चालू घडामोडी : १४ फेब्रुवारी


‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन

    Make in India Week
  • जगभरातील देशांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, यासाठी सुरू झालेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहातील ‘मेक इन इंडिया’ या सेंटरचे वांद्रे कुर्ला संकुल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले.
  • देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देऊन विदेशी गुंतवणूक वाढावी आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, यासाठी ‘मेक इन इंडिया’ अभियान देशभरात राबविले जात आहे.
  • या अभियानांतर्गत १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ‘मेक इन इंडिया सप्ताह’ राबविण्यात येत आहे. या सप्ताहात जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार करोडो रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करणार आहेत.
  • उद्घाटन सोहळ्याला फिनलॅंडचे पंतप्रधान जुहा सिपीला, पोलॅंडचे पहिले उपपंतप्रधान प्रो. पिओत्र ग्लिन्स्की यांच्यासह जगभरातील मान्यवर उद्योजकांनी उपस्थिती लावली.
  • या सप्ताहाचे यजमानपद महाराष्ट्र राज्य भूषवित असून, महाराष्ट्राच्या दृष्टीने ‘मेक इन इंडिया सप्ताह’ अतिशय महत्त्वाचा आहे. या सप्ताहाच्या कालावधीत देशी-विदेशी उद्योगांच्या वतीने राज्यात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले जाणार आहेत.

वेस्ट इंडिजला अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे विश्वविजेतेपद

    2016 Under-19 Cricket World Cup
  • बांगलादेशमध्ये शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडिजने तीन चेंडू आणि पाच गडी राखून भारतावर विजय मिळवत अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे विश्वविजेतेपद पटकावले. वेस्ट इंडिजने पहिल्यांदाच अंडर १९ वर्ल्डकप पटकावला आहे.
  • आघाडीच्या फलंदाजांचे अपयश आणि गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांकडून साथ न लाभल्यामुळे चौथ्यांदा जगज्जेते होण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले.
  • प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघासमोर विजयासाठी १४६ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान विंडिजच्या संघाने ५ गडी गमावून पूर्ण केले.
  • भारताचा गोलंदाज मयांक डागरने १० षटकात २५ धावा देऊन ३ गडी बाद केले. तर फलंदाज  ८९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारसह ५१ धावा केल्या.
  • भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पंच राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारत पाचव्यांदा ‘अंडर १९’ विश्वकपच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. भारत २०००, २००८ आणि २०१२ मध्ये विश्वकपचा विजेता ठरलेला आहे.
  • सामनावीर : कार्ती (वेस्ट इंडिज)
  • मालिकावीर : मेहेदी हसन मीराझ (बांगलादेश)

प्रशांत किशोर पंजाब निवडणुकीत काँग्रेससोबत

  • लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सल्लागार असलेले प्रशांत किशोर आता पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत काम करणार आहेत.
  • बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरोधात रणनीती रचणाऱ्या प्रशांत किशोर यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सल्लागारपदी नियुक्त केले आले.
  • आता त्यांनी पंजाबमध्ये २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेबाहेर असल्याने पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

ऍडम व्होजेसचा विक्रम

  • ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ऍडम व्होजेसने धावांच्या सरासरीच्या बाबतीत सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे.
  • व्होजेसने न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाबाद १७६ धावांची खेळी केली आहे. त्याने आतापर्यंत १४ कसोटी सामन्यांमध्ये १००.३३ च्या सरासरीने १२०४ धावा केल्या आहेत.
  • कसोटी क्रिकेटमध्ये १०० पेक्षा अधिक सरासरीने धावा बनविणारा व्होजेस हा जगातील एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने दिग्गज डॉन ब्रॅडमन यांचा ९९.९४ च्या सरासरीने धावा बनविण्याचा विक्रम मागे टाकला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा