प्रश्नसंच १५९ - चालू घडामोडी [सहाय्यक पूर्वपरीक्षा २०१५]


Current Affairs[प्र.१] मानवी दुध बँक ‘जीवन धारा’ चालविणारे पहिले राज्य कोणते?
१] पंजाब
२] मध्यप्रदेश
३] राजस्थान
४] महाराष्ट्र


३] राजस्थान

[प्र.२] केद्रीय ग्रहमंत्रालयाने १४ एप्रिल २०१५ रोजी निर्णय घेवून प्रवासी visa-on-arrival योजनेचे नाव बदलून ________ केले?
१] e-spot-visa
२] e-arrival-visa
३] e-tourist-visa
४] visa-at-a-glance


३] e-tourist-visa

[प्र.३] ‘गुड गव्हर्नंस : नेव्हर ऑन इंडियाज रडार’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
१] शेखर गुप्ता
२] शिवराज पाटील
३] किरण बेदी
४] माधव गोडबोले


४] माधव गोडबोले

[प्र.४] ऑक्टोबर २०१४मध्ये श्री गणपतराव देशमुख का चर्चेत आले होते?
१] त्यांनी मॅगसेसे पारितोषिक जिंकले.
२] त्यानी ११व्यांदा विधानसभा जिंकून इतिहास निर्माण केला.
३] ते सर्वोदयी नेते आहेत.
४] ते अण्णा हजारे यांचे समर्थक आहेत.


२] त्यानी ११व्यांदा विधानसभा जिंकून इतिहास निर्माण केला.

[प्र.५] ‘संसद आदर्श ग्राम योजने’बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१] संसद सभासद कोणत्याही प्रकारचे गाव दत्तक घेवू शकतात.
२] अशा गावाची लोकसंख्या ५०००-१०००० च्या दरम्यान असावी.
३] खासदार आपले स्वतःचे गाव दत्तक घेवू शकत नाही.
४] २०१६ पर्यंत एक गाव आणि २०१९ पर्यंत आणखी दोन गावे विकसित करावीत.


२] अशा गावाची लोकसंख्या ५०००-१०००० च्या दरम्यान असावी. 
बरोबर विधान: अशा गावाची लोकसंख्या पठारी भागात ३०००-५००० आणि दुर्गम भागात १०००-३०००च्या दरम्यान असावी.

[प्र.६] ‘अटल पेन्शन योजने’बाबत खालीपैकी काय चुकीचे आहे?
१] सहभागी होण्याचे किमान वय १८ वर्षे
२] सहभागी होण्याचे कमाल वय ४० वर्षे
३] वर्गणीदाराने आपला हिस्सा भरण्याचा किमान कालावधी २० वर्षे किंवा अधिक
४] सुरवात १ जानेवारी २०१६ पासून


४] सुरवात १ जानेवारी २०१६ पासून 
बरोबर विधान : सुरवात ९ मे २०१५ पासून

[प्र.७] खाली विधाने विचारात घ्या.
अ] क्रिस्टीनो रोनाल्डोने दिनांक ५ एप्रिल २०१५ रोजी सामना खेळताना पहिल्यांदाच पाच गोल केले.
ब] रोनाल्डोच्या पाच गोलमध्ये, त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान हॅटट्रिक फक्त आठ मिनीटात आहे.
क] त्याच्या कारकिर्दीतील ही ४१ वी हॅट-ट्रिक आहे. 

१] विधाने अ, ब बरोबर, क चूक
२] विधाने अ, ब बरोबर, क चूक
३] विधाने अ, ब बरोबर, क चूक
४] सर्व विधाने बरोबर आहेत.


१] विधाने अ, ब बरोबर, क चूक 
बरोबर विधान: त्याच्या कारकिर्दीतील ही २९ वी हॅट-ट्रिक आहे.

[प्र.८] ‘सितारा देवी’बाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
१] ती वाराणसीमधील कथाकार (कथा सांगणाऱ्या) कुटूबातील होती.
२] आपले वडील सुखदेव महाराज, लच्छू महाराज आणि शंभू महाराज यांच्या तालमीत कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले होते.
३] रवींद्रनाथ टागोरांनी तिला ‘नृत्य सम्राज्ञिनी’ नाव दिले होते.
४] तिला पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता.


१] ती वाराणसीमधील कथाकार (कथा सांगणाऱ्या) कुटूबातील होती.

[प्र.९] तृतीय पंथीयांच्या विधेयकाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा.
अ] सामान्य नागरिकांप्रमाणेच तृतीय पंथीयांना समान हक्क मिळावे हा उद्देश आहे. 
ब] ते द्रमुक संसद सदस्य, तीरुची सिवा यांनी राज्यसभेत मांडले.
क] गेल्या ४५ वर्षात राज्यसभेने संमत केलेले हे पहिले खाजगी विधेयक आहे.

वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत?
१] केवळ अ
२] केवळ अ आणि ब
३] केवळ ब आणि क 
४] अ, ब आणि क


४] अ, ब आणि क

[प्र.१०] खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१] पालघर हा महाराष्ट्रचा ३६वा जिल्हा आहे.
२] जिल्ह्यामध्ये पालघर, वसई, मोखाडा, जव्हार, वाडा, तलासरी, विक्रमगड आणि डहाणू हे आठ तालुके आहेत.
३] जिल्ह्यात वसई -विरार, जव्हार, डहाणू आणि पालघर या चार नगरपरिषदा आहेत. 
४] वरील एकही नाही.


३] जिल्ह्यात वसई -विरार, जव्हार, डहाणू आणि पालघर या चार नगरपरिषदा आहेत.

[प्र.११] वीरप्पा मोईली यांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या.
अ] ते त्याच्या ‘कोट्टा’ या कादंबरीसाठी ‘सरस्वती सम्मान २०१४’ साठी निवडले गेले आहेत.
ब] ते कर्नाटकचे १९९२ ते १९९४ या काळात मुख्यमंत्री होते.
क] ‘सरस्वती सम्मान’ हा के.के. बिर्ला फाउंडेशन द्वारा १९९१ मध्ये स्थापन केला गेला.
ड] ते प्रशासकीय सुधार आयोगाचे अध्यक्ष होते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
१] अ आणि ब
२] अ, ब आणि क
३] ब, क आणि ड
४] अ, ब, क आणि ड


३] ब, क आणि ड 
बरोबर विधान: ते त्याच्या ‘रामायण महान्वेशनम’ या कादंबरीसाठी ‘सरस्वती सम्मान २०१४’ साठी निवडले गेले आहेत.

[प्र.१२] ‘प्रधानमंत्री जन धन योजने’बाबत कोणती विधाने बरोबर आहेत?
१] खातेदारास डेबिटकार्डद्वारे एक लाख रुपयांचा अपघात विमा.
२] खातेदारास अधिविकर्ष (overdraft) सवलत.
३] ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद.
४] पहिल्या पाच महिन्यात महिलांद्वारे उघडण्यात आलेली खाती पुरुषांपेक्षा जास्त.

१] अ आणि ब
२] अ, ब आणि क
३] ब, क आणि ड
४] अ, ब, क आणि ड


४] अ, ब, क आणि ड

[प्र.१३] महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०१४ बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१] एकूण २८६ महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली.
२] एकुण २८८ जागापैकी फक्त २० जागांवर महिला उमेदवार जिंकल्या.
३] महिलांचे विधानसभेतील प्रतिनिधित्व ८ टक्के.
४] लोकसंख्येनुसार राज्यात सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे.


२] एकुण २८८ जागापैकी फक्त २० जागांवर महिला उमेदवार जिंकल्या.

[प्र.१४] महाराष्ट्राच्या नवीन सुधारीत पथकर धोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ] अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या प्रकल्पांवर पथकर आकारला जाणार नाही.
ब] २०० कोटी रुपयांखालील प्रकल्प खाजगीकरणांतर्गत करण्यात येणार नाही.
क] फक्त २०० कोटी रुपयांपुढील खाजगी प्रकल्पांसाठी पथकर आकारला जाईल.
ड] एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यांमधील अंतर किमान २० किमी असावे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत?
१] अ, ब आणि क
२] अ, क आणि ड
३] ब, क आणि ड
४] अ, ब, क आणि ड


४] अ, ब, क आणि ड

[प्र.१५] बालकामगार कायद्यात दुरुस्ती सुचविताना कॅबिनेटने पुढीलपैकी कोणती शिक्षा सुचविली नाही.
१] गुन्हा दखलपात्र केला जाणे.
२] पहिल्या गुन्ह्याबद्दल ६ ते २४ महिन्यांचा तुरुंगवास किंवा रु. २०००० ते रु. ५०००० दंड किंवा दोन्हीही शिक्षा दिल्या जाणे. 
३] दुसऱ्या व नंतरच्या गुन्ह्याबद्दल १२ ते ३६ महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणे.
४] आई-वडील किंवा पालकांना पहिल्या गुन्ह्याबद्दल रु. १०००० दंड केला जाणे.


४] आई-वडील किंवा पालकांना पहिल्या गुन्ह्याबद्दल रु. १०००० दंड केला जाणे. 
बरोबर विधान : पहिल्या गुन्ह्य़ासाठी मुलांच्या पालकांना दंडात्मक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली नाही, तथापि, पालकांनी पुन्हा चूक केल्यास त्यांना १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.

15 comments:

 1. प्रश्नसंच 160 ची उत्तरे पाठवा

  ReplyDelete
 2. प्रश्नसंच 159 चालु घडामोडी सहाय्यक पुर्वपरिक्षा 2015 ची उत्तर लिस्ट पाठवा

  ReplyDelete
 3. How to get answers..?
  I want answers of all que..

  ReplyDelete
 4. kindly provide the answer of all questions

  ReplyDelete
 5. click here for answer button is not working

  ReplyDelete
  Replies
  1. Try again by using Use Google Chrome (For PC) or UC web Browser (For Mobile).

   Delete
 6. enable key to download the GK in Pdf
  even if u r sending in mail there we are unable to download that GK as pdf.

  ReplyDelete
 7. and i have tried by any browser but i am unable to download files sent by u in PDF.

  ReplyDelete
 8. If we are solving on PC Quetion Papers only 15 question are visible where it contains more than 100 questions. there is no any nest button

  ReplyDelete
 9. otherwise overall MT app is very good for study

  ReplyDelete
 10. Sir plese add the option of download previous year or latest q paper for practice perpose

  ReplyDelete