेंड्यांची शिकारही करण्यात आली आहे.
  • खास एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात सध्या २,४०१ गेंडे आढळून आले आहेत.
  • २०१३ या वर्षातील गणनेत ही संख्या २,३२९ असल्याचे नमूद करण्यात आले होते.
  • याशिवाय, फिरताना काझिरंगाच्या जंगलाबाहेर गेलेल्या गेंड्यांची यात गणना करण्यात आली नसून तो आकडा २०० पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
  • केंद्रीय वनमंत्री : प्रकाश जावडेकर

    Balbir Singh Senior
  • माजी आलिंपियन बलविर सिंह सिनियर यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे.
  • १९४८, १९५२, १९५६ अशा अनुक्रमे लंडन, हेलसिंकी आणि मेलबर्न येथील ऑलंपिक स्पर्धेदरम्यान सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बलबिर सिंह यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराची ३० लाख रुपये रोख रक्कम देण्यात आली
  • डिफेंडर लाकडा आणि फॉरवर्ड वंदना यांना प्लेयर ऑफ द इयर म्हणून ध्रुव बत्तरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या खेळाडूंना २५ लाख रूपयांचा पुरस्कार निधी देण्यात आला आहे.

  • अडूर गोपालकृष्णन यांना त्यांच्या चित्रपट निर्मितीतील योगदानाबद्दल विश्वरत्न डॉ. भूपेन हजारिका आतरराष्ट्रीय एकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
  • ते केरळमधील प्रसिध्द चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक आहेत.  त्यांनी १९७२ साली ‘स्वयंवरम’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
  • त्यांना १६ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १७ केरळ राज्य चित्रपट पुरस्कार तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.
  • तसेच त्यांना पद्मश्री (१९८४), पद्मविभूषण (२००६) आणि दादासाहेब फाळके पुरस्कार (२००४) मिळाले आहेत.
  • पद्मविभूषण प्राप्त हा पुरस्कार मिळविणारे गोपालकृष्णन हे दुसरे व्यक्ती आहेत.
  • विश्वरत्न डॉ. भूपेन हजारिका आंतरराष्ट्रीय एकता पुरस्काराबद्दल : 
  • सुरुवात : डॉ. भूपेन हजारिका यांच्या सन्मानार्थ २०१३ पासून
  • स्वरूप : ५ लाख रुपये रोख, प्रशस्ती पत्र आणि पुस्तकांचा संग्रह
  • आसाम साहित्य सभेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
  • आसाम साहित्य सभेने ५ नोव्हेबर २०११ रोजी भूपेन हजारिका यांच्या मृत्युनंतर त्यांना ‘विश्वरत्न’ पदवी बहाल केली होती.

  • भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) सरचिटणीसपदी एस. सुधाकर रेड्डी यांची फेरनिवड करण्यात आली. ही निवड तीन वर्षांसाठी असणार आहे.
  • तसेच, पक्षाचे ज्येष्ठ नेते गुरुदास दासगुप्ता यांचीही सहायक सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. भाकपच्या २२ व्या परिषदेच्या अखेरच्या दिवशी या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या.

  • नुकतेच जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान निश्चित केलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू साईना नेहवालने इंडीयन ओपन सुपर सिरिज टुर्नामेंटच्या फायनलमध्ये माजी विश्वविजेती थायलंडची बॅडमिंटनपटू रॅचनॉक इंतानोनला पराभूत करून विजय मिळवला. नेहवालने इंतानोनला २१-१६, २१-१४ ने पराभूत करत विजय मिळवला आहे.
  • या विजयानंतर साईना नेहवाल इंडिया ओपन सुपर सीरिज जिंकणारी
    Saina Nehwal and K. Shrikant
    पहिली भारतीय बॅडमिंटनपटू
    बनली आहे.
  • सायनाचे हे कारकीर्दीमधील १५ वे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.
  • त्यापाठोपाठ जागतिक क्रमावारीत के. श्रीकांतनेही इंडिया ओपन सुपर सीरिज पुरुष एकेरीमध्ये विजेतेपद मिळवले.
  • श्रीकांतचे या महिन्यातील हे दुसरे विजेतेपद आहे. त्याने या महिन्याच्या सुरवातीस स्विस ओपन स्पर्धा जिंकली होती.
  • श्रीकांतने निर्णायक लढतीत व्हिक्टर ॲक्सेलसेन याचा १८-२१, २१-१३, २१-१२ असा पाडाव केला.

    Austrelia wins World Cup 2015
  • न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वकरंडकावर आपले नाव कोरले.
  • न्यूझीलंडचा जमलेला डाव मोडणारा जेम्स फॉकनर सामन्याचा, तर स्पर्धेत आपल्या अचूकतेची जरब बसवणारा मिशेल स्टार्क स्पर्धेचा मानकरी ठरला. दोघांनाही सचिन तेंडुलकरच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
  • विजेतेपदाचा करंडक आयसीसीचे कार्याध्यक्ष श्रीनिवासन यांच्या हस्ते ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने स्वीकारला.
  • ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९८७, १९९९, २००३, २००७ असा चार वेळा विश्वकप जिंकलेला आहे.
  • या विजयाबरोबर मायदेशात विश्वकप जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा देश बनला आहे. (पहिला : भारत २०११ विश्वकप )
  • अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉटिंग नंतर विश्वकप जिंकणारा मायकल क्लार्क हा चौथा ऑस्ट्रेलियन कप्तान ठरला.
  • क्लार्कने हा विश्वकप फिलीप ह्युजेसला समर्पित केला. फिलीप ह्युजेसचा काही महिन्यांपूर्वी सामन्यादरम्यान चेंडू लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात एकही भारतीय खेळाडूला स्थान देण्यात आलेले नाही.
  • आयसीसीने जाहीर केलेल्या संघाचे कर्णधारपद न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅकलम याच्याकडे देण्यात आले आहे.
  • विश्वकरंडकातील कामगिरीच्या आधारावर आयसीसीने हा संघ निवडला आहे. या संघात न्यूझीलंडचे चार, ऑस्ट्रेलियाचे तीन, दोन दक्षिण आफ्रिकेचे आणि एक श्रीलंकेच्या खेळाडूचे नाव आहे. तर, झिंबाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलर याचा १२ वा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
  • आयसीसीचा संघ पुढीलप्रमाणे : ब्रेंडन मॅकलम (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, कुमार संगकारा, स्टिव्ह स्मिथ, एबी डिव्हिलर्स, ग्लेन मॅक्सवेल, कोरे अँडरसन, डॅनिएल व्हिटोरी, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मॉर्ने मॉर्केल, ब्रेंडन टेलर (बारावा खेळाडू).

  • ऑस्ट्रेलियाजवळील पपुआ न्यू गियाना बेटांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला असून, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.५ इतकी मोजण्यात आली आहे. बेटांना त्सुनामी लाटांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

  • पर्यावरण संरक्षणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी नववा ‘Earth Hour (अर्थ आवर २०१५)’ संपूर्ण जगात साजरा केला गेला.
  • ‘अर्थ आवर २०१५’ने  लोकांना नूतनीकरणक्षम उर्जेचा वापर करून स्वच्छ व अधिक शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले.
  • अर्थ आवर या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संस्थेद्वारे दरवर्षी करण्यात येते.
  • २००७ साली सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा