चालू घडामोडी - १३ व १४ नोव्हेंबर २०१५


भारत-ब्रिटन यांच्यात नागरी अणुकरार

    UK, India announce Civil N-pact
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला नागरी आण्विक करारावर इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याबरोबरच उभय देशांत ९ बिलियन पौंडचा व्यापारी करारही झाला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लंडनमध्ये आगमन झाल्यानंतर ब्रिटिश लष्कराच्या पथकाने त्यांना मानवंदना दिली. कॅमेरून आणि मोदी यांच्यात १० डाउनस्ट्रीट येथे सुमारे ९० मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली.
  • याशिवाय युनोच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या समावेशाला ब्रिटनचा पाठिंबा असल्याचेही कॅमेरून यांनी सांगितले.
  • त्यानंतर जगातील लोकशाही व्यवस्थेचे मंदिर असलेल्या ऐतिहासिक बिटिश संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत भाषण दिले.
 स्वच्छ ऊर्जेसाठी ब्रिटनची मोठी गुंतवणूक 
  • अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातील सुमारे ३.२ अब्ज पौंड किमतीच्या व्यावसायिक करारावर भारत आणि ब्रिटनने स्वाक्षऱ्या केल्या.
  • स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रामधील गुंतवणुकीला चालना देण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले असून, स्वच्छ ऊर्जा परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी नवे शोध आणि संशोधनावर जोर देण्याच्या दृष्टीने भारत आणि ब्रिटनने करार केला आहे.
  • स्वच्छ ऊर्जा संशोधन कार्यक्रमासाठी एक कोटी पौंडांचा निधी संयुक्तरीत्या उपलब्ध करून देण्याची तयारी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी दर्शविली आहे. या वेळी कॅमेरॉन यांनी भारत आणि आफ्रिकेतील अपारंपरिक ऊर्जेशी संबंधित प्रकल्पांसाठी मोठा निधी ब्रिटन उपलब्ध करून देईल, अशी घोषणा केली.
  ब्रिटनसोबत आतापर्यंत झालेले करार 
  • ब्रिटनमधील ऊर्जा कंपन्यांकडून भारतातील गुंतवणूक २.९ वरून ३.४ अब्ज पौंड.
  • किंग्ज कॉलेज हॉस्पिटल, नॅशनल हेल्थ सर्व्हिस ट्रस्ट आणि इंडो-ब्रिटन हेल्थकेअर यांच्यात चंडीगडमध्ये किंग्ज कॉलेज हॉस्पिटल स्थापण्याबाबत करार. 
  • मर्लिन एंटरटेन्मेंटची भारतात पहिल्यांदाच गुंतवणुकीची घोषणा. २०१७ पर्यंत नवी दिल्लीत मादाम तुसाँ वस्तुसंग्रहालय बांधण्यात येईल.
  • जेनस एबीसी १० लाख पौंडच्या मदतीने पुण्याजवळ आर्ट फॅसिलिटी उघडणार.
  • ब्रिटन आणि युरोपमध्ये सौरसंच बनवणाऱ्या ‘लाइफसोर्स’ची दोन अब्ज पौंड गुंतवणुकीची घोषणा. 
  • व्होडाफोन ‘मेक इन इंडिया’अंतर्गत योजनेच्या मदतीसाठी भारतात १३,००० कोटी रुपये गुंतवणुकीची घोषणा  
  • ‘इंटेलिजंट एनर्जी’चा स्वच्छ ऊर्जेअंतर्गत २७,४०० टॉवर उभारण्यासाठी करार
  • हॉलंड ॲण्ड बॅरेट इंटरनॅशनलचा अपोलो हॉस्पिटलसाठी दोनशे लाख पौंडचा व्यवहार 
  • इंडियन बुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडची ओकनार्थ बॅंक लिमिटेडमध्ये ६६० लाख पौंडची गुंतवणूक

पॅरिसमध्ये दहशतवाद्यांचा भीषण हल्ला

  • फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये १३ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात १५३ नागरिकांचा मृत्यू झाला असून, २००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
  • या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने देशाच्या सीमा बंद करत संचारबंदी लागू केली. तसेच अध्यक्ष फ्रांस्वा ओलॉंद यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर करावी लागली आहे.
  • फ्रान्समध्ये झालेल्या या साखळी बॉम्ब स्फोटात बॅटकला कन्सर्ट हॉलमध्ये सर्वाधिक हानी झाली असून, याठिकाणी १०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
  • फ्रान्स-जर्मनीमध्ये फुटबॉल सामना सुरू असताना स्टेडियमजवळ दोन आत्मघाती हल्ले झाले. महत्वाची बाब म्हणजे हल्ल्यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद ही स्टेडियममध्ये उपस्थित हाते. त्यांना तत्काळ सुखरूप बाहेर काढण्यात आले.
  • ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

छगन भुजबळांकडील १६० कोटींची जमीन जप्त

  • ‘महाराष्ट्र सदन’ बांधकामातील कथित गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नवी मुंबईतील खारघर येथील भूखंडावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्तीची कारवाई केली. या जमिनीची किंमत जवळपास १६० कोटी आहे. 
  • खारघरमध्ये देवीशा इन्फ्रा कंपनीकडून गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यासाठी भुजबळ यांनी बनावट कंपन्या दाखवून ६५ एकर भूखंड खरेदी केला होता. या ठिकाणी ‘हेक्सवर्ल्ड’ या नियोजित प्रकल्पासाठी २३०० ग्राहकांकडून ४४ कोटी कंपनीने घेतले; मात्र तिथे कुठलाही प्रकल्प सुरू न झाल्याने ग्राहकांची फसवणूक झाली, असा आरोप आहे. 
  • देवीशा इन्फ्राचे संचालक समीर आणि पंकज भुजबळ यांच्याविरोधात जूनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण असल्याने लाचलुचपतविरोधी विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे.
  • कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता गोळा करून विविध बनावट कंपन्यांत गुंतवल्याप्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे.

ऑफस्पिनर रमेश पोवार निवृत्त

    Ramesh Powar retired
  • तब्बल १५ वर्षे दर्जेदार क्रिकेट खेळल्यानंतर भारताचा ऑफस्पिनर म्हणून काही काळ योगदान देणारा मुंबईचा क्रिकेटपटू रमेश पोवार याने अखेर स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
  • ३७ वर्षीय रमेश पोवारने २ कसोटी सामने व ३१ वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दोन कसोटी सामन्यात पोवारने सहा विकेटस घेतले. वनडेत त्याच्या खात्यात ३४ विकेटस जमा आहेत.
  • मुंबईसाठी मात्र त्याने दिलेले योगदान अधिक प्रभावी होते. तब्बल ४४२ विकेटस त्याच्या नावावर जमा आहेत. साईराज बहुतुलेसह त्याने मुंबईला अनेक रणजी विजेतीपदे जिंकून देण्यात मोलाची जबाबदारी बजावली.
  • पोवारने कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात राजस्थान व गुजरातचेही प्रतिनिधित्व केले.

एडीबीचे भारताला कर्ज

  • आशियाई विकास बँक भारताला २७३ दशलक्ष डॉलरचे कर्ज देणार आहे. यासंदर्भात बँकेबरोबर केंद्र सरकारने एक करार केला आहे.
  • या कर्जातून आसाम, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, ओदिशा व पश्चिम बंगाल येथील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त केले जातील. हे कर्ज भारताला तीन टप्प्यांत दिले जाईल.
  • यातून ग्रामीण भागात कोणत्याही हवामानात टिकू शकतील, असे सुमारे ६ हजार किलोमीटरचे रस्ते बांधले जातील, ज्यामुळे ४ हजार २०० कुटुंबांना लाभ होईल.

निफ्टी निर्देशांकाचे नाव आता ‘निफ्टी ५०’

    Nifty Fifty
  • ३ नोव्हेंबर १९९५ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी निर्देशांक आता ‘निफ्टी ५०’ नावाने ओळखला जाईल.
  • एनएसईची समूह कंपनी असलेल्या ‘इंडिया इन्डेक्स सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स लिमिटेड’ने सीएनएक्स निफ्टीसह विविध ५३ निर्देशांकांच्या नामाभिधानातही बदल केला आहे.
  • गत दोन दशकांत निफ्टी ५०चे बाजारमूल्य ५८.५ टक्क्यांनी वाढले आहे. तर १६ क्षेत्रामध्ये वित्तीय सेवा विभागाने ३१ टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत निफ्टी ५० या निर्देशांकाने ११ टक्के परतावा दिला आहे. निफ्टी ५० ने २००९ मध्ये सर्वाधिक, ७५.८० टक्के परतावा दिला.
  • राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी : चित्रा रामकृष्ण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा