प्रश्नसंच १५१ - अर्थशास्त्र


MT Quiz
[प्र.१] इ.स.१९४६ साली ............. यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागारी बोर्डाच्या शिफारशीवरून १५ मार्च १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.
१] फाजल अली
२] के.सी.नियोगी
३] मोरारजी देसाई
४] ग.वा.मावळणकर


२] के.सी.नियोगी

[प्र.२] पुढीलपैकी अयोग्य जोडी निवडा.
१] समुदाय विकास कार्यक्रम - १९५२
२] जवाहर रोजगार योजना - १९८९
३] अन्नपूर्णा योजना - १९९९
४] इंदिरा आवास योजना - १९७४


४] इंदिरा आवास योजना – १९७४
  • इंदिरा आवास योजना - १९८५

[प्र.३] २ फेब्रुवारी २०१५ रोजी रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी जाहीर केलेल्या आरबीआयच्या द्वीमासिक आढाव्यानंतर एसएलआर (SLR) किती आहे ?
१] २२ टक्के
२] २२.५ टक्के
३] २१.५ टक्के
४] २३ टक्के


३] २१.५ टक्के

[प्र.४] UNCTAD (युनायटेड नेशन्स कॉन्फरंस ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट) या संस्थेच्या अहवालानुसार सर्वाधिक FDI असलेला देश कोणता आहे?
१] चीन
२] भारत
३] अमेरिका
४] ब्राझील


१] चीन

[प्र.५] खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
अ] कृषी खर्च व मूल्य आयोगाची स्थापना १९६५ साली करण्यात आली.
ब] या आयोगामार्फत २४ मुख्य पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीची शिफारस करते.
क] या शिफारशीच्या आधारावर कृषी मंत्रालय किमान आधारभूत किंमत जाहीर करते.

१] फक्त अ
२] अ आणि ब
३] ब आणि क
४] फक्त क


४] फक्त क

[प्र.६] कपूर समितीने पुढीलपैकी कोणती शिफारस केली होती?
१] देशात पेट्रोलियम उद्योग निर्माण करणे.
२] देशातील पेट्रोलियम उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे.
३] पेट्रोलियम उद्योगांच्या विकासाचे धोरण राबविण्यात यावे.
४] वरील सर्व


३] पेट्रोलियम उद्योगांच्या विकासाचे धोरण राबविण्यात यावे.

[प्र.७] खुल्या आर्थिक धोरणाचा उद्योगधंद्यावर झालेला चांगला परिणाम कोणता?
अ] देशातील रोजगार पातळी वाढविण्यामध्ये उद्योगधंद्यांचावाटा वाढत गेला.
ब] सार्वजनिक क्षेत्रातील औद्योगिक गुंतवणूक वाढत गेली.
क] लघुउद्योगांचे आजारपण वाढले.
ड] भारतीय उद्योगांना विदेशी उत्पादनांशी स्पर्धा करणे कठीण जाऊ लागले.

१] फक्त ब बरोबर
२] क व ड बरोबर
३] अ व ब बरोबर
४] फक्त अ बरोबर


३] अ व ब बरोबर

[प्र.८] भारताने खाजगीकरणाचे धोरण स्वीकारले त्याचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे?
अ] भारतातील विविध आर्थिक सेवांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे.
ब] सरकारी उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी खाजगी क्षेत्राचा मार्ग स्वीकारणे.
क] खाजगीकरणातून उत्पादन घटकांची मालकी एका व्यापक पायावर निर्माण करणे.
ड] उद्योग व्यवसायातील व्यवस्थापनाचा दर्जा सुधारण्यासाठी खाजगीकरणाचे धोरण स्वीकारणे.

१] अ व ब बरोबर
२] फक्त क बरोबर
३] फक्त ड बरोबर
४] सर्व बरोबर


४] सर्व बरोबर

[प्र.९] पुढीलपैकी कोणते दहाव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट नव्हते?
१] स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणे.
२] दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण कमी करणे.
३] देशात साक्षरतेचे प्रमाण ८०% पर्यंत नेणे.
४] बालमृत्यूचे प्रमाण २०१२ पर्यंत ० टक्क्यावर आणणे.


४] बालमृत्यूचे प्रमाण २०१२ पर्यंत ० टक्क्यावर आणणे.

[प्र.१०] भारताच्या दारिद्र्याच्या बाबतीत अयोग्य विधाने ओळखा?
अ] भारतात निरपेक्ष दारिद्र्य मोठ्या प्रमाणात आहे.
ब] इ.स. १८७६ साली दादाभाई नौरोजी यांनी भारतीय दारिद्र्याचा अभ्यास करून विश्लेषण केले.
क] इ.स. १९६७-६८ मध्ये दांडेकर आणि रथ यांनी दारिद्र्याचा अभ्यास केला.
ड] तेंडूलकर समितीच्या मते २००४-०५ मध्ये भारतात दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण ३७.२% होते.
इ] वाय.व्ही.रेड्डी समितीच्या मते ग्रामीण भागातील ६०% लोक  दारिद्र्यरेषेखाली आहेत.

१] फक्त अ आणि ड
२] फक्त ब
३] फक्त क
४] फक्त इ

४] फक्त इ

५ टिप्पण्या: