चालू घडामोडी - २३ डिसेंबर २०१५


मोदींचा रशिया दौरा

  Narendra Modi And Vladimir Putin
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या रशिया भेटीवर रवाना झाले. अणुऊर्जा, हायड्रोकार्बन, संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतानाच सामरिक संबंध बळकट करण्यासाठी रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत मोदी चर्चा केली.
 • रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधींचे हस्तलिखित असलेल्या डायरीचे पान आणि प्राचीन तलवारही आठवण म्हणून भेट दिली.
 दौऱ्याचा उद्देश 
 • मोदी १६व्या भारत- रशिया वार्षिक बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी मोदी रशियात जात आहेत.
 • भारत- शियाची ही बैठक दरवर्षी एकदा घेण्यात येते. ही बैठक एक वर्ष भारतात तर दुसऱ्या वर्षात रशियामध्ये आयोजित करण्यात येते.
 • विविध महत्वपूर्ण विषयांवर या बैठकीत चर्चा होते. मोदी पहिल्यांदाच त्यामध्ये सामील होणार आहेत.
 रशियात बिझनेसमनला भेटणार मोदी 
 • मोदी आणि पुतिन १८ भारतीय आणि ३४ रशियन उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. मोदी भारतीय कम्युनिटीच्या लोकांशीही चर्चा करणार आहेत.
 • मोदी-पुतिन यांच्या बैठकीत न्युक्लियर एनर्जी, हायड्रोकार्बनस, संरक्षण आणि बिझनेस आदी मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

किर्ती आझाद भाजपातून निलंबित

  Kirti Azad
 • दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचारावरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना जाहीरपणे लक्ष्य करणारे दरभंगाचे भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांना भाजप पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
 • आझाद यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपात तत्काळ पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असे भाजपातर्फे जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
 • आझाद यांना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी आणि पक्षाशी नाराज असलेले खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पाठिंबा दिला आहे.
 अरुण जेटलींवरील आरोप 
  Arun Jaitley
 • कीर्ति आझाद आणि आम आदमी पार्टीने जेटलींवर दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानाच्या बांधकामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
 • आप नेत्यांचा आरोप आहे, की जेटलींच्या कार्यकाळात दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) फिरोजशहा कोटला स्टेडियमच्या उभारणीसाठी २४ कोटींची तरतूद केली होती. पण त्यावर प्रत्यक्षात ११४ कोटी रुपये खर्च झाले. जेटली हे २०१३ पर्यंत सलग १३ वर्षे या डीडीसीएचे अध्यक्ष होते.
 • १६ कंपन्यांना १ कोटी १५ लाखांचे पेमेंट करण्यात आले. ते पेमेंट एकाच कामासाठी करण्यात आले आहे. हा मनी लाँड्रिंगचा प्रकार आहे. पेमेंट करण्यात आलेल्या पाच कंपन्यांचा मालक, ई-मेल आयडी एकच आहे. निरनिराळ्या नावांनी कंपन्या स्थापन करून ‘डीडीसीए’ची लूट करण्यात आली.
 • दुसरीकडे, भाजप खासदार किर्ती आझाद यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते, डीडीसीएच्या भ्रष्टाचार प्रकरणी मी जेटलींना २०० पत्र आणि ५०० संदेश पाठवले होते, मात्र एकाचेही उत्तर मिळाले नाही.
(डीडीसीए) कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी माजी महाधिवक्ता गोपाळ सुब्रह्मण्यम यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय आयोग नेमण्याचा निर्णय दिल्ली मंत्रिमंडळाने घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ 'क्रिकेटर ऑफ दी इयर'

 • ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या कसोटी क्रिकेटपटू आणि  'क्रिकेटर ऑफ दी इयर' पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
 • कसोटी क्रिकेटपटू आणि क्रिकेटर ऑफ दी इयर हे दोन्ही पुरस्कार एकाचवेळी मिळवणारा स्मिथ सातवा क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कने २०१३ आणि ऑस्ट्रेलियाच्याच मिचेल जॉन्सनने २०१४ मध्ये एकाचवेळी हे दोन्ही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले होते.
 • स्मिथने १८ सप्टेंबर २०१४ ते १३ सप्टेंबर २०१५ या कालावधीत कसोटीमध्ये २५ डावात ८२.५७ च्या सरासरीने १,७३४ धावा केल्या. यात ७ शतकांचा समावेश आहे. स्मिथ हा तेंडुलकरनंतर आयसीसी टेस्ट रॅँकिंगमध्ये नंबर १ ठरलेला दुसरा यंगेस्ट क्रिकेटर आहे.
 • दक्षिण आफ्रिकेच्या ए. बी. डिविलियर्सला २०१५ सालचा ‘सर्वोत्कृष्ट वनडे प्लेयर’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. सलग दुसऱ्यावर्षी डिविलियर्सने वनडे प्लेयरचा पुरस्कार मिळवला. त्याने २० सामन्यात १,२६५ धावा फटकावल्या. यात दोन शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे.
ICC चे पुरस्कार
क्रिकेटरदेशअवॉर्ड
स्टीव्हन स्मिथऑस्ट्रेलियाबेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर
स्टीव्हन स्मिथऑस्ट्रेलियाबेस्ट टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर
एबी डिव्हिलियर्सद. अफ्रीकाबेस्ट वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर
जोस हेजलवुडऑस्ट्रेलियाइमरजिंग प्लेयर ऑफ द ईयर
ब्रॅन्डन मॅक्कुलमन्यूझिलंडस्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड
मॅग लेनिंगऑस्ट्रेलियावुमन क्रिकेटर ऑफ द ईयर
खुर्रम खानयूएईICC एसोसिएट क्रिकेटर ऑफ द ईयर
फॉफ डु प्लेसिसद. अफ्रीकाटी-२० इंटरनेशनल परफॉर्मेंस ऑफ द इअर
स्टेफनी टेलरवेस्ट इंडीजटी-२० वुमन क्रिकेटर ऑफ द ईयर
रिचर्ड कॅटरलबर्गइंग्लंडअंपायर ऑफ द ईयर

 ICC पुरस्कारांची निवडप्रक्रिया 
 • क्रिकेट जगतातील टॉप माजी क्रिकेटर्स, मीडिया मेंबर्स, आयसीसी अंपायर्स, मॅच रेफरी आणि आयसीसी क्रिकेट कमिटीचे सदस्य निवड करतात.
 • तीन ते एक या रँकिंगच्या आधारे मतदान होते. तीन हे हायएस्ट मत असते.
 • खेळाडुंच्या सिलेक्शन पॅनलमध्ये अनिल कुंबळे, स्टीवन फ्लेमिंग, रसेल आर्नोल्ड, जोनाथन एग्न्यू, बेटी टिमर यांचा सहभाग होता.
 • स्पिरिट ऑफ द क्रिकेट अवॉर्डसाठी १० टेस्ट खेळलेले कर्णधार, आयसीसी एलीट पॅनलचे अंपायर्स आणि मॅच रेफरी मतदान करतात.
 • बेस्ट अंपायर अवॉर्डसाठी टेस्ट खेळणारे १० कर्णधार आणि मॅच रेफरी मतदान करतात.

पुन्हा वापरता येणारा अग्निबाण विकसित

 • अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीने फाल्कन-९ अग्निबाण अवकाशात सोडून तो परत जमिनीवर पूर्ववत उतरविण्यात यश प्राप्त केले आहे. विमानांसारखा पुन्हा वापरता येण्याजोगा अग्निबाण बनविण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे ऐतिहासिक मानला जात आहे.
 • पृथ्वीवर परतण्यापूर्वी ११ संदेश दळणवळण उपग्रह या अग्निबाणाने सुरक्षित अवकाशांत प्रक्षेपित केले. स्पेस एक्सच्या बेव प्रसारणात अग्निबाण केप कनेवेराल तळावर यशस्वीरीत्या उतरत असल्याचे दाखविण्यात आले.
 • यापूर्वी जूनमध्ये झालेला असा प्रयोग फसला होता. त्यावेळी फाल्कनचे तुकडे तुकडे होऊन तो पेटला होता. यावेळी सुधारित असा २३ मजली उंच अग्निबाण केप कनेवेराल हवाई तळावरून अवकाशात झेपावला व अवघ्या १० मिनिटात आपली कामगिरी पार पाडून तळाच्या दक्षिणेकडील ९ कि.मी. अंतरावरील तळावर परतला.
 • हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अवकाश संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. अग्निबाण पुन्हा पुन्हा वापरात आल्याने खर्चात कपात होईल. 

सानिया-हिंगीस २०१५ची 'वर्ल्ड चॅम्पियन' जोडी

  Sania Mirza and Martina Hingis
 • भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) २०१५ सालातील महिला दुहेरीतील 'वर्ल्ड चॅम्पियन' किताब देऊन गौरवले आहे.
 • सानिया-हिंगीस जोडीने २०१५ या वर्षात टेनिसच्या महिला दुहेरी स्पर्धेवर राज्य केले आहे. यापूर्वी भारताचे लिअँडर पेस-महेश भूपती यांनी १९९९ साली पुरुष दुहेरीत 'वर्ल्ड चॅम्पियन'चा खिताब मिळवला होता.
 • मार्च २०१५ मध्ये एकत्र आलेल्या सानिया व हिंगीस या जोडीने यावर्षी नऊ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात विम्बल्डन व अमेरिकन ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धांसह डब्ल्यूटीए टूर फायनल्सच्या विजेतेपदाचाही समावेश आहे.
 • यावर्षी त्यांनी एकूण ५५ सामने जिंकले असून गेल्या २२ सामन्यांपासून दुहेरीची ही जोडी अपराजित आहे, त्यांना अवघ्या ७ सामन्यांत पराभव पत्करावा लागला.
 • त्यांच्या या नेत्रदीपक व शानदार कामगिरीमुळेच त्या दोघींनाही 'वर्ल्ड चॅम्पियन'चा खिताब देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment