चालू घडामोडी - ७ व ८ ऑगस्ट २०१५


निवडणुकीत मतदान बंधनकारक करणारे गुजरात देशातील पहिले राज्य

  • गुजरात सरकारने राज्यातील स्थानिक निवडणुकीत मतदान न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
  • गुजरात स्थानिक कायदा २००९ संशोधक अॅक्ट अंतर्गत हा निर्णय घेतला असून स्थानिक निवडणुकीत मतदान बंधनकारक करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. 
  • गुजरातमध्ये गतवर्षी स्थानिक निवडणुकीत केवळ ५० ते ६० टक्क्यापर्यंत मतदान झाले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. गुजरात पंचायत निवडणूक नियम (संशोधन) २०१५ आणि नगर पालिका निवडणूक नियम (संशोधन) २०१५ अंतर्गत मतदान न करणाऱ्या व्यक्तीला १०० रुपये दंड केला जाणार आहे. 
  • निवडणुकीत मतदान न करणाऱ्या व्यक्तीला मॉनिटरी दंड आणि सोशल सर्विस अंतर्गत शिक्षा दिली जाऊ शकते. तसेच त्या व्यक्तीला सरकारी योजनेपासूनही वंचित ठेवण्याचा सरकार पातळीवर विचार सुरु आहे.
  • मतदान यादीत नाव असलेल्या पण मतदान न करणाऱ्या व्यक्तींना निवडणूक अधिकारी मतदानानंतर नोटीस बजावतील. महिनाभराच्या आत त्या व्यक्तीला मतदान न करण्याचे कारण सांगावे लागेल. दोषी आढळल्यास १५ दिवसात त्या व्यक्तीला १०० रुपये दंड भरावा लागेल.

‘नागा’ करारावर शेजारी राज्यांचा आक्षेप

  • नागालँडमध्ये शांतता नांदावी म्हणून केंद्र सरकारने केलेल्या ऐतिहासिक करारावर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूर या शेजारी राज्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 
  • ‘हा करार करताना केंद्र सरकारने आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळेच आमच्या राज्यांची एक इंचही जमीन आम्ही देणार नाही’, असा ठाम पवित्रा या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या भूमिकेमुळे ‘नागा’ करार पेचात सापडण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
  • नागा बंडखोरांशी तब्ब्ल १६ वर्षे चाललेल्या चर्चेला ३ ऑगस्ट रोजी मूर्त स्वरूप आले.
  • नागालँडमधील ‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड’ (इसाक-मुईवाह) या बंडखोर गटाबरोबरच्या ऐतिहासिक करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सरकार आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या.
  • या कराराने नागालँडमध्ये शांततेची नवी पहाटच उजाडल्याचे दिसत होते मात्र आता शेजारी राज्यांनीच त्यावर आक्षेप घेऊन वादाची ठिणगी टाकलीय.

मंगळ ग्रहाची सफर ऑनलाइन

  • अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने (नासा) क्युरिऑसिटी रोव्हर या मंगळ यानाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मंगळ ग्रहाची सफर ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यानाने केलेला मंगळप्रवास त्यामुळे अनुभवता येईल. मुख्य म्हणजे यामुळे नवोदित संशोधक, विद्यार्थी आणि जिज्ञासूंना हा खजिना उपलब्ध होणार आहे.
  • ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ मंगळाची अद्भूत सफर केली आहे. त्यातून ‘नासा’कडे मोठ्या प्रमाणावर छायाचित्रे व माहिती संकलित झाली आहे. शिवाय ५० वर्षांतील अन्य यानाच्या मदतीने मिळालेली माहितीही ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे.
  • ‘मार्स ट्रेक’ हे वेबबेस्ड अॅप्लिकेशन असून, ते नेटकरांना विनामूल्य उपलब्ध असेल. मंगळावर पहिली मानवी मोहीम २०३०मध्ये आखली जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांची नोंदणी करण्यासाठी व अन्य माहितीची आदानप्रदान करण्यासाठी ‘मार्स ट्रेक’चा वापर सध्या केला जातो.
  • ६ ऑगस्ट २०१२ रोजी नासाने क्युरिऑसिटी रोव्हर हे यान मंगळावर सोडले. कारच्या आकाराचे हे यान यशस्वीपणे मंगळावर उतरलेच पण त्याच्यावर सोपविण्यात आलेले कामही ते चोख पार पाडते आहे. या यानाकडून मिळालेली माहिती, मातीचे नमुने, प्रतिमा अतिशय महत्त्वाच्या आहेत.

अॅमेझॉनने पुण्यात ग्राहक सेवा केंद्र

    Amazon
  • ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या अॅमेझॉनने पुण्यात तिसरे ग्राहक सेवा केंद्र सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे.
  • कंपनीने २००५मध्ये पहिले केंद्र हैदराबादमध्ये सुरू केले. त्यानंतर गेल्या वर्षी दुसरेही केंद्र हैदराबादमध्येच सुरू करण्यात आले.
  • या केंद्रांच्या माध्यमातून अॅमेझॉन डॉट इन आणि अॅमेझॉन डॉट कॉम या वेबसाइटसना सपोर्ट देण्यात येत आहे. या शिवाय ई-मेल, चॅट, फोन आणि सोशल माध्यमांद्वारे येणाऱ्या ग्राहकांच्या मागण्यांची पूर्तता येथून करण्यात येते.
  • या केंद्रातून किमान शंभर जणांना रोजगार मिळेल. देशात विस्तार करण्यासाठी गेल्या वर्षी १२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे सूतोवाच कंपनीतर्फे करण्यात आले होते.

गतिमंदांच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला १७३ पदके

  • लॉस अँन्जेलीस येथे झालेल्या गतिमंदांच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताने तब्बल १७३ पदकांची कमाई केली आहे.
  • ‘स्पेशल ऑलिंपिक भारत’ या नावाने गतिमंदांच्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या २७५ जणांच्या भारतीय संघाने १४ वेगवेगळ्या खेळांमधील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ४७ सुवर्ण, ५४ रौप्य आणि ७२ कांस्य पदके पटकावली आहे.
  • अॅथलेटिक्समध्ये भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ४७ पदकांची कामाई केली, ज्यात दोन वेगवेगळ्या प्रकारच्या १०० मीटर शर्यतींमधील दोन सुवर्ण पदकांचाही समावेश आहे. सॉफ्ट बॉल या प्रकारात प्रथमच भाग घेणाऱ्या भारतीय संघाने थेट सुवर्ण पदक पटकावले.
  • २०११मध्ये ग्रीसमधील अथेन्समध्ये झालेल्या गतिमंदांच्या उन्हाळी ऑलंपिक स्पर्धांमध्ये भारताने १५६ पदके जिंकली होती. यात ५६ सुवर्ण, ४६ रौप्य आणि ५२ कांस्य पदकांचा समावेश होता.
  • २०१७ मध्ये गतिमंदांच्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहेत.

लाचप्रकरणी गोव्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आलेमाव यांना अटक

  • लुइस बर्जर लाचप्रकरणी गोव्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांना पोलिसांनी अटक केली असून, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचप्रमाणे कामत यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
  • या लाचप्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा आलेमाव यांनी केला असून राजकीय हेतूने आपल्याला अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हा आरोप फेटाळला आहे.

भारती एअरटेलच्या ४जी सेवेचा देशव्यापी विस्तार

  • भारती एअरटेलने ४जी तंत्रज्ञानावर आधारीत सेवेच्या देशव्यापी विस्ताराची घोषणा ६ ऑगस्ट रोजी केली आहे.
  • देशातील निवडक शहरांमधून या तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीनंतर ६ ऑगस्टपासून एअरटेलची ४जी सेवा भारतातील २९६ शहरांमधून उपलब्ध होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • विद्यमान ३जी सेवाधारकांना त्याच किमतीतच एअरटेलचे नवीन ४जी सेवा (डाटा) उपलब्ध होणार आहे. त्यासाठी या तंत्रज्ञानावरील नवीन सिम मोबाइलमध्ये बसवावे लागेल. याशिवाय प्रत्येक ४जी सिमबरोबर सहा महिन्यांचे अमर्याद संगीत ऐकण्याची सुविधा देऊ करण्यात आली आहे.
  • मोबाइलधारक ग्राहकसंख्येत २३ कोटी ग्राहकांसह सर्वोच्च स्थानी असलेल्या भारती एअरटेलची ४जी सेवा एप्रिल २०१२ मध्येच कोलकत्यातून सुरू झाली आहे. कोलकात्यासह प्रमुख ५१ शहरांमध्ये तूर्त ही सेवा उपलब्ध होती.
  • ही आता विस्तारली जाणार आहे. या सेवेकरिता कंपनीला २०१० मध्ये १४ परिमंडळासाठी परवाना प्राप्त झाला होता.
  • मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओची ४जी सेवा वर्षभरापासून प्रतीक्षित आहे. ही सेवा आता डिसेंबर २०१५पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. या तंत्रज्ञानासाठी देशव्यापी (२२ परिमंडळ) परवाना मिळविलेली रिलायन्स जिओ ही एकमेव कंपनी आहे.

'तिरुपती'च्या बँक खात्यांत ४.५ टन सोनं

  • आंध्रप्रदेशातील 'तिरुमला तिरुपती देवस्थानम'च्या बँक खात्यांमध्ये तब्बल ४ हजार ५०० किलो सोनं जमा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर व्याज म्हणून देवस्थानाला दरवर्षी ८० किलो सोनं मिळतं. स्टेट बँक ऑफ इंडिया, ओवरसीज बँक आणि कॉर्पोरेशन बँक इथल्या खात्यांमध्ये हे सोनं जमा आहे.
  • देवस्थानाकडे अजून एक हजार किलो सोनं जमा झाले असून लवकरच हे एक टन सोनं एसबीआयमध्ये जमा करण्यात येईल. त्यामुळे देवस्थानच्या खात्यात ५.५ टन सोनं जमा होणार आहे.
  • या एकूण ५.५ टन सोन्याची किंमत जवळपास १ हजार ३२० कोटी रुपये आहे. 
  • केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिराची दारं उघडण्याआधी तिरुपती बालाजी हा देशातील श्रीमंत देव होता. पण आता पद्मनाभस्वामी मंदिर सगळ्यात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं.
  • या मंदिरातील सोनं, चांदी, हिरे, मोती आणि अनेक रत्नजडित मूर्तींची किंमत साधारण १ लाख कोटीच्या आसपास आहे. विशेष म्हणजे, या खजिन्याची मोजदाद अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हा आकडा आणखी वाढणार आहे.

त्रिपुरा विधानसभेत फाशी रद्दचा ठराव

  • निर्घृण गुन्ह्यांच्या प्रकरणात फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी मरेपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्याचा ठराव ७ ऑगस्ट रोजी त्रिपुरा विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. 
  • भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२नुसार कोर्ट फाशीची शिक्षा सुनावते. या कायद्यात आवश्यक सुधारणा करून निर्घृण गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये मरेपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी विनंती हे सभागृह केंद्र सरकारला करत आहेत. 
  • त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या मते, 'फाशीची शिक्षा मिळालेला दोषी जगण्याच्या अधिकारापासून वंचित राहतो. त्यामुळे मरेपर्यंत तुरुंगवास हीच शिक्षा योग्य आहे.'

