चालू घडामोडी - ६ व ७ डिसेंबर २०१५


जगातील ५० सर्वाधिक प्रदूषित शहरापैकी १३ शहरे भारतात

 • ग्लोबल सर्वे एजन्सी नमबेओ (NUMBEO) ने केलेल्या एका सर्वेनुसार जगातील ५० सर्वाधिक प्रदूषित शहरापैकी १३ शहरे ही एकट्या भारतातील आहेत.
 • जगातील २०० हून अधिक शहरात नमबेओ संस्थेने सर्वे केला असून सर्वाधिक प्रदूषित शहरात देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा २१वा तर देशाची राजधानी दिल्लीचा १२वा क्रमांक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
 • एजन्सीच्या पल्यूशन इंडेक्सनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील टॉप ५० प्रदूषित शहरांच्या यादीत बनारस ८५.२ गुणांसह २८ व्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहर हे २९ व्या क्रमांकावर आहे.
 • या अहवालात गुवाहाटी २६ स्थानावर तर गुडगाव २५व्या स्थानावर आहे. दिल्लीला लागून असलेले नोएडा शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरात टॉपवर असून हे शहर ४थ्या स्थानावर आहे. 
 • मिस्रची राजधानी काहिरा हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
 • नमबेओचा दावा आहे की त्यांनी दिलेला अहवाल जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्ट्सवर आधारित आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण

 • नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जोरदार झटका दिला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी उपस्थित न राहण्याची गांधींनी केलेली विनंती हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
 • २६ जून २०१४ ला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना याप्रकरणी समन्स बजावत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
 • यावर दिल्ली हायकोर्टात अपील केल्यानंतर कोर्टाने समन्स रोखले होते. यानंतर ४ डिसेंबरला दिल्ली हायकोर्टाने सुनावणी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला होता.
 काय आहे प्रकरण? 
 • सोनिया आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या कर्जाच्या नावाखाली नॅशनल हेरॉल्डची ५ हजार कोटींची संपत्ती हडप केली, असा आरोप भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
 • याप्रकरणी स्वामी यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीसाठी आता दिल्ली हायकोर्टाने सोनिया आणि राहुल यांना पटियाला हाऊस कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत.

'द हिंदूज् : अॅन ऑल्टरनेटिव्ह हिस्ट्री'

  The Hindus
 • 'द हिंदूज् : अॅन ऑल्टरनेटिव्ह हिस्ट्री' हे वेंडी डॉनिगर यांचे बहुचर्चित आणि वादग्रस्त पुस्तक पुन्हा एकदा विक्रीसाठी बाजारात आले आहे.
 • या पुस्तकात हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापल्याची जोरदार टीका झाल्यानंतर पेंग्विन इंडिया या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक परत घेतलं होते. आता स्पीकिंग टायगर या प्रकाशन संस्थेने ते कुठलीही काटछाट न करता प्रकाशित केले असून बाजारातही आणले आहे.
 • 'द हिंदूज् : अॅन ऑल्टरनेटिव्ह हिस्ट्री' हे पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित झालं होतं. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या दीनानाथ बत्रा यांनी, लेखिका वेंडी डॉनिगर आणि प्रकाशक पेंग्विन इंडियाविरोधात तक्रार दाखल केली होती. 
 • या पुस्तकात हिंदू धर्माच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा, धर्माचा अनादर करणारा मजकूर असल्याचा बत्रांचा आक्षेप होता. त्यामुळे प्रकाशकाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २९५ (अ) अंतर्गत कारवाईची मागणी त्यांनी केली होती.
 • अखेर, २०१४ मध्ये पेंग्विन इंडियानं स्वतःहूनच वादग्रस्त पुस्तक बाजारातून मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि पुढच्या सहा महिन्यांत सर्व विक्रेते आणि वितरकांकडून पुस्तकं परतही मागवली.
 • या भूमिकेबद्दल अनेक विचारवंतांनी नाराजी व्यक्त केली होती. हिंदू धर्म, संस्कृती, भारतीय पुराण यासंबंधी 'द हिंदूज् : अॅन ऑल्टरनेटिव्ह हिस्ट्री'मध्ये प्रचंड माहिती आहे. त्यामुळे हे पुस्तक मागे घेणं योग्य नसल्याचं मत बुद्धिजीवींनी मांडले होते.
 • हा मतप्रवाह विचारात घेऊनच, 'स्पीकिंग टायगर'नं हे पुस्तक, मजकुरात कुठलाही बदल न करता प्रकाशित केलंय. प्रकाशकांनी सात हजार प्रतींची पहिली आवृत्ती छापली आहे.

अॅसिड हल्ल्यातील पीडितांचा अपंग कोट्यात समावेश

 • अॅसिड हल्ल्यातील पीडितांवर मोफत उपचार करावे, त्यांना भरपाई द्यावी आणि त्यांचे पुनर्वसनही करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना दिले आहेत.
 • तसेच सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी अॅसिड हल्ल्यातील पीडितांचा सामवेश अपंग कोट्यात करावा, त्यांच्या रोजगाराची व्यवस्थाही करावी, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
 • अपंगांना नोकऱ्यांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानुसार अॅसिड हल्ल्यातील पीडितांना आता अपंगांचा तीन टक्के कोटा लागू होणार आहे.
 • बिहारमधील पीडित चंचल दास हिला दहा लाख रूपयांची भरपाई देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

भारताला वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेत ब्राँझपदक

 • भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या नेदरलँडसला पेनल्टी शूटआउटमध्ये ३-२ (५-५) असे पराभूत करून हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले.
 • या स्पर्धेतील साखळीत नेदरलँडसने भारतावर ३-१ने मात केली होती. या पराभवाची भारताने परतफेड केली.
 • १९८२मध्ये भारताने अमस्टरडॅम येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानवर ५-४ अशी मात करून पदक मिळवले होते. त्यानंतर आज ३३ वर्षांनतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवण्याचा विक्रम भारताने केला.

No comments:

Post a Comment