चालू घडामोडी : १२ जानेवारी


मेस्सीला पाचव्यांदा 'बॅलॉन डी-ऑर अवॉर्ड'

  Lionel Messi Wins Ballon D'or
 • अर्जेंटीनाचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सीची २०१५चा ‘बेस्ट फुटबॉलर’ म्हणून निवड करण्यात आली आहे व फिफाने त्याला बॅलॉन डी'ऑर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
 • मेस्सीने हा अवॉर्ड जिंकण्याची ही विक्रमी पाचवी वेळ आहे. विजेत्या मेस्सीला ४१.३३ टक्के, ख्रिस्तियानो रोनाल्डोला २७.७६ टक्के आणि नेमारला ७.८६ टक्के मते मिळाली.
 • या अवॉर्डच्या शर्यतीत मेस्सीला रियाल माद्रिद क्लबचा पोर्तुगालचा स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि ब्राझिलच्या नेमारचे आव्हान होते.मात्र मेस्सीने दोघांनाही मागे टाकले. हे दोघेही फीफाच्या वर्ल्ड इलेवन-२०१५ टीममध्ये आहेत.
 इतर पुरस्कार 
 • बेस्ट कोच पुरस्कार : लुईस एनरिक्स (बार्सिलोना)
 • बेस्ट वुमन फुटबॉलर पुरस्कार : कार्ली लॉयड (अमेरिका)
 • बेस्ट गोलसाठी मिळणारा पुस्कास अवॉर्ड विला नोवा क्लबच्या ब्राझिली फॉरवर्ड वेन्डेल लिराला मिळाला.
 फिफा जागतिक संघ 
 • या पुरस्कार घोषणेच्या वेळी फिफातर्फे सर्वोत्तम जागतिक संघही जाहीर करण्यात येतो. रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाच्या प्रत्येकी चार खेळाडूंनी या संघात स्थान पटकावले आहे.
 • संघ : न्यूएर, थिएगो सिल्वा, मार्सेलो, रामोस, अल्वेस, आंद्रेस इनिस्टा, मॉड्रिक, पॉल पोग्बा, नेमार, लियोनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो.

आता पर्यंतचे बॅलोन डी'ऑर अवॉर्ड विजेते
वर्षविजेता
२०१५लियोनेल मेस्सी (अर्जेंटीना)
२०१४ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
२०१३ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
२०१२लियोनेल मेस्सी (अर्जेंटीना)
२०११लियोनेल मेस्सी (अर्जेंटीना)
२०१०लियोनेल मेस्सी (अर्जेंटीना)
२००९लियोनेल मेस्सी (अर्जेंटीना)
२००८ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
२००७2007: काका (ब्राझिल)
२००६फॅबिओ कॅनावारो (इटली)
२००५रोनाल्डिन्हो (ब्राझिल)
२००४अन्ड्री सॅवचॅन्को (यूक्रेन)
२००३पावेल नेदवेद (चेक रिपब्लिक)

बैलगाडी शर्यतीवरील बंदी कायम

 • महाराष्ट्रासह अन्य राज्यांत लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतीवरील तसेच तामिळनाडूतील ‘जल्लिकट्टू’ या बैलाच्या खेळावरील बंदी उठविणाऱ्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
 • पर्यावरण खात्याच्या निर्णयास सरकारच्या पशु कल्याण मंडळाने (अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड) प्राणिमित्र संघटनांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
 • सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरयाणा व केरळमधील बैलगाडा शर्यतीवरील बंदी कायम राहणार आहे.
 • तामिळनाडूमधील पोंगल सणाचे निमित्त साधत केंद्रीय पर्यावरण खात्याने बैल खेळावरील बंदी उठवली होती. त्याविरोधात प्राणी संरक्षण संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
 • जल्लिकट्टू हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असल्याने त्यावर बंदी घालू नये, अशी विनवणी तामिळनाडू सरकारने सुनावणीदरम्यान केली. या सांस्कृतिक खेळात बैलांच्या (प्राण्यांच्या) सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे ती कायम ठेवावी, अशी विनंती राज्य सरकार न्यायालयात करीत होते.

प्रख्यात गायक डेव्हिड बोव्ही यांचे निधन

 • हिरोज’, ‘फेम’ आणि ‘लाइफ ऑन मार्स’ अशा संगीत कलाकृतींमधून जागतिक संगीतविश्वावर वेगळा ठसा उमटविणारे इंग्लंडचे प्रख्यात गायक आणि गीतलेखक पॉपस्टार डेव्हिड बोव्ही यांचे १० जानेवारी रोजी वयाच्या ६९व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले.
 डेव्हिड बोव्ही यांचा जीवनपट 
  David Bowie
 • ८ जानेवारी १९४७ रोजी ब्रिक्सटन येथे जन्मलेल्या डेव्हिड रॉबर्ट जोन्स यांना डेव्हिड बोव्ही म्हणून ओळखले जात होते. 
 • संपूर्ण कारकीर्दीत त्यांचे २५ अल्बम प्रसिद्ध झाले. त्याचप्रमाणे काही सिनेमांमध्ये त्यांनी अभिनयही केला होता.
 • गायक डेव्हिड जोन्स यांच्यातील नामसाधर्म्यामुळे बोवी यांनी नावात बदल केला. बोवी हे त्यांच्या काळातील अतिशय गाजलेले संगीत कलाकार होते.
 • त्यांनी ४० वर्षांच्या काळात आर्ट रॉक, हार्ड रॉक, डान्स पॉप अशा विविध शैलींमधून सादरीकरण करताना संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजविले.
 • १९६९ मध्ये ‘स्पेस ऑडिटी’ हा त्यांचा अल्बम प्रचंड गाजला. त्यानंतर ‘हंकी डोरी’, ‘द राइज अँड फॉल ऑफ झिगी स्टारडस्ट’ आणि ‘स्पायडर फ्रॉम मार्स’ अशा एकापेक्षा एक सरस अल्बममुळे बोवी महानायक ठरले.

मंदिरांमध्ये जीन्स, टी-शर्ट बंदीच्या आदेशाला स्थगिती

 • जीन्स, टी-शर्ट, स्कर्ट घातल्यास तामिळनाडूतील मंदिरांमध्ये प्रवेशबंदी करणारा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत स्थगित केला आहे.
 • मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराईतील खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या आदेशात एक जानेवारीपासून तामिळनाडूतील मंदिरात पुरुष भाविकांनी धोती (लुंगी) किंवा पायजमा आणि महिलांनी साडी किंवा चुडीदार अशा पोशाखातच प्रवेश करण्याचे आदेश दिले होते. हा पोशाख नसल्यास मंदिरात प्रवेश नाकारण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
 • या निर्णयाला राज्य सरकारने मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. देवळांमध्ये जीन्स घालून जाता येणार नाही किंवा महिलांना पाश्चात्त्य वेश परिधान करता येणार नाही, हा नियम भाविकांसाठी जाचक असून, यामुळे तामिळनाडूतील मंदिरांमध्ये भाविकांचा ओघही कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मदुराई खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत राओनिक विजेता

 • कॅनडाच्या मिलोस राओनिकने ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये फेडररचा पराभव करत ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. 
 • राओनिकने धक्कादायक निकालाची नोंद करताना दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले.
 • १७ ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या फेडररविरुद्ध गेल्या ११ सामन्यांतील राओनिकचा हा दुसरा विजय आहे.

No comments:

Post a Comment