‘मनरेगा’चा मोबदला थेट बँक खात्यात

    MGNREGA_Logo
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात 'मनरेगा' अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना मिळणारा मोबदला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 
  • मनरेगा अंतर्गत रोजगार हमीच्या कामांवर काम करत असलेल्या लोकांना मोबदला देण्यासाठी चालू आर्थिक वर्षात ३४ हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडे महसुली उत्पन्न वाढल्यास आणखी ५ हजार कोटी रुपये उभारण्याचीही तरतूद त्याचवेळी करण्यात आली आहे.
  • राज्य वित्त विभागाकडे हा निधी वाटून दिल्यास त्यातून तो वापरला न जाण्यासारखे प्रकार घडू शकतात. हे टाळण्यासाठी हा निधी लाभार्थींच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्याचे सरकारने ठरवले आहे. 
  • याविषयीची वित्तसूचना जारी झाल्यावर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय मनरेगा योजनेसाठी लाभार्थींना देण्यात येणारा निधी राज्य रोजगार हमी निधीमध्ये हस्तांतरित करेल. मात्र यामध्ये वित्तसूचनेत नमूद केलेली रक्कमच राज्याच्या खात्यात जमा केली जाईल. त्यानंतर हा निधी प्रत्येक राज्य त्यांतील मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या लोकांच्या खात्यांत बँक किंवा पोस्ट यांच्या माध्यमातून हस्तांतरित करेल.
  • रोजगार हमीचे काम संपल्यावर त्या कामासाठी घेण्यात येणारे हजेरीपुस्तक बंद करण्यात येते. त्यानंतर पंधरा दिवसांत संबंधित लाभार्थी कर्मचाऱ्याला पैसे देणे सरकारला बंधनकारक असते. 
  • केंद्राने राज्यांना निधी दिल्यावर राज्याने तो मनरेगाअंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थींना देण्यात कालापव्यय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्राने थेट असा निधी हस्तांतरित करावा काय याविषयीही विचार सुरू आहे.

काळ्या पैशाविरोधात लढा अधिक तीव्र

  • काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली आहे. या पथकाने केलेल्या शिफारसींचा भांडवल बाजार नियामक सेबीने अभ्यास करण्याचे ठरवले आहे.
  • या शिफारसींविषयी चर्चा सेबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही होणार आहे. या शिफारसींवर विचार करून काळा पैसा निर्माण करणाऱ्या कंपन्या व व्यक्ती यांच्याविरोधातील मोहिम अधिक तीव्र केली जाणार आहे. 
  • यापूर्वी सेबीने शेअर बाजारामार्फत व्यवहार करून कर चुकवणाऱ्या देशातील ९५० कंपन्यांवर कारवाई केली आहे.

अॅशेस मालिकेनंतर मायकल क्लार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

    Michael Clarke
  • ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि शैलीदार फलंदाज मायकल क्लार्क इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अॅशेस मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. २० ते २४ ऑगस्टदरम्यान ओव्हलवर होणारी पाचवी कसोटी क्लार्कच्या कारकीर्दीतील शेवटची कसोटी असेल. त्याच्या कसोटी कारकीर्दीचा समारोप अॅशेसमधील मानहानीकारक पराभवानं होत आहे.
  • जवळपास तीन वर्षं उप-कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर, मायकल क्लार्कनं २०११ मध्ये रिकी पाँटिंगकडून ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची सूत्रं स्वीकारली होती. त्यानंतर गेली चार वर्षं त्यानं सक्षमपणे संघाचं नेतृत्व केलं. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०१५चा विश्वकपदेखील जिंकला होता.
  • अलीकडच्या काळात, दुखापतींनी क्लार्कला चांगलंच छळलं. पाठ आणि मांडीचे स्नायू दुखावल्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर झाला होता. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याने वनडे कारकीर्दीतून निवृत्ती घेतली आहे. टी-२० तून तर त्यानं २०११ मध्येच निवृत्ती घेतली होती आणि आता ११५ वी कसोटी खेळून क्लार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेणार आहे.
क्लार्कची फलंदाजीतील कामगिरी
MatInnsRunsHS100504s6s
Tests1141978628329*282797739
ODIs245223798113085866553
T-20s342848867012910

क्लार्कची गोलंदाजीतील कामगिरी
MatInnsRunsWktsBBMAveEcon4w5w
Tests114651184316/938.192.9102
ODIs2451062146575/3537.644.9811
T20Is341522561/237.508.6500

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा