प्रश्नसंच १५५ - चालू घडामोडी


Question Set on Current Affairs
[प्र.१] पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या आंबेडकर-पेरियार अभ्यास गटाची मान्यता कोणत्या संस्थेने काढून घेतली होती?
१] आयआयटी बंगळूर
२] आयआयटी खरगपूर
३] आयआयटी भोपाळ
४] आयआयटी मद्रास


४] आयआयटी मद्रास

[प्र.२] महिलांसाठीच्या वाहनकर्जावर सूट देणारी नवी ‘हर घर हर कार’ नावाची योजना कोणत्या बँकेने सादर केली?
१] स्टेट बँक ऑफ इंडिया 
२] भारतीय महिला बँक
३] पंजाब नॅशनल बँक
४] सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया


१] स्टेट बँक ऑफ इंडिया
या योजनेमध्ये महिलांना १० टक्के कर्जदराने वाहनकर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेशिवाय वाहनकर्ज घेणाऱ्या महिलांना १०.२५ टक्के व्याजदराने वाहनकर्ज उपलब्ध आहे.


[प्र.३] नऊ महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुख्य माहिती आयुक्तपदी (सीआयसी) नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] विजय शर्मा
२] के. व्ही. चौधरी
३] प्रदीप कुमार
४] मल्लिकार्जुन खरगे


१] विजय शर्मा

[प्र.३] नऊ महिन्यांपासून रिक्त असलेल्या केंद्रीय दक्षता आयुक्तपदी (सीव्हीसी) नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] विजय शर्मा
२] के. व्ही. चौधरी
३] प्रदीप कुमार
४] मल्लिकार्जुन खरगे


२] के. व्ही. चौधरी

[प्र.५] बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदी माजी कर्णधार कोणाची नियुक्ती केली आहे.?
१] राहुल द्रविड
२] रवी शास्त्री
३] सुनील गावस्कर
४] सुंदरम रवी


२] रवी शास्त्री

[प्र.६] आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठाचे नवे कुलगुरु म्हणून नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] अमर्त्य सेन
२] जॉर्ज यो
३] जो बिडेन
४] दलाई लामा


२] जॉर्ज यो
ते सिंगापुरचे माजी विदेशमंत्री आहेत.


[प्र.७] कर चुकविल्यामुळे कोणत्या पाकिस्तानी खेळाडूची लॅंड क्रूझर ही अलिशान गाडी महसूल खात्याने जप्त केली?
१] शोएब मलिक
२] शाहीद आफ्रिदी 
३] शोएब अख्तर
४] मिस्बा उल हक


४] मिस्बा उल हक

[प्र.८] केंद्र सरकारने नुकतीच कोणाची पश्चिम आशिया आणि अफगाण-पाकिस्तान प्रदेशासाठी विशेष दूत म्हणून नेमणूक केली आहे?
अ] अलोक शहा
ब] राकेश मारिया
क] सईद असिफ इब्राहिम
ड] प्रवीण राणा


क] सईद असिफ इब्राहिम
सईद असिफ इब्राहिम गुप्तवार्ता विभागाचे (इंटेलिजन्स ब्युरो) माजी प्रमुख आहेत.


[प्र.९] महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने १ जून २०१५ पासून खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. देशात सर्व प्रथम कोठे खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी घालण्यात आली होती?
१] चंडीगढ
२] नवी दिल्ली
३] दार्जीलिंग
४] शिमला


१] चंडीगढ

[प्र.१०] कोणत्या क्लबने आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद पटकावले आहे?
१] मोहन बागान क्लब
२] बेंगळुरु क्लब
३] कोलकत्ता क्लब
४] फोर्स-वन क्लब


१] मोहन बागान क्लब

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा